Current Affairs of 18 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2017)

ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू :

  • हवाई दलाच्या ‘सुखोई-30’ प्रकारच्या 40 लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली.
  • पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
  • मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे.
  • ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. त्याचे वजन 2.5 टन असून ते ध्वनीच्या 2.8 पट वेगाने 290 किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते.

स्मिता पाटील स्मृती पुरस्कार :

  • पहिलावहिला मानाचा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2017’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार 2017’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
  • 16 डिसेंबर रोजी दिनानाथ नाट्यगृहात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • कलाकारांचा उत्साह, दिग्गजांची उपस्थिती आणि सोबतीला स्मिता पाटील यांच्या असंख्य आठवणी अशा एकंदर वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बरसुद्धा उपस्थित होता.

एक्स्प्रेस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार :

  • देशातील निवडक उत्कृष्ट पत्रकारांचा येत्या 20 डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणाऱ्या समारंभात रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड्स 2017 देऊन गौरव करण्यात येणार आहे.
  • भारतीय पत्रकारितेतील हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2006 साली या पुरस्कारांची सुरुवात केली गेली.
  • तसेच गेली कित्येक वर्षे या पुरस्कारांच्या माध्यमातून पत्रकारितेतील उत्कृष्ट गुणांचा सन्मान केला गेला आहे. पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी नेहमीच राजकीय आणि आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून समाजाचा पत्रकारितेवरील विश्वास वृद्धिंगत केला आहे.

भारतातील अल्पसंख्याकाची स्थिती चांगली :

  • पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली असल्याचे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे.
  • मातृभूमी बांगलादेशातून निर्वासित झालेल्या तस्लिमा यांना भारत हे त्यांना आपल्या घरासारखेच वाटते. इंदूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या नसरीन यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारतातील अल्पसंख्याकाबद्दल आपले मत मांडले.
  • तस्लिमा म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू आणि बौद्धांवर खूप अत्याचार होतात. मी पाकिस्तानला कधी गेलेले नाही. पण तिथे धार्मिक अल्पसंख्याकाचे बळजबरीने धर्मांतरण आणि त्यांच्यावर अन्याय केले जात असल्याचे वृत्तपत्रात वाचलेले आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली आहे. भारताचे संविधान सर्वांसाठी सारखेच आहे. भारतातील अल्पसंख्याकासमोरील सर्वच संकटे संपली हे मी म्हणणार नाही, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.

भारताचा सलग आठवा मालिका विजय :

  • कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांची प्रभावी फिरकी तसेच सलामीवीर शिखर धवन (नाबाद 100) व श्रेयस अय्यरच्या (65) अर्धशतकामुळे भारताने 17 डिसेंबर रोजी निर्णायक वनडेत श्रीलंकेवर आठ विकेटनी विजय मिळवला.
  • तसेच ही वनडे जिंकून बदली कर्णधार रोहित शर्माच्या टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारताचा हा सलग आठवा मालिका विजय ठरला.
  • डॉ. वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये ही मालिकेतील निर्णायक लढत झाली. या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर सर्वबाद 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान भारताने 33व्या षटकातच दोन बाद 219 धावांनी सहज पार करत मालिका विजय मिळविला.

दिनविशेष :

  • 18 डिसेंबर 1887 मध्ये भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर ‘भिखारी ठाकूर’ यांचा जन्म झाला.
  • एफ.एम. रेडिओचे संशोधक ‘ई.एच. आर्मस्ट्राँग’ यांचा जन्म सन 1890 मध्ये 18 डिसेंबर रोजी झाला.
  • 18 डिसेंबर 1978 रोजी डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
  • सन 1989 मध्ये 18 डिसेंबर रोजी ‘सव्यसाची मुकर्जी’ यांनी भारताचे 20 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/7HCGgLUZqUY?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.