Current Affairs of 18 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 मे 2017)

चालू घडामोडी (18 मे 2017)

स्वतंत्र ओबीसी विभागाची स्थापना :

  • इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असून, त्याला विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, असे नाव देण्यात आले आहे. सध्या या विभागाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.
  • तसेच या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित करण्यात आले असून, त्या संबंधीची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. त्यानुसार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे ही नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत.
  • या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे कामही हा विभाग करेल. इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मे 2017)

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.नितीन करमळकर यांची नियुक्ती :

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी जाहीर केले.
  • करमळकर हे पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुलगुरू पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे नवे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांना कार्यभार देणार आहेत.

मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ यादीत समावेश :

  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ यादीत समावेश झाला आहे. मुकेश अंबानी आपल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आणत आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनमान बदलत आहे.
  • रिलायन्सने वर्षभरापुर्वी सादर केलेल्या ‘जिओ’मुळे भारतात कोट्यावधी लोकांना इंटरनेटचा वापर करता येणे शक्य झाले. कोट्यावधी लोकांना इंटरनेटवर आणण्यासाठी अंबानी यांनी प्रयत्न करत आहेत.
  • अंबानींच्या या प्रयत्नामुळे त्यांचा ‘ग्लोबल गेम चेंजर्स’च्या यादीत समावेश झाला आहे. तेल उत्खनन क्षेत्रातील मोठी असामी असलेल्या मुकेश अंबानींनीं टेलिकॉम क्षेत्रात दणक्यात प्रवेश केला आहे. सहा महिन्यात जिओने 10 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे.
  • फोर्ब्जच्या यादीत सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ‘डायसन’ कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे आणि अमेरिकी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांचा देखील समावेश आहे.

भारतात आयफोनच्या निर्मितीला सुरवात :

  • अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे.   
  • चालू महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या ‘द एसई’ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूर येथील जुळणी प्रकल्पात ही चाचणी घेतली आहे.
  • विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असे सूत्रांनी सांगितले.
  • चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे. कंपनीने भारतात प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारकडे करसवलतींची मागणी केली आहे.
  • अॅपलने उत्पादन आणि दुरुस्ती प्रकल्प, स्मार्टफोन्समधील सुट्या भागांवर 15 वर्षांच्या कालावधीसाठी विविध शुल्कातून सूट देण्याची मागणी केली होती. याअंतर्गत आयात व उत्पादन शुल्कात विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिनविशेष :

  • संभाजीराजेमाहाराणी येसुबाई यांचे पुत्र ‘छत्रपती शाहूराजे भोसले’ यांचा जन्म 18 मे 1682 मध्ये झाला.
  • भारताचे तेरावे पंतप्रधान ‘एच. डी. देवेगौडा’ यांचा जन्म 18 मे 1933 मध्ये झाला.
  • 18 मे 1972 मध्ये कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.