Current Affairs of 16 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2015)

इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यांची टपाल तिकिटे बंद करण्याचा निर्णय :

  • माजी पंतप्रधानद्वय इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यांची टपाल तिकिटे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) दाखल अर्जामुळे हा खुलासा झाला.
  • डिसेंबर 2008 मध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार या मालिकेअंतर्गत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मृतीत टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली होती.
  • आरटीआयला मिळालेल्या उत्तरानुसार आता दीनदयाल उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांच्या स्मृतीत टपाल तिकिटे काढण्याची योजना आहे.
  • यामध्ये इंदिरा व राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यजित रे, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर तेरेसा यांची टपाल तिकिटे जारी करण्यात आली होती.

‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना :

  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली आहे.
  • तसेच या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यात येणार आहे.
  • या उपक्रमाला आणखी व्यापक दिशा देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी नाना आणि मकरंद यांनी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती.
  • या संस्थेत जमा होणाऱ्या निधीमधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 15 हजारांची मदत करण्यात येईल.
  • 2013, 14 आणि 15 या तीन वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल.
  • त्याचबरोबर दुष्काळी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे, पारंपरिक ऊर्जास्रोत शोधून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
  • निधी जमा करण्यासाठी ‘नाम’ फाउंडेशनच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्यात आले आहे.
  • इच्छुकांनी खाते क्रमांक 35226127148 वर (आयएफसी एसबीआयएन 0006319) धनादेश जमा करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन नानांनी केले.

पोलीस ठाण्यातील कामकाज होणार ऑनलाइन :

  • पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि ऑनलाइन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
  • ‘क्राइम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गुरुवारी झाला.
  • राज्यातील पोलीस दलाला आधुनिक करण्यासोबतच दर्जात्मक सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

“पेंटॅगॉन”मध्ये भारतविषयक विशेष विभागाची स्थापना :

  • भारताबरोबरील संरक्षणविषयक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अमेरिकेने वेगाने प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून “पेंटॅगॉन”मध्ये भारतविषयक विशेष विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
  • पेंटॅगॉनमधील अशा स्वरूपाचा हा पहिलाच विभाग आहे.
  • भारताबरोबर उच्च तंत्रज्ञानावर आधारित लष्करी साहित्याचा विकास आणि उत्पादन करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.
  • केथ वेब्स्टर हे या “इंडिया रॅपिड रिऍक्‍शन सेल”चे प्रमुख आहेत.
  • अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयामधील विविध विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात अधिकाऱ्यांचा समावेश या सेलमध्ये करण्यात आला आहे.

ट्वेंटी-20 मालिकेला आयसीसीची परवानगी :

  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व जादुई फिरकीपटू शेन वॉर्न यांनी ठरविलेल्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) परवानगी दिली आहे.
  • सचिन आणि वॉर्नने 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ही मालिका अमेरिकेत खेळविण्यात येणार आहे.
  • यासाठी आयसीसीची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे.
  • त्यामुळे या तीन सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्याची मान्यता असणार आहे.
  • नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या सामन्यांना आयसीसीची काही हरकत असणार नाही.
  • या मालिकेत सचिन, वॉर्नसह राहुल द्रविड, ग्लेन मॅकग्रा, जॅक् कॅलिस, ऍडन गिलख्रिस्ट, सौरव गांगुली, ब्रायन लारा, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि वसीम अक्रम यासारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.
  • याबरोबरच अमेरिकेतील काही खेळाडूंना समाविष्ट करण्यात येणार आहे.
  • विंग्रली फिल्ड (शिकागो), यांकी स्टेडियम (न्यूयॉर्क) आणि डॉडगर स्टेडियम (लॉस एन्जल्स) येथे हे तीन सामने खेळविले जाणार आहेत.

मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय :

  • प्रलंबित राहिलेला मच्छीमारांचा मुद्दा, तामिळींना न्याय, परस्परांशी व्यापारवृद्धी, संरक्षण सहकार्य आदी मुद्दय़ांबरोबरच दहशतवादाचा नि:पात करण्यासंबंधी भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी एकमत झाले.
  • श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी भेट घेऊन विविध मुद्दय़ांवर विचारविनिमय केला.

माजी बँकर माल्कम टर्नबुल यांचा ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान म्हणून शपथविधी :

  • माजी बँकर माल्कम टर्नबुल यांचा ऑस्ट्रेलियाचे दोन वर्षांतील चौथे पंतप्रधान म्हणून मंगळवारी शपथविधी झाला.
  • पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्षनेतेपदासाठी मतदान घेण्यात आले त्यात टर्नबुल यांनी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांचा पराभव केला होता.
  • टर्नबुल यांनी गतिशील अर्थव्यवस्था तसेच प्रशासनाचे खुले, सहभागात्मक प्रारूप राबवण्याचे आश्वासन दिले आहे.
  • टर्नबुल यांना गव्हर्नर जनरल पीटर कॉसग्रोव यांनी शपथ दिली.
  • टर्नबुल हे 60 वर्षांचे असून ते ऑस्ट्रेलियाला सल्लागार स्वरूपाचे नेतृत्व देणार आहेत.

दिनविशेष :  

  • जागतिक ओझोन संरक्षण दिन
  • 1963 : मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
  • 1945 : दुसरे महायुद्ध-हाँग काँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली.
  • 1955 : हुआन पेरॉन आर्जेन्टिनात पदच्युत.
  • 1963 : झेरॉक्स 914 या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.