Current Affairs of 17 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2016)

‘नीट’ परीक्षामध्ये हेत शहा देशातून पहिला :

 • सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनने घेतलेल्या नीट (नॅशनल एलिजेबिलिटी कम इंट्रन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल (दि.16) जाहीर झाला.
 • तसेच या परीक्षेसाठी देशातून 7 लाख 31 हजार 223 विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी 4 लाख 9 हजार 477 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हेत शाह हा विद्यार्थी देशातून पहिला आला आहे.
 • वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवी प्रवेशासाठी नीट-युजी घेण्यात आली होती.
 • 1 मे आणि 24 जुलै अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या या परीक्षेसाठी एकूण 8 लाख 2 हजार 594 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
 • या परीक्षेत हेत शाह देशातून पहिला आला असून, एकांश गोयल आणि निखिल बाजीया यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.
 • नीटच्या निकालावरुन विद्यार्थ्यांना राज्यांमध्ये असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये, डिम्ड विद्यापीठ आणि इतर संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये असलेल्या राज्य कोट्यातून 15 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2016)

पी.व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश :

 • बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेतच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूने चीनच्या ताई जू यिंगवर 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 • रिओ ऑलिम्पिक सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर पी.व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत देशाला दिलासा दिला.
 • लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी सायना नेहवाल युक्रेनची खेळाडू मारिया युलिटिनाकडून 18-21, 19-21 ने पराभूत झाली.
 • बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या या लढतीतील पराभवासह सायनाचे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
 • तसेच त्यामुळे आता भारतातर्फे महिला एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीमध्ये श्रीकांत यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

अँडी मरेला ऐतिहासिक दुसरे सुवर्ण :

 • इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत दुसरे सुवर्णपदक पटकावताना इतिहास रचला.
 • रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत मरेने अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोवर 7-5, 4-6, 6-2, 7-5 असा विजय मिळवत सुवर्णपदक मिळविले.
 • मरेने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तब्बल चार तास चाललेल्या या सामन्यात डेल पोट्रोने मरेला चांगली लढत दिली. पण मरेने अनुभव पणाला लावत हा अंतिम सामना जिंकला.
 • कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून केई निशिकोरीने जपानला टेनिसमधील शतकातले पहिले पदक मिळवून देण्याचा मान पटकावला. या सामन्यात निशिकोरीने नदालला 6-2, 6-7 (1-7), 6-3 असे पराभूत केले.
 • तसेच यापूर्वी जपानने 1920 साली पुरुष एकेरी आणि दुहेरीमध्ये रौप्यपदक पटकावले होते.

शेतकरी दिन आता तिथीनुसारच साजरा होणार :

 • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.
 • 16 ऑगस्ट 2014 च्या शासन निर्णयानुसार 29 ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार हा दिन साजराही करण्यात आला.
 • परंतु, सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने तिथी नुसार हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • नारळी पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला होता. यंदा नारळी पौर्णिमा 17 ऑगस्ट रोजी असल्याने हा दिन 17 रोजी साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
 • तिथीनुसार हा दिन साजरा करण्यात येणार असल्याने दरवर्षी नारळी पौर्णिमेला बदलत्या तारखेनुसार हा दिन साजरा केला जाईल.
 • माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी 1 जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. तो वर्षानुवर्षे याच तारखेला होत आहे.
 • मात्र, शेतकरी दिन दोन वर्षे 29 ऑगस्टला साजरा केल्यानंतर तो तिथीनुसार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एनपीसीआयचे *99# मोबाइल ॲप सुरू :

 • राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशनने (एनपीसीआय) अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेन्टरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी) या प्रणालीवर आधारित *99# हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे.
 • हे अॅप्लिकेशन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणारी युनियन बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक ठरली आहे.
 • युनियन बँकेने हे अॅप यूएसएसडी मंचावर अॅड्रॉइड प्रणालीच्या साह्याने लाँच केले आहे.
 • तसेच या अॅपचे नाव बँकेने ‘युनियन बँक *99#’ असे ठेवले आहे.
 • ग्राहकांना आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, मिनी स्टेटमेंट पाहणे, पैसे हस्तांतरित करणे असे व्यवहार करणे या अॅपमुळे सोपे होणार आहे.
 • अॅपची काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये –
 • व्यवहार करताना इंटरनेटची गरज पडत नाही.
 • प्राथमिक खाते व्यवहार करता येणार आहे.
 • आधारसंलग्न ओव्हड्राफ्ट व जनधन योजनेतील रक्कम तपासता येणार आहे.
 • विविध भाषांत उपलब्ध आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.