Current Affairs of 18 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 नोव्हेंबर 2017)

चालू घडामोडी (18 नोव्हेंबर 2017)

चीनमधून अमेरिकेला अवघ्या 14 मिनिटांमध्ये पोहचणार “हे”विमान :

 • चीन अशा एका विमानाची निर्मिती करत आहे. हे विमान अणवस्त्रे घेऊन अवघ्या 14 मिनिटांमध्ये अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहचू शकेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • या विमानाचा वेग 27 हजार मैल प्रती तास म्हणजेच 43 हजार 200 किलोमीटर प्रती तास (12 किलोमीटर प्रती सेकंद) इतका असणार आहे.
 • म्हणजेच या हायपरसॉनिक वेगाने उड्डाण करणाऱ्या विमानाचा वेग आवाजाच्या वेगाहून 35 पट अधिक असणार आहे.
 • तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार 2020 पर्यंत जगातील सर्वात वेगवान हायपरसुपरसॉनिक फॅसिलटी (चीनमधील विंड टनल) ची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर या विमानाची चाचणी घेण्यात येईल.
 • आजच्या तारखेला जगातील सर्वात वेगवान विंड टन न्यूयॉर्कमधील एलईएनएक्स-एक्स ही आहे.
 • याचा वेग 22 हजार मैल प्रती तास म्हणजेच 36 हजार किलोमीटर प्रती तास इतका आहे.
 • हायपरसॉनिक विमाने बनवण्यासाठी विंड टनल्सचा उपयोग केला जातो.
 • या टनल्समध्ये आवाजच्या वेगाहून पाचपट अधिक वेगाने वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात.
 • जर चीनचा हा प्रयोग यशस्वी झाला तर चीन अगदी काही मिनिटांमध्ये जगातील कोणत्याही देशामध्ये पोहचू शकतो.
 • तसेच युद्धप्रसंगी काही मिनिटांमध्ये चीन जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात शस्त्रांची ने-आण करू शकतो.

पुढील वर्षापासून टपाल कार्यालयात मिळणार आधार कार्ड :

 • पुढील वर्षापासून महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना राज्यांतील टपाल कार्यालयामधून (पोस्ट ऑफिस) आधार कार्ड मिळणार आहेत.
 • या दोन्ही राज्यांमधील 1200 हून अधिक पोस्ट कार्यालयांमध्ये आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही 2018 पासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच. सी.अगरवाल यांनी दिली.
 • या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत, त्यांना पोस्टात जाऊन आधार कार्ड तयार करुन घेता येणार आहे.
 • गोवा आणि महाराष्ट्रातील एकूण 2 हजार 216 पोस्ट कार्यालयांपैकी 1 हजार 293 कार्यालयंमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

भारत-चीन सीमेवर 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप :

 • भारत-चीन सीमारेषेचा परिसर शनिवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला.
 • अमेरिकन भौगोलिक सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 6.3रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.
 • पहाटे 4 वाजून 14 मिनिटांनी हा भूकंप झाला.
 • या भूकंपाचे केंद्र भारत-चीन सीमारेषेपासून सर्वात नजीक असलेल्या पासीघाट आणि टेझू या  भारतीय शहरांपासून 240 किलोमीटरच्या परिसरात असल्याचे समजते.
 • भूगर्भापासून साधारण 10 किलोमीटर खोल अंतरावर भूकंप झाला.

सहायक आयुक्तांच्या अधिकारात वाढ :

 • पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त त्यांच्या हाताखाली काम करणा-या दुय्यम अधिका-यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिकार सोपवू शकतात.
 • त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी काही अधिका-यांना प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान केले आहेत.
 • कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने काही अधिकार नव्याने प्रदान करणे आवश्यक आहे.
 • त्यानुसार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांच्या अधिकारात वाढ केली आहे.
 • कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
 • कर्मचायांच्या दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, चौकशी अधिकारी नेमणूक करणे, नियुक्ती किंवा पदोन्नती नियमित करणे, तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार, अनुकंपा तत्त्वावर वारस नियुक्तीबाबत मान्यता देण्याबाबतचे प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत.
 • महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि नागरी सेवा नियुमानुसार, ब, क आणि ड श्रेणी संवर्गातील दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, सादरकर्ता व चौकशी अधिकारी नेमणूक, परीविक्षाधीन कालावधी वाढविणे, नियुक्ती- पदोन्नती आदी प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत.

पॉर्न पाहण्याचा प्रयत्न केल्यास भजन वाजणार :

 • वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील डॉक्टर आणि त्यांचा प्रोग्रॅमर मित्र या दोघांनी मिळून पोर्न वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी नवे अॅप तयार केले आहे.
 • या नव्या अॅप मुळे जो कोणी पोर्न वेबसाइट पाहण्याचा प्रयत्न करेल, त्याला ती दिसण्याऐवजी धार्मिक गाणी आणि भजन आपोआप सुरु होतील.
 • डॉ. व्ही. एन. मिश्रा आणि अनिकेत श्रीवास्तव दोघांनी या अॅपची निर्मिती केली आहे.
 • या दोघांना आता ‘हर हर महादेव’ म्हणून संबोधले जात आहे.
 • या अॅपची निर्मिती केल्याने हे दोघेही स्वत:ला समाजसेवक आणि पॉर्नाग्राफीचे विरोधक म्हणत आहेत.
 • जर कोणी मुस्लिम व्यक्ती पॉर्नोग्राफिक वेबसाइट पाहण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला ‘अल्ला ओ अल्ला’ हे संगीत ऐकायला मिळेल.
 • तसेच आम्ही सर्व धर्मियांसाठी त्यांच्या धर्मानुसार संगीत लोड करणार आहोत.
 • तसेच या अॅपमध्ये संगीताशिवाय 2000 हून अधिक वेबसाइटस् ब्लॉक करता येऊ शकतात.

दिनविशेष :

 • 1918 : लात्व्हियाने स्वतःला रशिया पासून स्वतंत्र घोषित केले.
 • 1901 : शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम, चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार यांचा जन्मदिन

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.