Current Affairs of 16 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 जानेवारी 2016)
भारत-चीन सीमारेषेवर पहिली महिला तुकडी :
- भारत-तिबेट सीमा पोलिस दलाची (आयटीबीपी) महिला तुकडी भारत-चीन सीमारेषेवर तैनात करण्यात आली.
- अतिउंचीच्या भागात तैनात झालेल्या या पहिल्या महिला तुकडीत 500 महिला जवानांचा समावेश आहे.
- विशेष म्हणजे यातील 35 महिला या महाराष्ट्राच्या कन्या आहेत.
- लढाई आणि अतिदुर्गम भागात जगण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचे 44 आठवडे खडतर प्रशिक्षण दिल्यानंतर हवालदार पदावरील या महिलांना आता प्रत्यक्ष सीमारेषेवर पाठविण्यात येणार आहे.
- उत्तराखंडमधील भारताच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या ‘मना पास’ येथेही आता महिला जवान दिसणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
‘स्टार्ट अप’ योजना :
- मोदी सरकारची सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली महत्त्वाकांक्षी ‘स्टार्ट अप’ योजना सुरू होणार आहे.
- विज्ञान भवनात होणाऱ्या सोहळ्यामध्ये देश-विदेशातील उद्योग, गुंतवणूक आणि स्टार्ट अप क्षेत्रातील नामांकित चेहऱ्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेला सुरवात करतील. यासाठी जवळपास दीड हजार आंत्रप्रेन्युअर्स, गुंतवणूकदार, उद्योगांना पाठबळ देणारे मान्यवर यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.
- पाच वर्षांत स्टार्ट अपची संख्या दहा पटीने वाढली आहे. या शर्यतीमध्ये बंगळूर प्रथम क्रमांकावर आहे.
- ‘स्टार्ट अप’ची वैशिष्ट्ये
- भारतातील स्टार्ट अप्सची संख्या 9500
- एका स्टार्ट अपचे सरासरी मूल्य 18 कोटी रुपये
- अमेरिकेतील एका स्टार्ट अपचे मूल्य 29 कोटी रुपये
- दर वर्षी नव्याने सुरू होणारे स्टार्ट अप 1200
- दर आठवड्याला होणारी गुंतवणूक 630 कोटी
- गेल्या वर्षातील स्टार्ट अपमधील देशातील गुंतवणूक 32000 कोटी
- 2020 पर्यंत मिळणारे रोजगार 2.5 लाख
- केंद्राने दिलेला प्रारंभिक निधी 8000 कोटी रुपये
प्रचंड तेलनिर्मितीस इराण सज्ज :
- इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भातील यशस्वी जागतिक करार झाल्यानंतर आशियातील सर्वांत वेगाने विकास पावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसहित युरोपमधील इतर देशांना लक्षावधी बॅरल तेल पुरविण्यास इराण सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाकडून औपचारिक घोषणा होणे अपेक्षित असून, यानंतर इराणवर तेलविक्रीसंदर्भात लादण्यात आलेले निर्बंध पूर्णत हटविले आहे.
- तेलाच्या प्रतिबॅरल किंमतीमध्ये 2014 च्या तुलनेमध्ये सध्या तब्बल 70 टक्क्यांची घट झाली आहे.
- सध्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 30 डॉलर्स इतकी आहे. इराणचे तेलविक्रीचे मुख्य लक्ष्य हे भारत असणार आहे.
उगवत्या सूर्याच्या देशात विद्येची देवता :
- सरस्वती ही कला, ज्ञान, साहित्य यांची देवता असल्याने तिचे पूजन भारतात केले जाते. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जपानमध्येही या विद्येच्या देवतेची पूजा होते.
- जपानमध्ये सरस्वतीची मंदिरे मोठ्या प्रमाणावर आहेत. कला व इतिहासतज्ज्ञ बिनॉय के. बहल यांनी काढलेल्या देवी लक्ष्मी, इंद्रदेव, ब्रह्मदेव, गणपती, गरुड व अन्य देवतांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन इंडियन म्युझियम येथे सुरू आहे.
- जपानवर हिंदू धर्म आणि हिंदू देवतांचा कसा प्रभाव आहे, हे येथील काही छायाचित्रांमधून दिसते.
- जपान फाउंडेशन फेलोशिप मिळाल्याने बहल हे गेल्या वर्षी तेथे गेले होते, त्या वेळी त्यांनी ही छायाचित्रे काढली आहेत.
- हिंदू धर्माबरोबरच पाचव्या शतकातील संस्कृत भाषेतील ‘सिद्धम’ लिपीचे जतन जपानमध्ये केले आहे. भारतातून ही लिपी काळाच्या ओघात लयाला गेली आहे.
तमिळनाडूत पोंगल सणाचा उत्साह :
- तमिळनाडूत उत्साहाच्या वातावरणात पारंपरिकरित्या पोंगल सण साजरा करण्यात आला. या सणादरम्यान नागरिकांनी सूर्य आणि शेतात काम करणाऱ्या जनावरांची पूजा केली.
- पारंपरिक भोजनाचा नैवेद्य सूर्याला दाखवून ऋण व्यक्त करण्यात आले.
- चार दिवस चालणाऱ्या पोंगलमध्ये पहिल्या दिवशी भोगी म्हणून साजरा करण्यात येते.
- दुसऱ्या दिवशी पोंगल सण साजरा करण्यात येतो.
- तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल नावाचा सण साजरा केला जातो.
- चौथ्या दिवशी म्हणजेच कान्नूम पोंगलच्या दिवशी नागरिक आप्तेष्ट आणि मित्रांच्या भेटी घेतात.
चंद्राच्या अप्रकाशित भागात चीन अवकाशयान उतरवणार :
- चंद्राच्या अप्रकाशित भागात चीन 2018 मध्ये यान पाठवणार आहे.
- मानवाने चंद्राच्या अप्रकाशित बाजूचे फारसे संशोधन केलेले नाही, चीनच्या या मोहिमेमुळे चांद्र संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. चंद्राची एक बाजू गुरुत्वाकर्षण बलांमुळे पृथ्वीवरून कधीच दिसत नाही व तिचा शोधही फारसा घेतला गेलेला नाही.
- चेंज 4 हे यान मानवी इतिहासात प्रथमच चंद्राच्या या भागात उतरणार असल्याचे चीनच्या चांद्र संशोधन केंद्राचे प्रमुख लिऊ झिहोंग यांनी सांगितले.
- चीनच्या विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय संरक्षण उद्योग खात्याअंतर्गत हे केंद्र येते. चीनने चंद्रावर यान पाठवण्याइतकी तांत्रिक क्षमता आधीच प्राप्त केलेली आहे.
- नासाने गेल्यावर्षी मंगळावर पाणी वाहत असल्याची घोषणा केली होती तसेत भारतानेही मंगळावर यान पाठवणारा पहिला देश म्हणून मान पटकावला आहे.
दिनविशेष :
- अमेरिका मार्टिन लुथर किंग दिन
- थायलंड शिक्षक दिन
- 1955 : नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
- 1995 : आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा