Current Affairs of 18 June 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी 18 जून 2015
‘नरेंद्र मोदी मोबाईल ऍप’ :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नागरिकांशी जोडण्यासाठी ‘नरेंद्र मोदी मोबाईल ऍप’ तयार केले असून बुधवार ते कार्यान्वित झाले आहे.
- नरेंद्र मोदी मोबाईलच्या माध्यमातून ते थेट नागरिकांपर्यंत पोचणार आहेत.
- तसेच ‘नरेंद्र मोदी मोबाईल ऍप’ मुळे नागरिकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेल पाठवून सूचना करता येणार आहेत.
- ऍण्ड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून हे ऍप वापरता येणार आहे.
- नागरिकांना त्यांच्या कल्पना, सूचना थेट पाठविता येणार आहेत. शिवाय, पंतप्रधानांशी संवाद साधता येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
मंगळावरील अवशेषांमध्ये मिथेन :
- आंतरराष्ट्रीय संशोधकांना मंगळावरील अवशेषांमध्ये मिथेन असल्याचा माग मिळाला आहे.
- मंगळाच्या पृष्ठभागाखालील काही बाबींवरून तिथे जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला पुष्टी देणारे संकेत यामुळे मिळाले आहेत.
- या अभ्यासाकरीता संशोधकांनी मंगळावरील ज्वालामुखीच्या खडकांच्या सहा अवशेषांचे नमुने तपासले.
- तर या सर्व सहा नमुन्यांमध्ये मिथेन समाविष्ट होते.
- या खडकाचा चुरा करून आणि मास स्पेक्ट्रोमीटरच्या माध्यमातून गॅस सोडून मिथेन मोजण्यात आले.
- मंगळाच्या पृष्ठभागाखालील प्राथमिक अवस्थेतील जीवांकडून या मिथेनचा खाद्याचा स्त्रोत म्हणून वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता या संशोधनामुळे ध्वनित होते.
- पृथ्वीवर ठराविक वातावरणामध्ये अल्पजीवी असणारे सूक्ष्मजीव मिथेनचा खाद्य म्हणून वापर करतात.
जपानमध्ये मतदानासाठी आवश्यक असलेल्या वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची घट :
- जपानमध्ये मतदानासाठी आवश्यक असलेल्या वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची घट करण्यात आली आहे.
- आता देशातील 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
- याआधी, ही वयोमर्यादा 20 वर्षे होती. या नव्या कायद्याची अंमलबजावणी येत्या वर्षभराच्या काळामध्ये केली जाणार आहे.
- या नव्या कायद्यामुळे जपानच्या मतदारांची संख्या सुमारे 24 लाखांनी वाढणार आहे.
- देशातील तरुण पिढीचा राजकारणामधील सहभाग वाढविण्यासाठी मतदानाची वयोमर्यादा कमी करणे आवश्यक असल्याचे मत देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
- याआधी, जपानने 1945 मध्ये मतदानासाठी आवश्यक किमान वय 25 वरुन 20 वर आणले होते.
जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे निधन :
- जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि शहर नियोजनकार चार्ल्स कोरिया यांचे मुंबईत मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.
- ते 84 वर्षांचे होते.
- वास्तुरचना क्षेत्रात केलेल्या कामासाठी कोरिया यांना 1972 साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. तर, 2006 साली त्यांना पद्मविभूषणाने गौरविण्यात आले होते.
- ‘ओपन टू स्काय’ पद्धतीला प्राधान्य देत स्थानिक तंत्राच वापर करण्याला पसंती देणाऱया कोरिया यांची नवी मुंबई शहराची उभारणी करताना प्रमुख वास्तुरचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.