Current Affairs of 18 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (18 सप्टेंबर 2015)
दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार :
- सम्राट अशोक याने चीनला भगवान बुद्धाची आठवण म्हणून पाठविलेल्या व दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
- तिबेटच्या जवळ असलेल्या चीनच्या क्विंगहाई प्रांतात या स्तूपाची प्रतिष्ठापना झाली आहे.
- भगवान बुद्धाचे अवशेष असलेल्या 19 स्तूपांपैकी हा एक आहे.
- या स्तूपाची प्रतिष्ठापना भारतीय भिक्खूने धार्मिक विधींनी केली.
- हा स्तूप बुद्ध धर्म भारतातून चीनमध्ये आल्याचे प्रतीक समजला जातो.
- या स्तूपाला अशोक खांब असून त्यात भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती आहे.
- लडाखमधील द्रूकप् वंशाचे आध्यात्मिक नेते ग्लॅयवँग द्रूकप् यांनी मूर्तीला अभिषेक करून तिची मंगळवारी प्रतिष्ठापना केली.
- आख्यायिकेनुसार अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धाला दहन करण्यात आल्यानंतर त्याच्या अनुयायांना कवटीचे एक हाड, दोन खांद्याची हाडे, चार दात आणि 84 हजार मोत्यासारखे अवशेष मिळाले.
- बुद्ध धर्माच्या नोंदीनुसार सम्राट अशोकाने शाक्यमुनींचे शरीर गोळा करून जगात ते विविध ठिकाणी पाठवायच्या आधी पॅगोडासारख्या पवित्र ठिकाणी ठेवले होते.
- चीनला त्यापैकी 19 मिळाल्याचे समजले जाते व नांगचेंग येथील स्तूप हा त्यापैकी एक आहे.
Must Read (नक्की वाचा):
मदर तेरेसा यांचे छायाचित्र अमेरिकेच्या दहा डॉलरच्या नोटेवर :
- नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांचे छायाचित्र अमेरिकेच्या नव्याने तयार केलेल्या दहा डॉलरच्या नोटेवर छापावे, अशी मागणी अमेरिकेतील ओहियो राज्याचे राज्यपाल जॉन कॅसिश यांनी केली आहे.
- कॅसिश हे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उत्सुक आहेत.
‘जाटिया हाऊस’वर बिर्लांची मोहोर :
- दक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाच्या बंगल्याची प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल 425 कोटी रुपयांना (म्हणजे 1,80,000 रुपये प्रति चौरस फूट दराने) खरेदी केली आहे.
- मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.
- उद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन जाटिया यांच्या मालकीचा हा बंगला 25000 चौरस फुटांच्या परिसरात पसरला आहे.
- जाटिया यांनी 70 च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता.
दिनविशेष :
- 1201 : रिगा शहराची स्थापना.
- 1945 : नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी यांचा मृत्यू.