Current Affairs of 18 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 18 July 2015

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी कोटींचा करार :

  • देशभरातील शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डीडी किसान‘ चॅनेलची सुरूवात केली आहे.Amitabh Bachan
  • शेतक-यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या चॅनलच्या जाहिरातीसाठी सरकारने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी तब्बल 6.31 कोटींचा करार केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
  • ‘डीडी किसान’ चॅनेलसाठी फक्त 45 कोटी रुपयांचे बजेट असतानाही तब्ब्ल 6 कोटी एकट्या अमिताभ यांच्यावर खर्च करण्यात आला आहे.
  • दरम्यान या जाहिरातीसाठी अमिताभ यांच्याआधी अभिनेता अजय देवगण व काजोल यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता.
  • दूरदर्शनच्या पॅनेलमध्ये असणा-या ‘लिंटास इंडिया प्रा. लि’ या एजन्सीतर्फे सरकार व अमिताभ बच्चन यांच्या दरम्यान 30 एप्रिल 2016 पर्यंत करार करण्यात आला आहे.
  • या करारानुसार अमिताभ टी.व्ही, प्रिंट, इंटरनेट व सिनेमासाठीच्या ‘जाहिरातीत’ झळकणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जुलै 2015)

केरळमध्ये फक्त महिलांसाठी बससेवा :

  • केरळमध्ये सर्व महिला स्पेशल टॅक्सीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता केरळातील जेंडर पार्क या सरकारी मालकीच्या स्वायत्त संस्थेने ‘शी बस’ ही केवळBUS महिलांनी महिलांसाठी चालवलेली बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
  • ‘शी टॅक्सी’ या उपक्रमाचे देशभर कौतुक झाले, कारण त्यामुळे महिलांना चोवीस तास सुरक्षित टॅक्सी सुविधा सुरू झाली.
  • या सेवेचे जागतिक बँकेनेही कौतुक केले आहे व त्यांच्या शाश्र्वत उद्योजकतेसाठी गौरव केला आहे.
  • अलीकडे टॅक्सी व बसगाड्यांमधील बलात्कारांचे गुन्हे वाढल्याने या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
  • जेंडर पार्कने राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या नेतृत्वाखाली ही सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे.
  • तिरूअनंतपुरम येथे पहिली सेवा दिली जाईल नंतर ती कोची व कोझिकोड येथे विस्तारली जाईल.
  • या गाड्या वातानुकूलित व महिला स्नेही असतील. महिलांशीवाय मुलेही त्यातून प्रवास करू शकतील.

दिनविशेष :

  • 1635 – इंग्रज भौतिकीविज्ञ रॉबर्ड हुक यांचा जन्म.upagrah
  • 1857मुंबई विद्यापीठाची स्थापना.
  • 1925 – अॅडॉल्फ हिटलर यांच्या ‘माईन काम्फ’ (माझा लढा) या आत्मचरित्राची पहिली आवृती प्रकाशित.
  • 1980 – स्वदेशी बनावटीचा रोहिणी उपग्रह श्रीहरीकोटा केंद्रावरून अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आला.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.