Current Affairs of 16 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 मे 2016)

चालू घडामोडी (16 मे 2016)

टीसीएस वर्ल्ड 10 के शर्यतीत स्वाती गाढवे प्रथम :

  • मोसिनेट गेरेमेव आणि पेरेस जेपचिरचिर यांनी (दि.15) येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड 10 के शर्यतीत अव्वल स्थान मिळवले.
  • भारतीय महिलांच्या गटात पुण्याच्या स्वाती गाढवेने पहिला क्रमांक पटकावला.
  • दुसऱ्या क्रमांकावर नाशिकच्या संजिवनी यादवने हक्क गाजवला.
  • स्वातीने सुरवातीपासूनच आघाडी कायम ठेवत दहा कि.मी.चे अंतर 34.45 मिनिटात पूर्ण केले.
  • संजिवनीने 36.13 मिनिटात ही शर्यत पूर्ण केली. 37018 मिनिटात शर्यत पूर्ण करणारी मिनू तिसऱ्या क्रमांकावर राहीली.
  • 8 किलोमीटरचे अंतर गेरेमेवने 8.36 मिनिटात पार केले. ही शर्यत त्याने दुसऱ्यांदा जिंकली आहे.
  • ट्रॅकच्या अंतिम लॅपपर्यंत गेरेमेव केनियाच्या जॉन लँगट आणि बोंसा डिडा यांच्या मागे पडला होता.
  • परंतु निर्णायक क्षणी एका सेकंदाने दोघांना मागे टाकून गेरेमेवने 23 हजार डॉलर्स बक्षिसावर आपला हक्क सांगितला.
  • शर्यतीनंतर गेरेमेव म्हणाला की, यंदा तापमान जास्त असल्याने ही शर्यत थोडी अवघड होती, पण गेल्यावर्षापासूनच ही शर्यत जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता.
  • विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियन केनियाच्या जेपचिरचिरने 32.15 मिनिटात शर्यत जिंकली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मे 2016)

सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जगातील सर्वांत सुंदर फुल उमलतात :

  • आपल्या आजूबाजूला गुलाब, मोगरा, जाईजुई अशी किती तरी सुंदर फुलं आहेत.
  • पण ऑर्किडला जगातील सर्वाधिक सुंदर फुलाचा मान मिळालेला आहे.
  • तसेच या फुलाचे 4 प्रकार जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नाणेघाटजीवधन किल्ल्याच्या जंगलात आढळले आहेत.
  • ऑर्किड्सची फुलांची मोठी गंमत म्हणजे ही फुले झाडावर उलटी लागतात. म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. ही फुले एवढी मनमोहक असतात की, कोणीही सहज आकर्षित होतं.
  • खोडद (ता. जुन्नर) येथील वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले की काही ऑर्किड्स काही मीटरपर्यंत वाढतात.

डब्ल्यूटीए इटालियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद :

  • भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी (दि.15) येथे एका संघर्षपूर्ण सामन्यात इकटेरिनाम मकरोव्हा आणि इलेना वेसनिना या जोडीचा पराभव करीत डब्ल्यूटीए इटालियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
  • तसेच या जोडीचे क्ले कोर्टवरील हे पहिले विजेतेपद ठरले.
  • सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने मकरोव्हा आणि वेसनिना या सातव्या मानांकित रशियन जोडीवर दीड तास रंगलेल्या लढतीत 6-1, 6-7, 10-3 असा विजय मिळवला.
  • विम्बल्डन, यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या सानिया आणि हिंगीस यांचे लक्ष आता फ्रेंच ओपन जिंकून सलग चार ग्रँडस्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याकडे आहे.

    सानियाचे हे 37 वे दुहेरी विजेतेपद आहे तर हिंगीसने 55 वे अजिंक्यपद पटकावले. या दोघींचे या

  • सत्रातील पाचवे विजेतेपद आहे.

मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प :

  • राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे.
  • तसेच त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही मच्छीमारांची मोठी समस्या बनली आहे.
  • यावर मात करत वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे 450 सभासदांनी एकमताने निर्णय घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी वेसावकरांना आधारवड ठरणारा आणि राज्यातील समुद्रकिनारी असलेला पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे.
  • रोज 24 तास हा जलशुद्धप्रकल्प सुरू असतो आणि येथील मच्छीमार बांधवांनादेखील यामुळे रोजगार मिळाला आहे.
  • येथील मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्राची यशस्वी चाचणी :

  • संपूर्णपणे बहुस्तरीत बॅलिस्टिक मिसाईल सुरक्षा प्रणाली प्राप्त करण्याच्या प्रयत्नांतर्गत भारताने (दि.15) स्वदेशी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली.
  • तसेच हे क्षेपणास्र त्याच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही शत्रू क्षेपणास्राला हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.
  • उड्डाणाच्या स्थितीत इंटरसेप्टरच्या अनेक मापदंडांची वैधता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णत: यशस्वी राहिली, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी सांगितले.
  • या इंटरसेप्टरसाठी पृथ्वी क्षेपणास्राच्या नौदल आवृत्तीला लक्ष्य म्हणून समोर ठेवण्यात आले होते.
  • बंगालच्या उपसागरात उभ्या असलेल्या युद्ध नौकेवरून हे क्षेपणास्र डागण्यात आले.
  • लक्ष्यरूपी क्षेपणास्र सकाळी 11.15 वाजता डागण्यात आले आणि इंटरसेप्टर अ‍ॅडव्हॉन्स्ड एअर डिफेन्स क्षेपणास्त्र अब्दुल कलाम बेटावर तैनात करण्यात आले होते.

इस्रोने तयार केले स्वत:चे अवकाशनयान :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच स्वत:चे अवकाशयान तयार केले आहे.
  • अवकाशयानासाठी आवश्‍यक असलेल्या पंख्यासह प्रमुख भागाचे (रियुजेबल लॉंच व्हेईकल-आरएलव्ही) वजन आणि आकार हा एसयुव्ही वाहनाएवढा असून या भागावर अंतिम हात फिरविला असून श्रीहरीकोटा येथे तो उड्डाणाच्या प्रतिक्षेत आहे.
  • अवकाशनयानाच्या उड्डाणासाठी आरएलव्हीचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर उड्डाणावर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
  • भारताने तयार केलेले हे अवकाशनयान अमेरिकेच्या अवकाशनयानासारखे दिसत आहे.
  • माजी राष्ट्रीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून आरएलव्हीला लवकरच ‘कलामायन’ हे नाव देण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
  • नजीकच्या भविष्यात स्वदेशी बनावटीच्या अवकाश यानाच्या निर्मितीत भारत जगात सर्वांत पुढे असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.