Current Affairs of 17 May 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 मे 2017)
आरएसएसची पहिल्यांदाच जम्मूमध्ये बैठक :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यांदाच जम्मूमध्ये वार्षिक आढावा बैठक आयोजित करणार असून, ही बैठक जुलैमध्ये घेण्यात येईल.
- तसेच या बैठकीव्दारे काश्मीर खोरे हे भारताचा अविभाज्य घटक असून, तसा फुटीरतावाद्यांना संदेश देण्यात येणार असल्याचे ‘आरएसएस’चे नियोजन आहे.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि विश्व हिंदू परिषदचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
- 18 ते 20 जुलैदरम्यान तीन दिवसांच्या बैठकीचे संघाचे नियोजन असल्याची माहिती ‘आरएसएस’चे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भारताची घोडदौड :
- अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील ‘अर्न्स्ट अँड यंग’ संस्थेच्या मानांकनातून हे स्पष्ट झाले.
- ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या 40 देशांमध्ये चीन अव्वल स्थानी असून, भारत दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या मानांकनात अमेरिका प्रथम क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा धोरणात केलेल्या बदलांमुळे ही घसरण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने याआधीची तापमान बदलाबाबतची अनेक धोरणे रद्द करीत अमेरिकेतील कोळसा उद्योगाचे पुरुज्जीवन करणारे धोरण अवलंबले आहे.
- चीनने या वर्षी अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी 2020 पर्यंत 363 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करण्याची घोषणा केली आहे.
- भारत सरकारने 2022 पर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट 175 गिगावॉट ठेवले आहे. ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या मानांकनात युरोपीय देशांमधील जर्मनी चौथा, फ्रान्स आठवा; तर ब्रिटन दहावा आहे.
‘उषा स्कूल ऑफ अॅथ्लिट’ जूनपासून सुरू होणार :
- धावपटू पी.टी. उषा हिने अथक परिश्रमाने केरळच्या कोझीकोडे येथे ‘उषा स्कूल ऑफ अॅथ्लीट’ची स्थापना केली आहे. या स्कूलचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते 15 जून रोजी होईल. कोझीकोडे जिल्ह्यातील किनालूर येथे 30 एकर परिसरात अकादमी आकारास आली आहे.
- जमीन केरळ सरकारने दिली असून, या स्कूलमध्ये आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. यासाठी केंद्र शासनाने तीन वर्षांआधी साडेआठ कोटी रुपये दिले होते.
- तसेच याशिवाय एक मड ट्रॅकदेखील तयार करण्यात आला असून, 40 खाटांचे वसतिगृहदेखील आहे.
सौरऊर्जेवरील पहिले रेल्वे प्रशिक्षण केंद्र :
- रोज सुमारे दीड हजार विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी भुसावळ येथील रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था (झेडआरआयटीआय) आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे वर्षाला 70 लाख रुपयांची वीजबिलाची बचत होत आहे.
- भुसावळातील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेच्या टेरेसवर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही प्रणाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई येथे एका सोहळ्यात नुकतीच राष्ट्राला अर्पण केली.
- झेडआरआयटी संस्थेत साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा सौरऊर्जा प्रकल्प 21 नोव्हेंबर 2016 पासून आकारास आला आहे. त्यात 4.595 मे.वॅ. इतका वीजभार आहे. वर्षभरात येथे सात लाख युनिट वीज तयार होते.
दिनविशेष :
- 17 मे हा जागतिक दूरसंचार दिन आहे.
- देवीच्या लसीचा शोध लावणारे ‘डॉ. एडवर्ड जेन्नर’ यांचा जन्म 17 मे 1749 मध्ये झाला.
- 17 मे 1872 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यातील इतिहासप्रसिध्द सालबाईचा तह झाला.
- भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय 17 मे 1949 रोजी घेण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा