Current Affairs of 19 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2017)

हिमाचलमध्ये भाजपची सत्ता :

  • हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे साम्राज्य खालसा करत भाजपने सत्ता मिळवली असली तरी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला आहे. ‘वैयक्तिक पराभवापेक्षा पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो. माझा पराभव होईल असे मला वाटले नव्हते. मी या पराभवाचा आढावा घेईन’, असे त्यांनी सांगितले.
  • हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. हिमाचलमध्येही 18 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. यात भाजपने 44 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसला फक्त 21 जागांवरच समाधान मानावे लागले.
  • काँग्रेसचा पराभव झाल्याने भाजपच्या गोटात उत्साह असला तरी दुसरीकडे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा दारुण पराभव झाला. धुमल हे हिमाचलच्या सुजनपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला आहे.
  • काँग्रेसचे उमेदवार रजिंदर राणा यांनी धुमल यांचा पराभव केला. ‘जनतेचा काँग्रेसवरील विश्वास या निकालातून दिसून येतो. या विजयासाठी मी जनतेचा आभारी आहे. सुजनपूरमधील जनतेची सेवा करत राहणार’, असे आश्वासन रजिंदर राणा यांनी दिले आहे.

हिंदू जागरण मंचाचा खासगी शाळांना इशारा :

  • खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांकडून नाताळच्या सणाची वर्गणी घेऊ नये. तसेच त्यांच्यावर हा सण साजरा करण्याची सक्ती करू नये, असा इशारा हिंदू जनजागरण मंचाने दिला आहे. त्यासाठी हिंदू जनजागरण मंचाकडून उत्तर प्रदेशात जिल्हा स्तरावर एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य त्या परिसरातील खासगी शाळांमध्ये जाऊन यासंबंधीचे निवेदन संस्थाचालकांना देतील.
  • खासगी शाळा या नाताळच्या सणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप हिंदू जनजागरण मंचाने केला आहे. त्यासाठी आम्ही राज्यातील प्रत्येक शाळेत जाऊन हा प्रकार त्वरीत थांबविण्याची मागणी करणार आहोत. ज्या शाळा हा आदेश जुमानणार नाहीत, त्याठिकाणी आंदोलन करण्याचे आदेशही संघटनेने जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान, सरकारने अशा कोणत्याही आदेशाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.

आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा पाचव्या स्थानी :

  • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात व्दिशतक झळकावणाऱ्या भारताच्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे.
  • आयसीसीची एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत दोन स्थानांनी बढती घेत रोहित पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
  • तसेच या क्रमवारीत रोहितने पहिल्यांदाच 800 गुणांचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-1 अशी भारताने जिंकली असून रोहितच्या खात्यात 816 गुण आहेत. यापूर्वी रोहितने फेब्रुवारी 2016 मध्ये 825 गुणांची कमाई केली होती.
  • या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली 876 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलियर्स 872 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 28व्या स्थानावरून 23व्या स्थान गाठले आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने 16 स्थानांची कमाई करत कारकीर्दीतील सर्वोत्तम 56वे स्थान पटकावले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक :

  • जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
  • भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही आपला सुवर्णपदक पटकावत महिला कुस्तीपटूंचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे.
  • साक्षीबरोबरच अन्य महिला कुस्तीपटूंनीही धमाकेदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. साक्षीने 62 किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये न्यूझिलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा 13-2 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
  • तसेच याशिवाय, भारतीय महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेमध्ये नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.

दिनविशेष :

  • मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते ‘मार्टिन ल्यूथर किंग’ यांचा जन्म सन 1899 मध्ये 19 डिसेंबर रोजी झाला.
  • भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये झाला.
  • सन 1961 मध्ये 19 डिसेंबर रोजी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
  • 19 डिसेंबर 2002 रोजी ‘व्ही.एन. खरे’ यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/9eMwlLOdOqg?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.