Current Affairs of 18 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जानेवारी 2016)
नवउद्योजकतेला मिळणार ‘स्टार्ट अप’चा ‘बूस्ट’ :
- माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगामुळे पुण्यातील उद्यमशीलतेचा गजर जगभर होत असतानाच, आता केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजनेमुळे शहरातील उद्यमशीलतेला आणखी झळाळी मिळणार आहे.
- विविध क्षेत्रांतील ‘स्टार्ट अप’मधील नवउद्योजकांना या योजनेचा उपयोग होणार असल्याने, आगामी तीन वर्षांत पुण्यात उभारल्या जाणाऱ्या तब्बल दोन हजार ‘स्टार्ट अप’ना खऱ्या अर्थाने ‘बळ’ मिळणार आहे.
- भरीव आर्थिक गुंतवणूक, बिझनेस इन्क्युबेटरची सुविधा, प्राप्तिकरात सूट आणि उद्योग उभारणीत प्रशासकीय हस्तक्षेप न करण्याच्या भूमिकेमुळे या क्षेत्रातील तरुण उद्योजकांना ‘स्टार्ट अप’च्या वाढीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
Must Read (नक्की वाचा):
30 वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित :
- जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोलर रिसर्चच्या वैज्ञानिकांना 30 वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे.
- अतिशय लहान जवळपास 1 मि.मी.पेक्षा कमी लांबीचा हा प्राणी अंटार्टिकावर शास्त्रज्ञांना मिळाला.
- क्रायोबॉयोलॉजी मासिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ‘वॉटर बियर’गटातील हा सूक्ष्म प्राणी 1983 मध्ये अंटार्टिकावरील मॉस झुडपावर आढळला होता.
- यापूर्वी असा प्राणी नऊ वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यात यश आले होते, पण यावेळी 30 वर्षांपूर्वीचा प्राणी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग शास्त्रज्ञांनी यशस्वी केला.
भारताने मालिका गमावली :
- भारताची कमकुवत गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (96) आक्रमक खेळी करीत टीम इंडियाच्या मालिकेत कायम राहण्याच्या आशेवर पाणी फेरले.
- मॅक्सवेलच्या जोरावर रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात यजमान संघाने भारताचा 3 गडी राखून पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
मुंबई मॅरेथॉन किपकेटर भावंडांनी जिंकली :
- उत्साहात पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिडिओन किपकेटर व इथोपियाच्या शुको गेनेमो यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राखले.
- विशेष म्हणजे, गिडिओनची बहीण वेलेंटाइन किपकेटर महिला गटात तृतीय स्थानी आल्याने, यंदाची मुंबई मॅरेथॉन किपकेटर भावंडांनी गाजवल्याचे चित्र होते.
- दखल घेण्याची बाब म्हणजे, गिडॉन यावेळी पेसमेकर म्हणून सहभागी झाला होता. मात्र, 34 किमी अंतरापासून त्याने आघाडी घेत, थेट स्पर्धा विक्रम नोंदवून बाजी मारली. त्याच वेळी आर्मीच्या नितेंद्र सिंग व रेल्वेच्या सुधा सिंग यांनी भारतीय गटात सुवर्णपदक पटकावले.
- सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी एलिट गटाच्या मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरुवात झाली.
अंतराळात फुलले ‘झिनिआ’ :
- पृथ्वीच्या बाह्य वातावरणात पहिल्यांदाच एक फूल फुलविण्यात नासाच्या अंतराळवीरांना यश आले आहे.
- ‘झिनिआ’ असे या फुलाचे नाव असून, अंतराळवीर स्कॉट केली यांनी ‘होय, अंतराळात अन्य प्रकारेही जीवन फुलले आहे!’ असे ट्विट करत या फुलाचा फोटोही शेअर केला आहे.
- नारिंगी रंगाचे हे फूल संयुक्त राष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागातील आहे, या फुलाबरोबरच शास्त्रज्ञ अन्य वनस्पतींच्या लागवडीसाठीही प्रयत्न करत असून, अंतराळात कमळ फुलविण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला आहे.
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मे 2014 मध्ये ‘व्हेजी लॅब’ सुरू करण्यात आली होती, यामध्येच झिनिआ आणि कमळ ही फुले फुलली आहेत.
इराणवरील निर्बंध उठविले :
- इराणवर असलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठविण्यात आले असून, त्यामुळे गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापारातील इराणचा विजनवास संपुष्टात आला आहे.
- गेल्या वर्षी 14 जुलैला पाश्चिमात्य देशांबरोबर झालेल्या कराराची अंमलबजावणी सुरू झाल्याने इराणवरील आर्थिक निर्बंध उठविण्यात आले आहेत.
- अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन या सहा जागतिक शक्तींनी इराणबरोबर करार करत त्यांच्या अणु कार्यक्रमाला आळा घालण्याची अट घातली होती. या करारानुसार करायच्या उपाययोजना इराणने केल्या असल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने दिल्याने निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
- सहा देशांच्या प्रतिनिधी म्हणून वाटाघाटी करणाऱ्या युरोपीय महासंघाच्या धोरणविभाग प्रमुख फेडरिका मोघेर्नी यांनी इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध उठविण्यात आल्याचे येथे जाहीर केले.
सानिया, मार्टिना संयुक्त नंबर वन :
- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस महिला गटातील दुहेरीच्या जागतिक मानांकनात संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत.
- सध्या डब्ल्यूटीएच्या रँकिंगमध्ये सानिया आणि मार्टिना यांचे प्रत्येकी 11395 गुण आहेत.
- भारत आणि स्वीस जोडीने सलग 30 वा विजय मिळविताना (दि.15 या तारखेला) सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले होते.
- या जोडीने एकत्र खेळताना आतापर्यंत एकूण 11 वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे.
- 18 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी संयुक्तरीत्य अव्वल क्रमांकावर झेप घेतल्यामुळे सानिया आणि मार्टिना यांचे मनोधैर्य आणखी उंचावण्यास मदत होणार आहे.
- टेनिस कारकीर्दीत स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस दुहेरी क्रमवारीत 35 आठवड्यांपर्यंत नंबर वन राहिलेली आहे, तर सानिया मिर्झा 41 आठवड्यांपासून दुहेरी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.
दिनविशेष :
- 1886 : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता.
- 1944 : भारतीय ज्ञानपीठाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा