Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 19 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2017)

चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2017)

भारताची मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड 2017’ :

 • जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2017’चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला.
 • 17 वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे.
 • चीनमधील सान्या येथे मिस वर्ल्ड 2017 ही स्पर्धा रंगली.
 • जगभरातून आलेल्या 130 सौंदर्यवतींमध्ये रंगलेली कांटे की टक्कर, ग्लॅमर- फॅशनच्या दुनियेतील तारे आणि गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम अशा वातावरणात हा सोहळा पार पडला.
 • अंतिम पाचमध्ये इंग्लंड, फ्रान्स, भारत, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले.

चीनच्या गुहांमध्ये 4 कोटी लोक :

 • चीनच्या उत्तरेकडील प्रांतांत तब्बल चार कोटी लोक आजही गुहासदृश घरांमध्ये राहतात, असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही; पण ती वस्तुस्थिती आहे.
 • अगदी इ.स.पूर्व काळापासून डोंगरांत घरं बांधून चिनी लोक राहत आले आहेत.
 • ती अगदी गुहेसारखीच दिसतात. या घरांना योडाँग म्हटलं जातं आणि त्यात राहणा-यांना योडांगस म्हणून ओळखलं जातं.
 • गान्सू, शँक्झी, हेनन व निंगझिया या भागांत अशी घरं दिसतात.
 • ही घरं उन्हाळ्यात आतून थंड राहतात आणि थंडीत आतमध्ये ऊबदार वाटतं.
 • मध्यप्रदेशात ग्वाल्हेर सोडून चंबळच्या खोयात शिरल्यावर जी बिहड (मातीची घरं) दिसू लागतात, तसंच चित्र चीनच्या उत्तरेकडील भागांत दिसतं.
 • अर्थात तिथं फरक इतकाच की ती थेट डोंगरातच आहेत.
 • चीनमध्ये 1956 रोजी भूकंपाचा खूप मोठा धक्का बसला. त्यावेळी डोंगरही खचले आणि शँक्झी प्रांतात योडाँगमध्ये राहणारे 8 लाख 10 हजार लोक ठार झाले होते.

दिनविशेष :

 • 19 नोव्हेंबर : जागतिक नागरिक दिन.
 • 1999 : चीनने शेन्झू 1 हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
 • 1917 : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान यांचा जन्मदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World