Current Affairs of 17 June 2015 For MPSC Exams

Current Affairs on 17 june 2015

माहिती तंत्रज्ञान सेवा धोरण-2015 ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता :

 • माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरण-2015 ला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
 • या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात 10 लाखांपर्यंत रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
 • तसेच दरवर्षी एक लाख कोटींची निर्यात अपेक्षित आहे.
 • राज्य शासनाने यापूर्वी 1998 मध्ये पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर केले होते.
 • त्यानंतर रोजगार निर्मिती, कार्यक्षमतेत वाढ व जीवनमान सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरण-2003माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरण-2009 जाहीर करण्यात आले.
 • या धोरणाची वाढीव मुदत दिनांक 30 जून 2015 रोजी संपुष्टात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 16 June 2015

अतिश्रीमंत कुटुंबांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर :

 • अतिश्रीमंत कुटुंबांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या जागतिक श्रीमंत 2015 च्या अहवालातून समोर आली आहे.
 • 10 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या कुटुंबांच्या संख्येनुसार श्रीमंत देशांची वर्गवारी करण्यात आली आहे.
 • सर्वाधिक अतिश्रीमंत कुटुंबे अमेरिकेत राहत असून त्यांची संख्या 5,201 एवढी आहे.
 • त्यानंतर 1,037 संख्येसह चीनचा क्रमांक लागतो.
 • तर 1,019 संख्येसह युकेचा आणि 928 कुटुंबसंख्येसह भारताचा क्रमांक लागतो.
 • भारतानंतर 679 कुटुंब संख्येसह जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे.
 • भारतात 2013 सालामध्ये ही संख्या केवळ 284 एवढी होती.
 • आशिया-पॅसिफिकमध्ये आर्थिकवृद्धीत वाढ होत असल्यामुळे चीन आणि भारतात श्रीमंत कुटुंबांची संख्या फार झपाट्याने वाढली असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

भारत पुढील महिन्यात पुनर्वापर करता येऊ शकणाऱ्या उपग्रह प्रक्षेपकाची चाचणी करणार :

 • भारत पुढील महिन्यात पुनर्वापर करता येऊ शकणाऱ्या उपग्रह प्रक्षेपकाची चाचणी करणार असल्याची घोषणा राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केली.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही चाचणी घेणार आहे.
 • तसेच, चालू वर्षी सप्टेंबरमध्ये ऍस्ट्रोसॅट हा उपग्रहही अवकाशात झेपावणार आहे.
 • अशा प्रकारच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपकाची जुलैमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे.
 • या प्रक्षेपकामुळे खर्चात मोठी बचत होणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली.

चीनच्या सुपरसॉनिक अण्वस्त्र वाहनाची यशस्वी चाचणी :

 • चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सुपरसॉनिक अण्वस्त्र वाहनाची यशस्वी चाचणी केल्याची घोषणा केली असून.
 • वू 14 या क्षेपणास्त्र प्रणालीतील ही चौथी चाचणी आहे.

दिनविशेष :

 • 17 जूनजागतिक वंध्यत्व निवारण दिन
 • 1839 – ब्रिटीशांकीत हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांचे निधन
 • 1862 – गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंग यांचे निधन
 • 1895 – थोर समाजसुधारक, गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 18 June 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.