Current Affairs of 16 June 2015 For MPSC Exams

Current Affairs of 16 June 2015

“मोबाईल ब्लड बॅंक” ऍप कार्यान्वित

  • केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त “मोबाईल ब्लड बॅंक” ऍप सेवा कार्यान्वित केली आली आहे यामुळे जवळ असलेल्या ब्लड बॅंकेची माहिती मिळण्यास सोपे जाणार आहे.
  • राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने परवानाधारक असलेल्या 2760 ब्लड बॅंकांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
  • राजधानीमधील 76, तर देशभरात 524 ब्लॅड बॅंकांची माहिती हाती आली असून, लवकरच ती ऍप मध्ये अपलोड केली जाणार आहे.

सीबीएसईची वैद्यकीय पूर्वपरीक्षा रद्द

  • संपूर्ण देशात घेतल्या गेलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षेमध्ये (एआयपीएमटी) मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षाच रद्द केली आहे.
  • चार आठवड्यांमध्ये पुन्हा परीक्षा घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) दिले आहेत आणी त्यामुळे सुमारे 6.3 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

पुनर्उपयोगी उपग्रह प्रक्षेपकाची “इस्रो” तर्फे चाचणी

  • भारत पुढील महिन्यात पुनर्वापर करता येऊ शकणाऱ्या उपग्रह प्रक्षेपकाची “इस्रो” तर्फे चाचणी करणार असल्याची घोषणा राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केली आहे.
  • तसेच, या वर्षी सप्टेंबरमध्ये ऍस्ट्रोसॅट हा उपग्रहही अवकाशात झेपावणार आहे.

डिझेल झाले स्वस्त आणि पेट्रोल महागले

  • डिझेलच्या दरांत एक रुपया 35 पैशांनी कपात, तर पेट्रोलच्या दरांत 64 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी आज घेतला आहे.
  • मे महिन्यापासून तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे असून डिझेल मात्र गेल्या महिन्याभरात दोनदा स्वस्त झाले आहे. या दरांतील बदल आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
  • दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 66.93 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 50.93 रुपये असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. गेल्या महिन्यातील 16 मे रोजी पेट्रोल 3.13 रुपयांनी व डिझेल 2.71 रुपयांनी महागले होते.

दिनविशेष:

  • 1914: सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.