Current Affairs of 18 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2017)

विश्व बँडमिंटन मानांकनात पी.व्ही. सिंधू पाचव्या स्थानी :

  • ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता पी.व्ही. सिंधू बीडब्ल्यूएफ विश्व मानांकनामध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
  • गेल्या महिन्यात सैयद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकाविणाऱ्या सिंधूने कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे मानांकन पटकाविले आहे.
  • क्रमवारीत सर्वोत्तम मानांकन असलेली ती भारतीय खेळाडू आहे. हैदराबादच्या या 21 वर्षीय खेळाडूच्या नावावर 69399 मानांकन गुणांची नोंद आहे.
  • तसेच या व्यतिरिक्त सायना नेहवाल अव्वल दहामध्ये समावेश असलेली दुसरी भारतीय खेळाडू आहे. ती नवव्या स्थानी आहे.
  • पुरुष एकेरीमध्ये अजय जयराम 18 व्या, के. श्रीकांत 21 व्या आणि एस.एस. प्रणय 23 व्या स्थानी आहेत.

भारतीय महिला संघाचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश :

  • कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज मोना मेश्राम या दोघींच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्स लढतीत बांगला देशचा 99 चेंडू आधीच नऊ गड्यांनी पराभव करीत मुख्य फेरी गाठली.
  • महिला विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये 24 जून ते 23 जुलै या कालावधीत होणार आहे.
  • भारताची कर्णधार मिताली राजने बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 50 षटकांत 8 बाद 155 धावांवर रोखले.
  • पद्यूत्तरदेत भारताकडून मितालीने नाबाद 73 आणि मोना मेश्रामने नाबाद 78 धावा ठोकून दुसऱ्या गड्यासाठी 136 धावांची भागीदारी करताच 33.3 षटकांत एक बाद 158 धावांवर विजय साकार झाला.
  • तसेच साखळीत सर्वच सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सुपरसिक्समध्ये चार सामन्यांतून आठ गुण झाले. त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

ज्येष्ठ पत्रकार युधिष्ठिर जोशी कालवश :

  • ज्येष्ठ पत्रकार युधिष्ठिर उपाख्य बाबासाहेब जोशी (वय 81 वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
  • 14 डिसेंबर 1936 रोजी भंडारा येथे जन्मलेले जोशी यांनी सुरुवातीला शिक्षकी पेशा पत्करला. त्यांनी 1960 च्या दशकात नाशिकच्या गावकरीमध्ये पत्रकारितेला प्रारंभ केला.
  • लोकमतचे संस्थापक बाबूजी जवाहरलाल दर्डा यांनी त्यांना नागपूर लोकमतमध्ये आणले. तेथे एक दशकभर पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी नागपूर पत्रिका, जनवाद, गावकरीचे संपादक म्हणून पुढे काम पाहिले.
  • भरपूर वाचन त्याला निर्भीड लेखनाची जोड देत ते पत्रकारितेत दीर्घकाळ सक्रिय राहिले.
  • सामाजिक व राजकीय घडामोडींवर त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले. निवृत्तीनंतरही त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन सुरूच ठेवले होते.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक मतदान परभणीत :

  • 15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांसाठी राज्यात 16 फेब्रुवारी रोजी सरासरी 68.41 टक्के मतदान झाले.
  • सर्वाधिक 74.47 टक्के मतदान हे परभणी जिल्हा परिषदेसाठी झाले. या निवडणुकीसाठी 4 हजार 289 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांत कमी मतदान जळगावमध्ये (63.29) झाले.
  • मतदानाची जिल्हानिहाय टक्केवारी –
  • अहमदनगर 67.67, औरंगाबाद 70.22, बीड 70.35, बुलडाणा 67.58, चंद्रपूर 70.02, गडचिरोली 71.44, हिंगोली 73.77, जळगाव 63.29, जालना 70.69, लातूर 64.70, नांदेड 69.61, उस्मानाबाद 65.20, परभणी 74.47, वर्धा 67.25, यवतमाळ 68.63.
  • तसेच या मतदानाचा निकाल 23 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

दिनविशेष :

  • न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1842 मध्ये झाला.
  • 18 फेब्रुवारी 1944 मध्ये भारतीय ज्ञानपीठाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.