Current Affairs of 17 June 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 जून 2018)
अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी 150 वर्षांची प्रतीक्षा :
-
- अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळण्याची आशा असलेल्यांना त्यासाठी कदाचित 150 वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये किती ग्रीन कार्ड देण्यात आली त्यावर हे निष्कर्ष बेतलेले आहेत.
- अमेरिकेत कायमचे स्थायिक व्हावयाचे असेल आणि काम करावयाचे असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते.
- वॉशिंग्टनमधील कॅटो संस्थेने ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या संख्येवरून काही निष्कर्ष काढले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
चिनी वस्तूंवर 50 अब्ज डॉलर्सचा कर लादण्याची घोषणा :
- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात चिनी वस्तूंवर 50 अब्ज डॉलर्सचा कर लादला आहे.
- अमेरिकी व्यापार प्रतिनिधी याबाबतची अधिकृत घोषणा आज करणार आहेत. त्यासाठी काही आठवडय़ातच संघराज्य सरकारकडून अधिसूचना जारी केली जाणार आहे.
- तसेच चीननेही लगेचच अमेरिकी वस्तूंवर कर लादण्याचे सूचित केले आहे.
फडणवीसांनी अमेरिकेत दिली हायपरलूपच्या साईटला भेट :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी व्हर्जिन हायपरलूपच्या नेवाडा टेस्ट साइटला भेट दिली आहे.
- तसेच मुंबई – पुणे दरम्यान हायपर लूप ट्रेन मार्ग उभारण्यासंदर्भात महाराष्ट्राशी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीनं सहा महिन्यांपूर्वी करार केला होता.
- तर मुंबई पुणे हे अंतर हायपरलूप या अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या मार्गान अवघ्या 20 ते 25 मिनिटात पार करता येऊ शकणार आहे.
- तसेच विजेवर चालणाऱ्या हायपरलूपमुळे एक्स्प्रेस वेवरील ताण कमी होईल. व दरवर्षी दीड लाख टन इतकं वायू प्रदुषण कमी होईल असंही सरकारनं म्हटलं आहे.
- या प्रकल्पासाठी 20 हजार कोटीं रुपयांचा खर्च अपेक्षित असून दुसऱ्या कुठल्याही पर्यायापेक्षा हा स्वस्त पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता या हायपरलूप ट्रेनची असेल.
आणीबाणीतील बंदींना निवृत्ती वेतन देण्याचा विचार :
- रा. स्व. संघात उत्साह आणण्यासाठी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे.
- तर संघाच्या 1 लाख कार्यकर्त्यांना या पेन्शनचा लाभ होईल.
- तसेच आणीबाणीत मिसा व डीआरआय कायद्याखाली अनेकांची धरपकड झाली आहे. त्यांना पेन्शन देण्याच्या मोदी सरकारचा विचार आहे.
जेट विमानांत 15 किलो सामानाचे बंधन :
- जेट एअरवेजने बॅगची संख्या व वजनाबाबत नवे नियम लागू केले असून, आता 15 किलोपेक्षा अधिक सामान नेता येणार नाही.
- इकॉनॉमी क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशांना सोबत 15 किलो सामान असलेली एकच बॅग नि:शुल्क नेता येईल तर बिझनेस क्लासच्या प्रवाशांना 15 किलो वजनाच्या प्रत्येकी दोन बॅगांची मुभा असेल. तसेच जेटचे प्लॅटिनम कार्डधारकांनाही दोन बॅगा नेता येतील.
दिनविशेष :
- 1885 मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
- आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.
- 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
- 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
- राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा