Current Affairs of 17 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2017)

नासाने शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला :

 • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला मोठं यश मिळालं आहे. ‘केपलर स्पेस टेलिस्कोप’द्वारे नासाने पृथ्वी इतक्याच मोठ्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत.
 • ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून 2 हजार 545 प्रकाशवर्षे दूर आहे. नवी सूर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी मोठी आहे.
 • पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
 • पण आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही ‘केप्लर 90’ नावाच्या ताऱ्याभोवती इतर ग्रह फिरताना दिसत आहेत.
 • आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह ता-यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह ता-यापासून दूर आहेत.  

ई-वे बिल यंत्रणा 1 जूनपासून कार्यान्वित :

 • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली.
 • त्यात ई-वे बिल पद्धती सुरू करण्यासाठीची संगणक यंत्रणा (सॉप्टवेअर आणि हार्डवेअर) तयार आहे की नाही याचा आढावा घेतला गेला.
 • देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी मूल्यवर्धित कर (व्हॅट) अधिकाऱ्यांकडून वाहतूकदारांना माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठीचा परवाना दिला जात असे.
 • जीएसटी लागू झाल्यापासून त्या यंत्रणेत बदल करून हा परवाना प्रत्यक्ष कागद स्वरूपात देण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ई-वे बिल) देण्याचे ठरले. मात्र त्यासाठी आवश्यक ती संगणक यंत्रणा तयार आहे की नाही ते तपासणे आवश्यक होते.
 • देशव्यापी ई-वे बिल यंत्रणा 16 जानेवारी 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास तयार असेल, असे अर्थ खात्याच्या पत्रकात म्हटले आहे.

नववधूला मिळणार मोबाईल आणि 35 हजार रुपये :

 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये लग्न करण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठीच्या योजनेत बदल केले आहेत.
 • नवीन योजनेनुसार आता सामूहिक विवाह सोहळ्यात बोहल्यावर चढणाऱ्या नववधूला तीन हजार रुपयांचा मोबाईल फोनही सरकारकडून देण्यात येईल.
 • मोबाईल फोन शिवाय लग्न करणाऱ्या मुलीला 35 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
 • सध्या ही योजना वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.
 • योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला 20 हजार रुपये रोकड दिली जाईल. हे पैसे थेट त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
 • तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असे एकूण 10 हजार रुपयांचे सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल.

एच-1बी धारकाच्या जोडीदारास अमेरिकेत नोकरी नाकारणार :

 • एच 1 बी पारपत्रधारक व्यक्तीच्या जोडीदाराला यापुढे अमेरिकेत नोकरी करता येणार नाही, असा नवीन नियम ट्रम्प प्रशासन करणार आहे.
 • ओबामा यांच्या काळात दोघांनाही नोकरीची परवानगी होती, पण आता एच 1 बी पारपत्र असलेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला काम करता येणार नाही.
 • 2015 पासून एच 1 बी पारपत्र दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जोडीदारालाही नोकरीची संधी मिळत असे.
 • एच 1 बी पारपत्रधारकांना ग्रीनकार्ड मिळण्याची सोय असून, जोडीदाराला एच 4 पारपत्र अंतर्गत काम करण्याची संधी मिळत होती, हा नियम ओबामा प्रशासनाच्या वेळी लागू होता.

दिनविशेष :

 • 1777 : फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
 • 1928 : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/v0h5cfBe2E0?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.