Current Affairs of 17 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 मे 2016)

चालू घडामोडी (17 मे 2016)

महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब :

 • सांगवडे (मावळ) येथील भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.
 • मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रातील आशियाई पदकविजेता महेश मोहोळ महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यातील अंतिम लढत बरोबरीत सुटल्यांनतर पंच कमिटीच्या निर्णयानुसार महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब व मानाची चांदीची गदा देण्यात आली.
 • तसेच दोघांना प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
 • सांगवडे ग्रामस्थ व कुस्ती संयोजन कमिटी आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे पूजन किसन कदम व राष्ट्रवादीचे देहू अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
 • पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील हवेली, मावळ व मुळशीतील विविध तालमींतील नामांकित मल्लांच्या उत्सवापूर्वी ठरविलेल्या निकाली कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.
 • सर्वसाधारणपणे उत्सवातील मैदाने (आखाडे) सायंकाळी बंद केले जातात.
 • मात्र, संयोजकांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करून सायंकाळी पाच वाजता सुरु केलेल्या कुस्त्या रात्री दहापर्यंत सुरु ठेवल्या होत्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मे 2016)

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर :

 • आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागेल, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांना भंडावून सोडत असतील.
 • मात्र, आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता करणे सोडा. कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे.
 • तसेच या निमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
 • या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे.
 • शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर; अर्थात भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन 20 मे ते 22 मेदरम्यान गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे.

आयपीएलच्या क्षेत्रात विराट कोहलीचा नवा विक्रम :

 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या एका मोसमातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
 • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मॅचविनिंग नाबाद 75 धावांची खेळी करणा-या विराटने संघसहकारी ख्रिस गेलचा 733 धावांचा विक्रम मोडला.
 • विराट आणि गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून एकत्र खेळतात.
 • 2012 च्या आयपीएलच्या मोसमात गेलने 14 डावांमध्ये 733 धावा केल्या होत्या.
 • तसेच त्यानंतर लगेच पुढच्यावर्षी चेन्नई सुपर किंग्जच्या मायकल हसीने तितक्याच 733 धावा करुन या विक्रमाची बरोबरी केली होती.
 • विराटने दोघांपेक्षा सरस कामगिरी करत फक्त 12 डावांमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली.

शैक्षणिक गुणवत्ताविकास कार्यक्रमांतर्गत शाळा स्वयंमूल्यमापन :

 • चोरमलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ताविकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शाळा स्वयंमूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळाला.
 • दौंड पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सभापती रोहिणी पवार, सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी शोभा शिंदे यांच्या हस्ते मुख्याध्यापक कृष्णा कुदळे यांनी प्रमाणपत्र स्वीकारून शाळेला सन्मानित केले.
 • चोरमलेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबवलेले उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता व पालकांचा शाळेच्या विकासातील सहभाग यावर आधारित हे मूल्यमापन करण्यात आले.
 • शाळेने वर्षभरात गुणवत्तेसपूरक असे हस्ताक्षर सुधारणा, वर्तमानपत्रवाचन, रद्दीतून शैक्षणिक साहित्य, स्पेलिंग पाठांतर, ज्ञानरचनावादी अध्यापन, परिसर सहली, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले.
 • शाळेत लोकसहभागातून झेरॉक्स प्रिंटर, लॅमिनेशन मशिन, साउंड सिस्टिम, रंगकाम, बोअरवेल साहित्य, पुस्तके, पेवर ब्लॉक व परिसर सुशोभित करण्यात आले. एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास येत आहे.

व्हॉट्‌स ऍपवर आता व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध :

 • व्हॉट्‌स ऍपने आता व्हिडिओ कॉलची सुविधा आणली आहे.
 • सुरवातीला केवळ ‘बीटा व्हर्जन’साठीच ही सुविधा उपलब्ध असेल.
 • व्हॉट्‌स ऍपचे व्हिडिओ कॉल ऍप्लिकेशन गुगलच्या ‘बीटा टेस्टिंग’ कार्यक्रमातून; तसेच ‘एपीके मिरर’मधूनही डाऊनलोड करता येईल.
 • ‘बीटा व्हर्जन‘मध्ये दिलेला व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय तूर्तास वापरणे शक्‍य होणार नाही.
 • सध्या फेसबुकच्या मालकीच्या ‘इन्स्टाग्रॅम’ प्लॅटफॉर्मवर केवळ आयओएस वापरकर्त्यांसाठी या चाचण्या सुरू आहेत.
 • व्हॉट्‌स ऍपने कॉल ‘म्यूट’ करण्यासह स्मार्ट फोनच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यांचा वापर करण्याचे पर्याय देऊ केले आहेत.
 • सध्याच्या व्हॉट्‌स ऍप कॉलिंग पर्यायाच्या जागीच ऑडिओ आणि व्हिडिओ असे दोन्ही पर्याय दिसतील.
 • स्काईप, वायबर आणि हाईक यांनी नवनवीन फीचर आणल्यानंतरही व्हॉट्‌स ऍपने अव्वल स्थान टिकवले आहे.

दिनविशेष :

 • जागतिक दूरसंचार दिन.
 • नॉर्वे संविधान दिन.
 • 1749 : डॉ. एडवर्ड जेन्नर, जरी देवीच्या लसीचा शोध.
 • 1949 : भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.