Current Affairs of 14 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 मे 2016)
आयसीसीच्या क्रिकेट समितीवर राहुल द्रविडची निवड :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांची क्रिकेट समितीवर निवड केली.
- तसेच या समितीच्या कार्याध्यक्षपदी अनिल कुंबळेची फेरनिवड करण्यात आली.
- आयसीसीने (दि.13) प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे निर्णय जाहीर केले. या समितीत ऍण्ड्रयू स्ट्रॉस, केविन ओब्रायन आणि डॅरेन लीमन यांचाही समावेश आहे.
- द्रविडने श्रीलंकेच्या कुमार संगकारा, तर जयवर्धने याने मार्क टेलर यांची जागा घेतली.
- तीन वर्षांचा कालावधी संपल्यामुळे भारताच्या एल. शिवरामकृष्णन हेदेखील समितीतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी टीम मे यांची निवड करण्यात आली.
- खेळाडूंच्या बरोबरीने रिचर्ड केटलबोरोघ आणि स्टिव्ह डेव्हिस या पंचांचीदेखील पंच प्रतिनिधी म्हणून या समितीत निवड करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
देशातील पहिले बौद्धिक संपदा धोरण मंजूर :
- केंद्रीय मंत्रिमंडळाने सृजनात्मकता, नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) धोरणाला मंजुरी दिली.
- राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवत जागरूकता निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी (दि.12) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले.
- तसेच त्यांनी या धोरणाची सात उद्दिष्ट्येही स्पष्ट केली.
- 2017 पर्यंत ट्रेडमार्क नोंदणीची मुदत केवळ एक महिन्यासाठी राहील.
- बौद्धिक संपदेच्या प्रत्येक स्वरूपाची माहिती देतानाच त्यासंबंधी नियम आणि संस्थांमधील समन्वयाचा ताळमेळ राखण्यावर भर दिला जाईल.
- तसेच या धोरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासह प्रोत्साहनासाठी कठोर आणि प्रभावी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज राहील.
- धोरणांचे उल्लंघन केले जात असेल तर त्याला तोंड देण्यासाठी अंमलबजावणी व न्यायप्रणालीला बळकटी देण्याचा उद्देशही समाविष्ट असेल.
गोव्यातील कारागृह होणार पर्यटन स्थळ :
- गोव्याच्या अग्वादा येथील ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह आता केवळ कैद्यांचे घर राहणार नाही.
- तसेच या कारागृहाचे पर्यटन स्थळात रूपांतर केले जाणार आहे.
- राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या कारागृहात मोठा बदल केला जाणार आहे.
- 30 मे 2015 पासून हे कारागृह कैद्यांचे आवास राहिलेले नाही.
- सर्व कैद्यांना नव्या कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे.
- तसेच या कारागृहाचे हिमाचल प्रदेशच्या धागशाई कारागृह आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहाप्रमाणेच संग्रहालयात रूपांतर केले जाईल.
- धागशाई कारागृह आणि अंदमानचे सेल्युलर कारागृह ही ब्रिटिश काळातील कारागृहे आहेत.
दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी :
- दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
- नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली.
- नवी मुंबईचे विद्यमान आयुक्त प्रभात रंजन यांना पदोन्नती देऊन विधी आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून, तर पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या महासंचालकपदावर विष्णू देव मिश्रा यांना पदोन्नती देण्यात आली.
- राज्य पोलिस दलातील विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून महासंचालक दर्जाच्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने (दि.13) जाहीर केल्या.
- विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या दिल्लीत झालेल्या प्रतिनियुक्तीनंतर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट अपेक्षित होते.
- मुंबईसह राज्य पोलिस दलात काही दिवसांत आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.
- ‘एटीएस’चे सध्याचे प्रमुख विवेक फणसळकर यांची लाचलुचपत विरोधी पथकाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांची पोलिस गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती झाली आहे.
निरंकारी संप्रदायाचे प्रमुख हरदेवसिंग यांचे निधन :
- आध्यात्मिक नेते व निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग (वय 62 वर्ष) यांचे कॅनडात माँट्रियल येथे (दि.13) अपघाती निधन झाले.
- बाबा हरदेव सिंग हे कारने प्रवास करीत असताना (दि.13) भारतीय वेळेनुसार पहाटे 5 च्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. ते कॅनडामध्ये आध्यात्मिक बैठका घेण्यासाठी गेले होते.
- टोरोंटोमध्ये जून महिन्यात दुसरे निरंकारी आंतरराष्ट्रीय संगम आयोजित करण्यात आले आहे.
- बाबा हरदेव सिंग हे ‘निरंकारी बाबा’ या नावाने ओळखले जात. तसेच ते निरंकारी मिशनचे प्रमुख होते.
- 1980 मध्ये त्यांनी त्यांचे वडील गुरुबचन सिंग यांची हत्या झाल्यानंतर मिशनच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेतली होती.
जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान भारतात दाखल :
- जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान ‘आंतोंनोव्ह एन – 225 मिर्या’ भारतात दाखल झाले असून, हैदराबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे लॅंडिंग झाले.
- अवाढव्य आकारमान असणाऱ्या या विमानाची इंजिने देखील तितकीच शक्तिशाली आहेत.
- सहा टर्बोफॅन इंजिनांचा समावेश असणारे हे जगातील एकमेव विमान असून त्याचे उड्डाणाप्रसंगीचे कमाल वजन हे 640 टन एवढे आहे.
- सामान्य विमानांच्या तुलनेत या कार्गो जेटच्या पंखांचा विस्तारदेखील मोठा आहे.
- वजनदार वस्तू आणि माल घेऊन दूरपर्यंत प्रवास करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.
तुर्केमिनिस्तानमधून हे विमान हैदराबादेत दाखल झाले आहे.
- मध्यंतरी अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीने मागील महिन्यामध्ये युक्रेनमधील अँटोनिक कंपनीसोबत रणनितीक करार केला होता.
- यान्वये विमानांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव, विमानांची देखभाल आणि त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
- ‘रिलायन्स डिफेन्स’ आणि ‘आंतोंनोव्ह’ या दोन कंपन्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीसोबत मिळून 50 ते 80 एवढी आसनक्षमता असणाऱ्या विमानांची निर्मिती करणार आहेत.
दिनविशेष :
- 1657 : धर्मवीर संभाजीराजे यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला.
- 1982 : ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा