Current Affairs of 16 July 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी 16 जुलै 2015
इराणसमवेतच्या अणुकरारास मंजुरी :
- इराणसमवेतच्या अणुकरारास मंजुरी मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा समिती पुढील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
- मात्र, शस्त्र आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर बंदी कायम राहण्याचे राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाने इराणच्या अणुकराराचा मसुदा सुरक्षा समितीच्या 15 सदस्यांना वितरित केला.
- व्हिएन्ना येथे झालेल्या ऐतिहासिक करारानुसार नियंत्रणाच्या मुद्द्यावर तडजोड करण्यात आली.
- संयुक्त राष्ट्रसंघाचे निरीक्षक इराणच्या लष्करी तळांना नियमित भेट देऊन त्याची तपासणी करतील, असे ठरविण्यात आले.
- तसेच त्याबदल्यात राष्ट्रसंघ, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रसंघ हे इराणवरील निर्बंध उठवतील.
Must Read (नक्की वाचा):
चॅम्पीयन्स लीग ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा रद्द :
- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघांवर दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पीयन्स लीग ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
- तसेच याबाबतचा निर्णय बीसीसीआय, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळांना कळविण्यात आला आहे.
- यावर्षी पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये होणार होती. पण, आता ही स्पर्धा होणार नाही.
- सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रॅंचाईजी संघांना स्पर्धेतून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
- त्याच वेळी सट्टेबाजांशी असलेल्या संबंधांवरून दोन्ही संघांचे मुख्य पदाधिकारी गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांच्यावर तहहयात बंदी घालण्यात आली आहे.
भारतातील 100 कंपन्यांची अमेरिकेत गुंतवणूक :
- भारतातील मोठ्या 100 कंपन्यांनी अमेरिकेतील 35 राज्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत 15 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षाही जास्त नव्या नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
- भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि ग्रँट थॉर्नटनच्या (जीटी) ‘इंडियन रुटस्,अमेरिकन सॉईल’ नावाच्या या अहवालात टेक्सास या दक्षिण प्रांतात भारतीय कंपन्यांनी सर्वाधिक 3 अब्ज 84 कोटी डॉलरची विदेशी गुंतवणूक केली असल्याचे म्हटले आहे.
- त्यानंतर पेनसिल्व्हानिया 3 अब्ज 56 कोटी डॉलर, मिनिसोटा 1 अब्ज 80 कोटी डॉलर, न्यूयॉर्क 1 अब्ज 10 कोटी डॉलर आणि 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक न्यू जर्सीमध्ये झाली आहे.
- कॅपिटोल हिल येथे मंगळवारी हा अहवाल जाहीर करण्यात आला.
- तसेच अमेरिकेच्या 50 राज्यांत भारतीय कंपन्यांनी केलेली गुंतवणूक ही सरासरी 44.3 अब्ज डॉलरची झाली आहे.
राष्ट्रीय कौशल्य मिशनचा प्रारंभ :
- लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य मिशनचा प्रारंभ करण्यात आला आहे.
- देशात असंघटित क्षेत्रात 44 कोटी अप्रशिक्षित लोक काम करीत असून त्यातील 47 टक्के कृषी क्षेत्रात तर 53 टक्के लोक अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
- याशिवाय दरवर्षी 10 लाख नवे अप्रशिक्षित कामगार देशाच्या श्रमशक्तीशी जोडले जात आहे.
- अशा कौशल्य विद्यापीठ स्थापन करून युवकांना रोजगारपूरक प्रशिक्षण देऊन उद्योग आणि स्वयंरोजगारायोग्य बनविले जाईल.
- भारतात कुशल कामगारांची संख्या केवळ 3.5 टक्के आहे तर दक्षिण कोरियात ही संख्या 96 आणि जर्मनीत 74 टक्के आहे.
सय्यद हैदर रजा यांना ‘द लिजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान :
- आधुनिक भारतीय चित्रकार सय्यद हैदर रजा यांना ‘द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- चित्रकलेतील अनोख्या उपलब्धींबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
- फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मंगळवारी रात्री फ्रान्सच्या दिल्लीतील दूतावासात आयोजित कार्यक्रमात राजदूत फ्रेंकोई रिचियर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
- हा सन्मान फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून दिला जातो.
- तसेच ज्यांनी जगाला सुंदर बनविण्यात योगदान दिले अशा व्यक्तींना हा पुरस्कार बहाल केला जातो.
न्यू होरायझन्स यानाने पृथ्वीवर फोन करून मोहीम यशस्वी झाल्याचा दिला संदेश :
- अमेरिकेच्या नासा संघटनेने साडेनऊ वर्षांपूर्वी प्लुटो ग्रहावर पाठविलेले न्यू होरायझन्स यान 4.88 अब्ज कि.मी. चा प्रवास पूर्ण करून प्लुटोजवळ पोहोचले व प्लुटोला ओलांडून पुढे गेले.
- प्लुटोजवळून गेल्यानंतर या यानाने पृथ्वीवर फोन करून मोहीम यशस्वी झाल्याचा संदेश दिला आहे.
सुपरसॉनिक विमान तयार :
- बोस्टनमधील मूळ भारतीय शास्त्रज्ञासह अमेरिकन शास्त्रज्ञांच्या गटाने न्यूयॉर्क ते लंडन हा प्रवास केवळ तीन तासांत पार करणारे स्वनातीत (सुपरसॉनिक) विमान तयार केले आहे.
- स्पाईक एअरोस्पेसने 2013 मध्ये एस-512 हे स्वनातीत विमान सादर केले होते, यामध्ये कंपनीने नुकतेच आणखी बदल केले आहेत.
- या बदलांमुळे हे विमान आणखी वेगवान झाले असून, आता एस-512 हे 2205 किमी/प्रतितास इतका वेग गाठू शकते. हा वेग आवाजाच्या 1.8 पट आहे.
- या विमानासाठी खास प्रकारची ‘डेल्टा’ विंग्स (पाती) तयार करण्यात आली आहेत, यामुळे विमानाची कार्यक्षमता वाढली आहे.
- तसेच ही पाती कमी वेगाच्या विमानासाठीही उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. विमानासाठी तयार करण्यात आलेली नवी शेपूटही अत्यंत कमी वजनाची असून, वळण्यासाठी तसेच उड्डाणावेळी ती विमानाला मदतनीस ठरत आहे.
- एस-512 हे एक व्यावसायिक श्रेणीतील जेट असून, ते तयार करण्यासाठी सहा कोटी ते आठ कोटी अमेरिकन डॉलर एवढा खर्च आला आहे.
- जगातील वेगवान प्रवासी विमाने :
- ट्युपोलेव्ह टीयू-144 : 2430 किमी/प्रतितास
- कॉन्कर्ड : 2179 किमी/प्रतितास
- सेस्ना सायटेशन एक्स : 1126 किमी/प्रतितास
पंतप्रधान 17 जुलैला काश्मीर दौऱ्यावर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 जुलैला जम्मू काश्मीरच्या एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.
- माजी काँग्रेस नेते गिरीधारीलाल डोगरा यांच्या जयंतीनिमित्त जम्मूमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील.
- डोगरा हे जम्मू भागातील कठुआ जिल्ह्याशी संबंधित नेते होते. डोगरा यांची मुलगी अर्थमंत्री अरुण जेटली यांची पत्नी आहे.
- पंतप्रधान आपल्या दौऱ्यानिमित्त जम्मू काश्मीरच्या विकासासाठी 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. जम्मूमध्ये एम्सच्या स्थापनेबाबतही मोदींकडून घोषणेची शक्यता आहे.