Current Affairs of 16 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2017)

एस. स्वामिनाथन यांना MRSI-ICSC पुरस्कार प्रदान :

 • मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या (MRSI-ICSC) वतीने देण्यात येणारा ‘उच्च वाहकता आणि पदार्थ विज्ञान’ वार्षिक पुरस्कार यंदा नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्राचे (CeNTAB) संचालक एस. स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला.
 • मुंबईतील IIT येथे आयोजित MRSI-ICSC संस्थेच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश दास यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला.
 • स्वामिनाथन हे सास्त्र विद्यापीठाच्या प्रायोजित संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहत आहेत.
 • स्वामिनाथन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी ‘सास्त्र’ नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्रामध्ये (CeNTAB) केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि सैद्धांतिक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

धुळ्यामध्ये उभारणार पहिला जैवकचरा विघटन प्रकल्प :

 • जिल्ह्यातील सुमारे 1 हजार लहान-मोठ्या दवाखान्यांमधील बायोमेडिकल (जैविक कचरा) कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खान्देशातील पहिला शासकीय प्रकल्प धुळ्यात उभारला जाणार आहे.
 • तसेच त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
 • जिल्ह्यात सध्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही़ काही खासगी संस्थांकडून हा कचरा संकलित केला जात असला तरी त्यावर अधिक खर्च येतो़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाला ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे विजेतेपद :

 • कलाप्रकारांच्या दमदार सादरीकरणाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने 32 व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उपविजेते ठरले. यजमान शिवाजी विद्यापीठाला शोभायात्रेतील उत्कृष्ट सादरीकरणाबाबत चौथा क्रमांक मिळाला.
 • शिवाजी विद्यापीठात गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या, तरुणाईच्या कलाविष्काराने बहरलेल्या युवा महोत्सवाचा जल्लोषी वातावरणात 14 फेब्रुवारी रोजी समारोप झाला.
 • अभिनेते सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
 • महोत्सवातील सर्वसाधारण विजेतेपदाच्या गटात अमृतसरची गुरुनानक युनिव्हर्सिटी तृतीय, तर पंजाबची लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने चौथा क्रमांक मिळविला.
 • शोभायात्रेत आंधप्रदेशच्या कृष्णा युनिव्हर्सिटीने प्रथम, आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटीने व्दितीय, हरियाणाच्या कुरूक्षेत्र विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळविला.

49व्या अखिल भारतीय क्रीडा महोत्सवात दक्षिण विभागाचे वर्चस्व :

 • दक्षिण विभागाच्या अमन बेल्गुने पूर्व विभागाच्या सायान पॉलचा 4-2 असा पराभव करत 49व्या अखिल भारतीय मध्य क्रीडा महोत्सवात पुरुष एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवले.
 • तर महिला गटात दक्षिण विभागाच्या एन. विद्याने पूर्व विभागाच्या मेधा मोईत्रावर 4-1 असा विजय मिळविला.
 • गोरेगाव स्पोटर्स क्लबमध्ये 15 फिब्रुवारी रोजी झालेल्या टेबल-टेनिसच्या अंतिम सामन्यात अमनला पहिले दोन गेम गमवावे लागले. पॉलने प्रभावी खेळ करत 11-8, 11-9 असे गेम जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली.
 • मात्र यानंतर अमनने पॉलला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. अमनने दमदार खेळ करत उर्वरित गेममध्ये 11-9, 11-8, 11-8, 11-8 असा विजय मिळवला.
 • महिला एकेरीत देखील दक्षिण विभागाचे वर्चस्व राहिले. विद्याने पूर्व विभागाच्या मेधाचा 11-2, 10-12, 11-4, 12-10, 11-8 असा पराभव करत बाजी मारली.

दिनविशेष :

 • 16 फेब्रुवारी 1745 रोजी थोरल्या माधवराव पेशव्यांचा जन्म झाला.
 • रँगलर परांजपे यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1876 रोजी झाला.
 • बोटांच्या ठशांचे वेगळेपण सिध्द करणाऱ्या ‘सर फ़्रान्सिस गाल्टन’ यांचा 16 फेब्रुवारी 1822 हा जन्मदिन आहे.
 • 16 फेब्रुवारी 1944 हा दादासाहेब फाळके यांचा स्मृतिदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.