Current Affairs of 19 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 मे 2017)

चालू घडामोडी (19 मे 2017)

भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार :

 • भारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
 • दहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
 • कुलकर्णी यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा समावेश आहे.
 • श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत खगोलभौतिकीचे प्रोफेसर आहेत. पॅलोमर ट्रॅन्शेंट फॅक्‍टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ते ओळखले जातात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मे 2017)

भारत आणि सिंगापूरच्या नौदलाचा संयुक्त सराव :

 • भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.
 • सिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी 81 भाग घेत आहे.
 • दोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.
 • नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल.
 • सिंगापूर नौदलाचे अनेक युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. त्याचबरोबर यामध्ये सिंगापूरचे समुद्री गस्त विमान फोकर एफ 50 आणि एफ 16 विमानही सहभागी होईल.

‘रेरा’च्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी यांची नेमणूक :

 • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.
 • तसेच न्यायपालिकेतून बी.डी. कापडणीस यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर :

 • मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे.
 • प्रतिष्ठेच्या ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कारासाठी ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांची निवड करण्यात आली आहे.
 • जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
 • तसेच यासोबतच परिषदेच्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना जाहीर झाला आहे, तर आचार्य अत्रे पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे.

नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत भारतीयांचा झेंडा :

 • अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजविले. यंदाच्या स्पर्धेचे पहिले बक्षिस व 50 हजार डॉलरची शिष्यवृत्ती 14 वर्षांच्या प्रणय वरदा याने जिंकली. वेदा भट्टराम हा आणखी एक भारतीय वंशांचा मुलगा तिसरा आला आहे.
 • तसेच यंदाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या 10 स्पर्धकांपैकी सहा भारतीय वंशाचे होते. गेल्या वर्षीची स्पर्धा ही भारतीय वंशाच्या मुलाने जिंकली होती. गेल्या एक दशकापासून या स्पर्धेत भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्यांचा दबदबा आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World