Current Affairs of 19 June 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 जून 2018)
संदीप बक्षी आयसीआयसीआय बँकेचे नवे संचालक :
- व्हिडिओकॉन उद्योग समुहाला दिलेल्या कर्ज प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी आता संदीप बक्षी हे बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत.
- आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने 18 जून रोजी बक्षी यांची संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारीपदी नियुक्ती केली. त्यामुळे आता आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी 19 जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या भूमिकेला आयओसीचा पाठिंबा :
- संघटनेचे प्रशासन उत्तम करण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांबाबत प्रथम मंत्रालयाने आमच्याशी संवाद साधावा, या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) मागणीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) पाठिंबा दिल्याने संघटनेच्या भूमिकेला पाठबळ मिळाले आहे.
‘जबाबदार स्वायत्तता‘ हे सूत्र सांभाळत संघटनेचे प्रशासन योग्य प्रकारे करण्याचे आदेश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिले होते. - उत्तम प्रशासन आणि सुधारित क्रीडा विधेयकाची अमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिल्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी केली होती.
राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कारभारात शासन ढवळाढवळ करीत असल्याबाबत आंतरराष्ट्रीय समितीने आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रीय संघटनेला पाठबळ मिळाले आहे. - राष्ट्रीय संघटनेच्या वतीने क्रीडा मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या पत्रात अध्यक्ष बात्रा आणि सचिव राहुल भटनागर यांनी सर्व संबंधित घटकांना एकत्र बोलावून चर्चा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीस पुजारी नियुक्त :
- अंबाबाई मंदिरासाठी केलेला स्वतंत्र कायदा जोपर्यंत अमलात येत नाही, तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिराबाबतचे अधिकार कायम आहेत. आम्हाला पुजारी नियुक्त करण्याचा अधिकार असून त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे नियोजित वेळेनुसार अर्जदारांच्या मुलाखती होणार आहेत.
- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच मुलाखतीतून निवडले जाणारे पुजारी हे कायम नसून ते तात्पुरते असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
- देवस्थान समितीला पुजारी नियुक्तीचा अधिकार नाही, असे श्री करवीर निवासिनी पुजारी हटाव संघर्ष कृती समितीने पत्रकाद्वारे जाहीर केले होते. याबाबत खुलासा जाधव यांनी केला. या वेळी जाधव म्हणाले, मुंबईत विधी व न्याय विभागाची बैठक झाली.
- तसेच यात विधी व न्याय विभागाच्या सचिवांनी हंगामी पुजारी नेमण्यासाठी मुलाखत घ्या, असे तोंडी सांगितले असून त्यानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबतची कोणतीही जाहिरात देऊ नये, असे सांगण्यात आल्याने आमच्याकडे जे अर्ज आले, त्यांची मुलाखत प्रक्रिया 19, 20 आणि 21 या तीन दिवशी राबवली जाईल.
- मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ गोपनीय आहे. संस्कृत भाषेचे तज्ज्ञ शिवदास जाधव व गणेश विश्वनाथ नेर्लेकर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार हे मुलाखती घेणार आहेत. यांच्याशिवाय शंकराचार्य मठातील तज्ज्ञ व्यक्ती असणार आहे. निवडल्या जाणाऱ्या पुजाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
उत्तराखंडच्या रणजी संघाला बीसीसीआयची मान्यता :
- आगामी वर्षांत भारतीय स्थानिक क्रिकेटला आणखी एक सदस्य मिळणार आहे. बीसीसीआयने उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता दिली आहे. यासोबत उत्तराखंडची 18 वर्षांची तपस्या अखेर फळाला आली आहे.
- उत्तराखंडमधील क्रिकेटची प्रगती पाहण्यासाठी बीसीसीआयने 9 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. अलीकडेच पार पडलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत क्रिकेट प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता मिळण्याबाबतच्या वृत्ताला होकार दर्शवला आहे.
- 9 सदस्यीय समितीमध्ये सहा विविध राज्यांच्या संघटनांचे सदस्य, एक उत्तराखंड सरकारचा प्रतिनीधी, दोन बीसीसीआयच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये असणारे वाद आता मिटले आहेत. यानंतर सर्वानुमते उत्तराखंडच्या रणजीमधील सहभागाला हिरवा कंदील दर्शवला आहे.
- तसेच याआधी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मेघालय या 5 राज्यांनी आगामी रणजी करंडक स्पर्धेत आपला स्वतंत्र संघ उतरवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात रणजी क्रिकेट स्पर्धा रंगतदार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
दिनविशेष :
- 19 जून हा दिवस जागतिक सांत्वन दिन म्हणून पाळला जातो.
- 19 जून 1970 रोजी भारतीय राजकारणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्म झाला.
- महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 मध्ये झाली.
- ई.एस. वेंकटरामय्या यांनी 19 जून 1989 रोजी भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा