Current Affairs of 17 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (17 फेब्रुवारी 2017)

लॉरेस जागतिक पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडुंची निवड :

 • क्रीडा विश्‍वातील महान धावपटू उसेन बोल्ट आणि जिम्नॅस्ट सिमोनी बिल्स यांची प्रतिष्ठेच्या लॉरेस जागतिक पुरस्कारात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
 • खेळामधील ‘ऑस्कर’ म्हणून या पुरस्कारांची ओळख आहे. बोल्टने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी बोल्ट 2009, 10 आणि 13 मध्ये या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
 • टेनिसपटू रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, साहसी क्रीडापटू केली स्लॅटर यांनीही हा पुरस्कार यापूर्वी चार वेळा पटकावला आहे.
 • बोल्टला सर्वकालिक सर्वोत्तम धावपटू मायकेल जॉन्सनच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • बोल्टप्रमाणेच ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणारी सिमोनी बिलेस महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली. रियो ऑलिंपिकमध्ये तिने चार सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदके मिळविली.
 • ऑलिंपिकमधील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सला जोरदार पुनरागमन करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पुनरागमनाच्या स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदकांची कमाई केली.
 • ‘फॉर्म्युला वन’ मधील जगज्जेता निको रॉसबर्ग यालदेखील ‘ब्रेक थ्रू ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये उपविजेता राहिल्यानंतर गेल्यावर्षी रॉसबर्गने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली होती.

भारताचा पहिला पिकलबॉल संघ सज्ज :

 • गेल्या काही वर्षांमध्ये चांगल्याप्रकारे प्रसार झालेल्या पिकलबॉल या अनोख्या क्रीडाप्रकाराने भारतात आपला मजबूत जम बसवला आहे.
 • 2007 साली भारतीयांना ओळख झालेल्या या खेळाचा पहिला आंतरराष्ट्रीय संघ सज्ज झाला असून 1819 फेब्रुवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी 23 सदस्यांचा भारतीय संघ 17 फेब्रुवारीला बँकॉक (थायलंड) येथे रवाना होणार आहे.
 • बँकॉक येथील सँटीसुक इंग्लिश स्कूलच्या वतीने ‘बँकॉक खुल्या पिकलबॉल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यास्पर्धेसाठी भारतातील 23 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
 • विशेष म्हणजे, भारताच्या या पहिल्या वहिल्या संघामध्ये 5 मुंबईकरांचा समावेश असून राजस्थानचे सर्वाधिक 10 खेळाडू भारतीय संघात आहेत.
 • बिहारच्या रंजन कुमार गुप्ताकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून तो पिकलबॉल राष्ट्रीय संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे.

ई. पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री :

 • तामिळनाडूत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अखेर ई पलानीस्वामी यांनी 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
 • राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 • बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची रवानगी तुरुंगात झाली. मात्र तुरुंगात जाण्यापूर्वी शशिकलाने तिच्याशी निष्ठावंत असलेल्या पलानीस्वामी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली.
 • तसेच पनीरसेल्वम यांच्या मत्रिमंडळातील 31 मंत्र्यांना कायम ठेवले जाईल अशी माहिती आहे.
 • राज्यपालांनी पलानीस्वामी यांना 15 दिवसात तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
 • ई. पलानीस्वामी यांनी पक्षाच्या समर्थक आमदारांची स्वाक्षरी असलेले एक पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

पाकिस्तान हे सर्वात धोकादायक देश :

 • पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था, दहशतवाद आणि वेगाने वाढणारा अण्वस्त्र साठा यामुळे उत्पन्न होणाऱ्या संभाव्य धोक्यांनी पाकला सर्वात धोकादायक देश बनविले, असे अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएच्या माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
 • पाकिस्तान अपयशी ठरला, तर जगासमोर संकट उभे ठाकू शकते, असा इशारा सीआयएचे इस्लामाबादेतील माजी केंद्रप्रमुख केविन हल्बर्ट यांनी दिला आहे.
 • पाकिस्तान एका अशा बँकेसारखा आहे जो एवढा मोठा आहे की, अपयशी व्हायला नको किंवा एवढा मोठा आहे की, त्याला कोणी अपयशी होऊ देणार नाही. कारण, तो अपयशी ठरला, तर त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विध्वंसक परिणाम होऊ शकतो.

दिनविशेष :

 • भारतात 17 फेब्रुवारी(1836) हा दिवस ‘स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती’ म्हणून साजरा करतात.
 • गुणधर्माचे अभ्यासकपरमाणू रचनाकार ‘ऑटोस्टर्न’ यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1888 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.