Current Affairs of 15 July 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी 15 जुलै 2015
सेवा हमी कायदा विधेयक मंजूर:
- भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि जनतेला सेवा मिळण्याचा हक्क देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (सेवा हमी कायदा) हे विधेयक मांडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- तसेच यासंदर्भात 110 सेवा अधिसूचित केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
- तर विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे.
- या कायद्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी येणार असून, ते काम न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
- अधिसूचित केलेल्या सेवा ठरविलेल्या कालमर्यादेत उपलब्ध होणार असल्याने, प्रशासनामध्ये उत्तरदायित्व, जबाबदारी व पारदर्शकता येईल.
- या कायद्यामुळे जनतेला सेवा मिळवून देण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
- तसेच लोकांना त्यांच्या कामाची माहिती ई-सिस्टिमद्वारे मिळेल.
Must Read (नक्की वाचा):
आंतरराष्ट्रीय निरीक्षणास मान्यता :
- पाश्चात्त्य देश आणि इराणदरम्यानचा आण्विक करार मसुदा मंजूर करण्यात आला आहे.
- या करारामुळे इराणवरील निर्बंध उठविले जाणार असून, त्यांच्या अणू कार्यक्रमालाही लगाम घालण्यात आला आहे.
- तसेच अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि इराण यांच्यात हा मसुदा मान्य झाला असून, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत त्याला मान्यता देण्यात येईल.
चित्रपट संगीतकार एम.एस. विश्वनाथन यांचे निधन :
- प्रसिद्ध तामिळ चित्रपट संगीतकार एम.एस. विश्वनाथन यांचे निधन झाले.
- ते 88 वर्षांचे होते.
- विश्वनाथन यांनी एकूण 1700 चित्रपटांना संगीत दिले होते.
प्लुटोचा आकार अंदाजापेक्षा मोठा असल्याचे स्पष्ट :
- प्लुटो हा ग्रह अंदाजापेक्षा आकाराने खूप मोठा असल्याचे यानाने केलेल्या निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.
- नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने अनेक वर्षे प्रवास करून प्लुटोला गाठले.
- प्लुटोचा व्यास 2370 किलोमीटर असल्याचे नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.
- लाँग रेंज रेकनसान्स इमेजर (लोरी) या अवकाशयानावर लावलेल्या कॅमेऱ्याने प्लुटोची जी छायाचित्रे टिपली आहेत त्यावरून ही बाब सामोरी आली आहे. 1930 मध्ये या ग्रहाचा शोध लागला होता.
- तसेच नव्या माहितीनुसार प्लुटोचा आकार मोठा असून घनता मात्र कमी आहे व त्याच्या अंतर्भागात असलेला बर्फाचा संचय काही प्रमाणात जास्त असून त्याचे ट्रोपोस्फिअर हे जास्त खोल आहे.
गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजन्म बंदी :
- निवृत्त सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंबंधित चौकशीचा अहवाल मंगळवारी जाहीर केला.
- या अहवालांतर्गत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीने गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजन्म बंदी घातली असून, त्यांची मालकी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बाद केले आहे.
सर्वाधिक पोलादनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसर्या स्थानी :
- सर्वाधिक पोलादनिर्मिती करणाऱ्या देशांच्या स्पर्धेत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले असून, आगामी दहा वर्षांमध्ये 30 कोटी टन पोलादनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
- त्यासाठी मंत्रालयाने 2025 पर्यंतचा रोडमॅपही आखला आहे.
- जानेवारीच्या सुरुवातीला पोलादनिर्मितीमध्ये देश चौथ्या स्थानावर होता.
- त्यापुढे अव्वल स्थानावरील चीन, जपान आणि अमेरिका यांचाच क्रमांक होता. मात्र, जानेवारी ते जून 2015 या कालावधीत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे.
- देशात पोलादाचा दरडोई वापर बराच कमी आहे. जगभरात पोलादाचा दरडोई वापर 216 किलो आहे, तर देशात हाच वापर 60 किलो इतका आहे.
दिनविशेष :
- 1955 – पं. जवाहरलाल नेहरू यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान.