Current Affairs of 16 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2017)
भारतीय संघाचा मालिका विजय :
- अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने रोमांचक विजयाची नोंद करताना बलाढ्य आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँडला 2-1 असे नमवले.
- गरजांत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयात मुख्य योगदान दिले.
- विशेष म्हणजे, मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने संघात तब्बल नऊ ज्यूनिअर खेळाडूंना संधी दिली. तरीही बलाढ्य नेदरलँडला पराभूत करण्यात भारत यशस्वी ठरला.
- आक्रमक खेळ केलेल्या भारताने गुरजांत (चौथा मिनिट) व मनदीप (51वा मिनिट) यांच्या जोरावर बाजी मारली.
- तसेच यासह भारताने तीन सामन्यांची मालिकाही भारताने 2-1 अशी जिंकली. याआधी 13 ऑगस्टला भारताने नेदरलँडला 4-3 असा धक्का दिला होता.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारचा आदेश ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढा :
- जगभरात धुमाकूळ घालणार्या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत.
- इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना पाठविले आहे.
- ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पश्चिम बंगालमध्येही अशा घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती.
- 2013 साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन व त्याच्या साथीदारांनी ब्ल्यू व्हेल चॅलेंज डेव्हलप केले. ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर आहे. ऑर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते.
- एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो. साधारणत: 50 टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते. शेवटी खेळणार्याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.
RSS कडून चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन :
- चीनबरोबर सीमावादावरून तणाव असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
- भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्याचे चीनचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे.
- चिनी बनावटीच्या मालाला तोंड देण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा आग्रह महत्त्वाचा असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.
- सीमेवर चीनची घुसखोरी रोखण्यासाठी आपले जवान समर्थ आहेत. मात्र आर्थिक गुलामगिरी रोखण्यासाठी भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तूंचा शिरकाव रोखा असे आवाहन भैय्याजींनी केले.
- तसेच त्यांच्या उपस्थितीत येथील महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. आधुनिकीकरणाला आमचा विरोध नाही. मात्र एखाद्या देशाची आर्थिक गुलामगिरी आपण धुडकावून लावली पाहिजे.
- स्वयंपूर्णतेकडे देशाची वाटताल सुरू असून, युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
‘सी प्लेन’ची चाचणी भारतात होणार :
- जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे.
- कंपनीने परवानगीसाठी भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाशी संपर्क साधला. या चाचणीत सुरक्षेची चाचपणीही करण्यात येईल.
- पूर्व किनारा किंवा इतर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली.
- एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये पहिल्यांदाच स्पाईट जेट या खासगी कंपनीच्या विमान दुरुस्ती सेवेच्या लोकार्पणासाठी ते शहरात आले होते.
- देशातील हवाई वाहतुकीतील ही सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला तोटातून बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
- कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित केली.
दिनविशेष :
- रामकृष्ण परमहंस (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय) (18 फेब्रुवारी 1836 (जन्मदिन) – 16 ऑगस्ट 1886 (स्मृतीदिन)) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते.
- स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा