Current Affairs of 17 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 17 july 2015

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूच्या दौऱ्यावर :

  • जम्मू-काश्‍मीरचे माजी अर्थमंत्री गिरधारी लाल दोग्रा यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूच्या दौऱ्यावर जाणार आहे.
  • दौऱ्यादरम्यान मोदी जम्मू-काश्‍मीरच्या विकासासाठी 70 हजार कोटींचे विकास पॅकेजही जाहीर करण्याची शक्‍यता आहे.
  • जन्मशताब्दी समारंभ जम्मू विद्यापीठातील जनरल झोरावर सिंह सभागृहात आयोजित केला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 16 जुलै 2015

गुरू या ग्रहाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका ग्रहाचा शोध :

  • गुरू या ग्रहाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका ग्रहाचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे.
  • आपल्या सौरमालेबाहेर असलेल्या या ग्रहाचे वस्तुमान साधारणत: गुरूइतकेच आहे.
  • याशिवाय गुरू व सूर्यामधील अंतराइतकेच अंतर हा ग्रह फिरत असलेल्या ताऱ्यामध्ये व या ग्रहामध्ये असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
  • ‘एचआयपी 11915’ या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत असून, ताऱ्यामध्ये व सूर्यामध्येही कमालीचे साधर्म्य दिसून आले आहे.
  • “एचआयपी 11915” चे वयही सूर्याइतकेच असल्याचे आढळून आले आहे.
  • पृथ्वी असलेल्या सौरमालेमध्ये गुरू ग्रहाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
  • गुरूमुळेच ही सौरमाला अस्तित्वात येऊ शकल्याचे काही संशोधकांचे मत आहे.

भारतीय नौदलासाठी युद्धनौका बांधण्यासाठी रशिया सरकारसोबत करार :

  • भारतीय नौदलासाठी युद्धनौका बांधण्यासाठी “पिपाव्हेव डिफेन्स” या कंपनीने नुकताच रशिया सरकारसोबत एक करार केला आहे.

  • हा करार सुमारे 3 अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
  • युद्धनौका बांधण्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपनीला मिळालेला आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार आहे.
  • “रिलायन्स इन्फ्रा” ने काही दिवसांपूर्वी “पिपाव्हेव डिफेन्स”ची खरेदी केली आहे.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.