Current Affairs of 15 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 जानेवारी 2016)
दत्ता पडसलगीकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त :
- सध्या केंद्र सरकारच्या सेवेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) नियुक्तीवर असलेले भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये परत पाठविण्यात आल्याने पडसलगीकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होतील.
- लवकरच विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारतील, अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारतीय राजदूतपदी नियुक्ती झाली आहे.
- पडसलगीकर यांची नियुक्ती झाली तर तब्बल 9 वर्षांनी मराठी व्यक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी येईल. याआधी वर्ष 2007 मध्ये डी.एन. जाधव हे मराठी पोलीस आयुक्त झाले होते.
- अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जा असलेले पडसलगीकर ‘आयबी’मध्ये विशेष संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर होते.
Must Read (नक्की वाचा):
केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला :
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 29 फेबु्रवारीला वर्ष 2016-17 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
- नरेंद्र मोदी सरकारने मे 2014 मध्ये सत्ता सांभाळल्यानंतर जेटलींचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल.
- अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
मराठी सारस्वतांचा मेळा :
- संत अन् यंत्रभूमी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भाजपाचाही विरोध मावळला.
- त्यामुळे संमेलन निर्विघ्न पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संतांचा वारसा सांगण्यासाठी सभा मंडपासमोरच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत.
- संमेलनस्थळी आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांची थ्री डायमेन्शनल शिल्पाकृती उभारली आहे.
‘मेक इन इंडिया’चा लोगो ‘फॉरेनमेड’ :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाचा लोगो (बोधचिन्ह) एका विदेशी कंपनीने भारतातील शाखेत तयार केली आहे.
- मध्य प्रदेशमधील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे.
- 2014-15 मध्ये क्रिएटिव्ह एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निविदा मागविल्या होत्या.
- विडेन केनेडी इंडिया लि. या कंपनीची निवड करण्यात आली आणि त्या कंपनीनेच ‘मेक इन इंडिया’ चे बोधचिन्ह तयार केले, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
- ‘मेक इन इंडिया’च्या प्रचार, प्रसिद्धीचे काम विडेन केनेडी या कंपनीकडे देण्यात आले आहे.
‘जुनो’चा विक्रमी अंतराळ प्रवास :
- गुरू ग्रहाच्या अभ्यासासाठी सोडण्यात आलेल्या ‘जुनो’ या यानाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
- सौरशक्तीवर धावणाऱ्या या यानाने सूर्यापासून तब्बल 79. 30 कोटी किलोमीटर अंतर कापले आहे.
- अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ (नासा) या संस्थेमार्फत पाच ऑगस्ट 2012 रोजी सोडण्यात आले होते.
- सूर्यापासून प्रचंड अंतर कापण्याचा या आधीचा विक्रम ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’ च्या ‘रोसेटा’ या यानाने केला होता.
- ’67 पी/चुर्युमोव्ह-गेरासिमेन्को’ या धूमकेतूच्या अभ्यासासाठी ऑक्टोबर 2012 मध्ये सोडण्यात आलेल्या ‘रोसेटा’ने 79 कोटी 20 लाख किलोमीटर अंतर कापले होते. हा विक्रम ‘जुनो’ने मोडला.
- सौरशक्तीवर धावणाऱ्या ‘जुनो’ला नऊ मीटर लांबीचे दोन सौरपंखे असून, ऊर्जानिर्मितीसाठी त्यावर 18 हजार 698 सौरघट बसविण्यात आले आहेत, त्यातून 14 किलोवॉट वीजनिर्मिती होते.
सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम हे पहिले राज्य :
- संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
- गंगटोक येथे 18 जानेवारी रोजी शाश्वत शेतीविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या या दर्जाची औपचारिक घोषणा करतील.
- राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमातील मार्गदर्शक नियमांनुसार सेंद्रिय पद्धती आणि तत्त्वांचा वापर करून जवळपास 75 हजार हेक्टर शेतजमीन हळूहळू प्रमाणित सेंद्रिय जमिनीत रूपांतरित करण्यात करण्यात आली.
ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर :
- 88 व्या ऍकॅडमी ऍवार्डससाठी (ऑस्कर) नामांकने जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वाधिक बारा नामांकने ‘द रेव्हनंट’ चित्रपटाला मिळाली आहेत.
- ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ लाही सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दहा नामांकने मिळाली आहेत.
- द मार्टिन, स्पॉटलाइट, द बिग शॉर्ट, रूम आणि ब्रिज ऑफ स्पाइज या चित्रपटांनाही सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन जाहीर झाले आहे.
- 28 फेब्रुवारीला लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत राओनिक विजेता :
-
कॅनडाच्या मिलोस राओनिकने 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फेडररचा पराभव करत ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली.
-
राओनिकने धक्कादायक निकालाची नोंद करताना दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले.
-
17 ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या फेडररविरुद्ध गेल्या 11 सामन्यांतील राओनिकचा हा दुसरा विजय आहे.
दिनविशेष :
- लष्कर दिन
- मलावी जॉन चिलेम्ब्वे दिन
- उत्तर कोरिया कोरियन लिपी दिन
- 1926 : खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर यांचा जन्म.
- 1996 : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा