Current Affairs of 18 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जून 2018)

चालू घडामोडी (18 जून 2018)

राज्यात स्मार्ट सिटीसाठी पार्किंग पॉलिसी :

  • शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या विचारात घेऊन पार्किंग धोरणही ठरवावे लागणार आहे.
  • त्या पार्श्‍वभूमीवर युरोपातील शहरांसह देशातील मुंबई, रांची, बंगळूर, चेन्नई, नागपूर, पुणे या शहरांचा अभ्यास करून महापालिकेने पिंपरी-चिंचवडसाठी पार्किंग धोरण आखले आहे. त्याचे सादरीकरण दोन दिवसांपूर्वी महापालिका भवनात सहशहर अभियंता राजन पाटील यांनी केले होते.
  • हे धोरण मान्य करण्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर 20 जून रोजी प्रशासनाकडून मांडले जाण्याची शक्‍यता आहे. शहरासाठी निश्‍चित केलेले पार्किंगचे दर अन्य शहरांच्या तुलनेने कमी राहणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
  • महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मतानुसार, लोकसंख्या 10 लाखांवर आणि वाहनांची संख्या पाच लाखांवर गेल्यानंतर शहरासाठी स्वतंत्र पार्किंग धोरण ठरविणे गरजेचे आहे. आपल्या शहराची लोकसंख्या 22 लाखांवर आणि वाहनांची संख्या 16 लाखांवर गेलेली आहे. त्यामुळे पार्किंग धोरण ठरविले आहे.
  • सध्या शहरात कुठेही आणि कशीही वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. वाहन पार्क करण्यासाठी जागा शोधताना किमान एक मिनिटांचा मानसिक त्रास वाहनचालकाला सहन करावा लागत आहे. त्या काळात ते वाहन सुरू राहात असल्यामुळे किमान 30 ग्रॅम कार्बन डायऑक्‍साईड ऊत्सर्जित करते, त्यामुळे पार्किंग धोरण आवश्‍यक आहे.
  • तसेच त्यासाठी वर्दळीच्या दृष्टीने आवश्‍यकतेनुसार चार झोन केलेले असून पार्किंग शुल्क वाहनाच्या स्वरुपानुसार वेगवेगळे नमूद केलेले आहे. रात्रीच्या दीर्घकाळ पार्किंगसाठीही वेगळे शुल्क असेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जून 2018)

राज्य हिरवाईने बहरणार केंद्राची वन उद्यानांना परवानगी :

  • राज्यात येत्या पाच वर्षांत 26 वन उद्याने उभारण्यात येणार आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि पुण्यात दोन ठिकाणी ही वन उद्याने उभारण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
  • शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखली जाणारी ही वन उद्याने देशात 200 ठिकाणी उभारण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 80 टक्के केंद्राचा, तर उरलेला 20 टक्के निधी राज्य सरकारला उभा करावा लागणार आहे.
  • टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाणार असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच उद्यानांना केंद्राकडून मदत मिळणार आहे. 20 हेक्‍टरपेक्षा अधिक जमीन हा निकष यासाठी निश्‍चित करण्यात आला आहे.
  • शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वन उद्यानाचे सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, खेळण्याची व बसण्याची जागा अशा टप्प्यांत हे सुशोभीकरण करायचे आहे.
  • नागपुरात अंबाझारी, यवतमाळमध्ये वडगाव, पुण्यात पर्वती व वारजे तर चंद्रपुरात ही वन उद्याने साकारली जाणार आहेत. मुंबईसारख्या शहरांत जागा शिल्लक राहिली नसल्याने आजूबाजूच्या परिसरात वन उद्यानांचे नियोजन आधीपासून करण्यासाठी राज्य सरकारच्या वन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. एका उद्यानासाठी दोन कोटी रुपये असा निधी मिळणार असून, राज्यांमध्ये अधिकाधिक वन उद्याने तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

दहावी गुणपत्रिकेसोबत जात पडताळणी प्रमाणपत्र :

  • वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते; मात्र सामाजिक न्याय विभागातील मंदगती कारभारामुळे विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र दरवर्षी विलंब होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी पुढील वर्षापासून दहावीच्या गुणपत्रिकेसोबतच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणत्र देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच युवा सेनेच्या सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
  • बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे कठीण झाले असल्याने अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर या शिष्टमंडळाने तावडे यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप यांचा समावेश होता.
  • यंदापासून एमबीए, एमएमएस, बी. फार्मा आणि अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय आणि दंतशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे प्रमाणपत्र पूर्वीपासूनच गरजेचे असते. यंदापासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
  • विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र तीन महिन्यांत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही हे प्रमाणपत्र सादर करण्यास 2 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल :

  • स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने स्टुटगार्ट ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत जागतिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थान पुन्हा निश्चित केले.
  • फेडररने स्टुटगार्ट ओपनच्या उपांत्य फेरीत नीक किर्ग्योसवर 6-7, 6-2, 7-6 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत त्याचा सामना कॅनडाच्या मिलोस राओनीकशी होणार आहे.
  • मागील 11 आठवड्यात फेडरर एकही सामना खेळलेला नाही. स्टुटगार्ट ओपनचा पहिला सामना हरल्यानंतर फेडरर ग्रास कोर्टवरील सलग 15 सामने जिंकला आहे. उपांत्य फेरीतील या विजयाबरोबरच त्याने पारंपारिक प्रतिस्पर्धी राफेल नदालला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • तसेच यंदाच्या वर्षात फेडररने आतापर्यंत तीनवेळा जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. सध्या फेडररचे 8820 गुण आहेत तर नदालचे 8770 गुण आहेत.

मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर वेगवान टी-20 धावणार :

  • राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही मुंबई ते दिल्ली मार्गावर अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशी वेगवान टी-20 (ट्रेन 20-20) गाडी चालविण्यात येणार आहे. 2020 साली ही गाडी चालविण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले असून त्याची निविदा प्रक्रिया येत्या काही महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमधील (इंटिग्रल कोच फॅक्टरी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. येत्या सप्टेंबरपासून दिल्ली ते भोपाळ मार्गावर टी-18 (ट्रेन-2018) वेगवान ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
  • मुंबई ते दिल्ली आणि अहमदाबाद हा सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी राजधानी तसेच शताब्दीसारख्या वेगवान गाडय़ा चालवण्यात येत आहेत. यानंतर रेल्वे मंत्रालयाने ऑगस्ट 2016 मध्ये टॅल्गोसारख्या वेगवान अशा गाडीचीही चाचणी घेण्यात आली होती.
  • ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाडीने मुंबई ते दिल्लीमधील 16 तासांचा प्रवास 13 तासांत पूर्ण केला होता. मात्र तांत्रिक कारणास्तव ही गाडी चालवणे रेल्वेला शक्य झाले नाही.
  • अखेर रेल्वे मंत्रालयाने याला पर्याय म्हणून ट्रेन सेट (टी प्रकार) प्रकारातील वेगवान, सोयीसुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित गाडी बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम टी-18 या 16 डब्यांच्या एका गाडीची बांधणी आयसीएफमध्ये केली जात असून ही गाडी दिल्ली ते भोपाळ मार्गावर येत्या सप्टेंबरपासून चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

दिनविशेष :

  • स्वातंत्र्यसेनानीसमाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म 18 जून 1899 मध्ये झाला.
  • पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.
  • सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
  • डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून 18 जून 1946 रोजी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
  • जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस 18 जून 1981 मध्ये विकसित केली गेली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जून 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.