Current Affairs of 17 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2015)

टपाल तिकिटांवर योगासनांचे चित्र जारी करण्याचा विचार सुरू :

  • देशातील टपाल तिकिटांवरही नेहरू-गांधी यांची छबी हटवून तेथे योगासनांचे चित्र जारी करण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे.

    yoga

  • दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज टपाल तिकिटांपासून गेली 64 वर्षे वंचित ठेवलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद, राजेंद्रप्रसाद, श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून भारताच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या अनेक भारतरत्नांनाही त्यावर स्थान देण्यात येईल असे स्पष्ट केले.
  • टपाल तिकीट सल्लागार समितीने आंतरदेशीय पत्रांवरील फक्त इंदिरा गांधी यांच्या चित्राऐवजी योगासनांचे चित्र असावे याची शिफारस केली आहे.
  • तसेच टपाल तिकिटांच्या बाबतील संग्राह्य (कमेमोरेटिव्ह) व वापरात असलेली (डेफिनेटिव्ह) असे दोन प्रकार असतात.
  • यापैकी संग्राह्य तिकिटांच्या बाबतीत अनेक लोकांची नावे आढळतात.
  • मात्र प्रचलित तिकीटांबाबत नेहरू (सात वेळा), इंदिरा गांधी (चार वेळा) व राजीव गांधी (दोन वेळा) यांची तिकिटे वारंवार प्रकाशित केली गेली.

रॉबर्ट वद्रा यांचे ‘व्हीव्हीआयपी’ यादीतून नाव वगळले :

  • कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांना आता विमानतळावर सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
  • वद्रा यांचे सरकारने सुरक्षा तपासणी सवलत विशेषाधिकार यादीतून नाव वगळले.
  • प्रियांका गांधी यांचे पती तसेच उद्योगपती वद्रा यांचा अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) यादीत समावेश होता.
  • त्यामुळे विमानतळावर त्यांची तपासणी केली जात नव्हती.
  • आता विशेष सुरक्षा पथकातील (एसपीजी) व्यक्तींबरोबर प्रवास केला, तरी वद्रा यांची कसून तपासणी होऊ शकते.

“डिसलाइक”चा पर्यायही उपलब्ध करून देण्याचा फेसबुकचा निर्णय :

  • फेसबुकवर एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओला युजर्सकडून तत्परतेने “लाइक” केले जाते आता याच्या जोडीला “डिसलाइक”चा पर्यायही उपलब्ध करून देण्याचाfacebook निर्णय फेसबुकने घेतला आहे.
  • फेसबुकचे संस्थापक व कार्यकारी संचालक मार्क झुकेरबर्ग यांनी काल ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
  • गेल्या अनेक वर्षांपासून फेसबुक युजर्सकडून “डिसलाइक” पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती.

जगातील सर्वाधिक लखपतींच्या संख्येत भारत 11व्या क्रमांकावर :

  • सर्वाधिक लखपतींची संख्या असणारा भारत जगातील 11 व्या क्रमांकाचा देश बनला आहे.
  • कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-2015 च्या आकडेवारीनुसार भारतात 2014 मध्ये लखपतींची संख्या 1.98 लाखांवर पोचली आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या कमी होत जाणाऱ्या किमती आणि भारतात 30 वर्षांनी प्रथमच स्थिर सरकार आल्यामुळे भारतात लखपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • भारतात 2013 मध्ये 1.56 लाख नागरिक लक्षाधीश होते.
  • ही वाढ अशीच सुरू राहिल्यास 2017 पर्यंत एकट्या भारत आणि चीनमध्ये जगातील 10 टक्के लक्षाधीश असतील.

“मन की बात” या कार्यक्रमासाठी देशवासियांनी संदेश रेकॉर्ड करून पाठवावा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरून देशवासियांशी संवाद साधण्याच्या “मन की बात” या कार्यक्रमासाठी देशवासियांनी आपल्या आवाजातील संदेश रेकॉर्ड करून पाठवावा, असे आवाहन केले आहे.
  • ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पुढील भाग येत्या रविवारी प्रसारित होणार आहे. modi
  • देशातील नागरिकांनी ध्वनिमुद्रित केलेले संदेश या कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्यात येणार आहेत.
  • यासाठी संदेश पाठविण्याचे आवाहन मोदी यांनी केले आहे.
  • ‘मन की बात’ या कार्यक्रमात या अनोख्या पद्धतीने सहभागी होण्यासाठी mygovindia च्या चमूने विशेष प्रयत्न केल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.
  • नागरिकांना  1800 3000 7800 या नि:शुल्क दूरध्वनी क्रमांकावर फोन करून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आपला संदेश ध्वनिमुद्रित करावा असेही पुढे म्हटले आहे.

शनीच्या एनसेलॅडस या चंद्रावर पाण्याचा महासागर :

  • शनीच्या एनसेलॅडस या चंद्रावर बर्फाच्या शिखराखाली द्रव स्वरूपातील पाण्याचा महासागर आहे, असे नासाच्या कॅसिनी मोहिमेतील संशोधनात दिसून आले आहे.
  • संशोधकांच्या मते हा चंद्र शनीभोवती फिरत असून तो किंचित थरथरल्यासारखा दिसतो व त्याच्या आंतरभागातील शिखरावर बर्फाची टोपी असून त्याखाली पाण्याचा महासागर आहे.
  • तेथे काही बर्फाचे कण सापडतात. तेथे काही कार्बनी रेणूही आहेत, पाण्याच्या सागरामुळे ही स्थिती तेथे आहे.
  • यापूर्वी कॅसिनी यानाने जी माहिती गोळा केली त्यानुसार दक्षिण ध्रुवावर महासागर आहे.
  • कॅसिनीने पाठवलेल्या प्रतिमांनुसार काही नवे पुरावे सापडले आहेत.
  • कॅसिनीच्या वैज्ञानिकांनी किमान सात वर्षे एनसेलॅडस या चंद्राच्या प्रतिमांचे निरीक्षण केले असून या चंद्राची छायाचित्रे 2014 च्या मध्यावधीत कॅसिनी यानाने काढलेली आहेत. एनसेलॅडस या चंद्रावर विवरे आहेत, हा चंद्र लहान असून शनीभोवती फिरताना तो थरथरत असतो.
  • हा बर्फाळ चंद्र असून तो खूप गोलाकार नाही.
  • काही ठिकाणी या चंद्राचा वेग कमी होतो.
  • शनीभोवती फिरताना तो मागेपुढेही होतो.
  • जर पृष्ठभाग व गाभा हे जोडलेले असतील तर त्यात थरथर फार कमी प्रमाणात असते व त्याचे निरीक्षण अवघड असते, असे कॅसिनी प्रकल्पातील वैज्ञानिक मॅथ्यू टिस्कारेनो यांनी सांगितले.
  • पृष्ठभाग व गाभा यांच्या दरम्यान द्रव स्वरूपातील पाण्याचा मोठा भाग आहे.
  • इकारस या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल :

  • पुरेशा वैद्यकीय सुविधांचा भाव, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अत्यांतिक गरिबी, सकस आहार न मिळणे आदी कारणांमुळे अनेक देशांत 0-5 वयोगटातील बालकांचा मृत्यू होतो.
  • नव्वदच्या दशकात आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बालमृत्यू होण्याची संख्या अधिक होती.
  • मात्र 25 वर्षांनंतर ही परिस्थिती बदलली आहे.
  • आता जगभरातील बालमृत्यूची संख्या निम्म्याने कमी झाली आहे.
  • संयुक्त राष्ट्रांच्या बालक कल्याण कार्यक्रमाअंतर्गत बालमृत्यूबाबत एक अहवाल तयार करण्यात आला असून, त्यात ही माहिती दिली आहे.
  • 1990 मध्ये 0-5 वयोगटातील एक कोटी 27 लाख मुलांचा मृत्यू झाला होता, मात्र 2015 म्हणजेच यावर्षी हा आकडा 60 लाखांच्या खाली आहे.
  • म्हणजेच बाल मृत्युदरात 53 टक्क्यांची घट झाली आहे.
  • 1990 ते 2015 या कालावधीत जगभरातील बाल मृत्युदराची संख्या 66 टक्क्यांनी कमी करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष्य होते.
  • दररोज जगभरात 0-5 वयोगटातील 16000 मुलांचा मृत्यू होतो.
  • न्यूमोनिया, अतिसार, मलेरिया आदी विकारांमुळे बालमृत्यू होत असल्याचे चित्र आहे.
  • जगभरातील 50 टक्के बालमृत्यू कुपोषणामुळे होत आहेत.
  • जन्मत:च काही दिवसांत मृत्यू येणे हीही मोठी समस्या आहे.
  • आफ्रिका खंडात दर 12 मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. विकसित व विकसनशील देशांमध्ये दर 147 मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो.
  • सर्वाधिक बालमृत्यू असणारे देश : अंगोला, सोमालिया, चाड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक.
  • कमी बालमृत्यू असणारा देश : लक्समबर्ग, आइसलँड, फिनलँड, नॉर्वे.

दिनविशेष :

  • भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.
  • 1950 : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान यांचा जन्मदिवस.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.