Current Affairs of 14 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2017)
सध्या भारत-अमेरिकेमधील संबंध सर्वोच्च :
- जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत यांच्यातील धोरणात्मक संबंधांना यंदा 70 वर्षे पूर्ण होत आहेत.
- विशेष म्हणजे सध्या अमेरिका आणि भारतातील संबंध यापूर्वी कधीही नव्हते अशा सर्वोच्च शिखरावर आहेत. यापुढेही दोन्ही देशांतील व्यक्ती-व्यक्तींतील संबंध, तसेच लोकशाही, स्वातंत्र्य आणि समान मूल्यांवर आधारित नातेबंध कायम राहतील व वृद्धिंगत होतील, असा विश्वास अमेरिकेचे मुंबईतील कौन्सुल जनरल एडगार्ड कॅगेन यांनी व्यक्त केला. दक्षिण मुंबईत आयोजित अमेरिकी राष्ट्रीयन दिन सोहळ्यात कॅगेन बोलत होते.
- तांत्रिक कारणांमुळे मुंबईतील अमेरिकी दुतावासाने अमेरिकेचा 241 वा राष्ट्रीयन दिन 4 जुलै ऐवजी 11 ऑगस्ट रोजी साजरा केला. या वेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- उभय देशांच्या राष्ट्रीयगीतांनी सुरुवात झालेल्या या सोहळ्यात अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सनी दिमाखदार संचलन केले.
Must Read (नक्की वाचा):
सांस्कृतिक दूत रामकृष्ण हेजीब यांचे निधन :
- महाराष्ट्रीयनचे दिल्लीतील सांस्कृतिक दूत अशी ओळख असणारे रामकृष्ण मोरेश्वर हेजीब यांचे 12 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.
- हेजीब हे महाराष्ट्रीयन परिचय केंद्राचे माजी संचालक आणि दिल्ली सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष होते.
- मराठी संस्कृतीचे दिल्लीत जतन करण्यासाठी महाराष्ट्रीयन शासनाच्या वतीने मराठी नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव आदींच्या आयोजनात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.
- निवृत्तीनंतरही त्यांनी सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन दिन महोत्सव, गणेशोत्सव, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, कोजागरी पौर्णिमा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात हिरीरीने पुढाकार घेतला होता.
कामगारांना पेन्शनसोबत मूलभूत सुविधाही मिळणार :
- महाराष्ट्राबरोबरच देशातील सर्व स्तरातील कामगारांना वाढीव पेन्शनबरोबरच, सर्वांसाठी घरे, आरोग्यदायी विविध सुविधा, जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेबरोबरच इतर सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी केले.
- महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन बंडारु दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले.
- राज्यमंत्री म्हणाले की, मी तुमच्यासारखाच एक कामगार आहे. त्यामुळे मला तुमच्या सर्व प्रश्नांची जाणीव आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले. सर्व कामगारांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
राजेश मुदम यांना दक्षिण आशियाई टेनिस स्पर्धेत सुवर्ण :
- महापालिकेचे कर्मचारी राजेश मुदम यांनी श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत, 50 वर्षे वयावरील गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे.
- तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या चमूवर मात करत, मुदम यांचा समावेश असलेल्या 4 भारतीय टेबल टेनिसपटूंच्या चमूने हे अजिंक्यपद मिळविले आहे.
- कोलंबोजवळील सेंट लेवेनिया या उपनगरातील सेंट जोसेफ स्टेडियममध्ये, दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या.
- या स्पर्धांमध्ये सांघिक विजेतेपद मिळवीत, सुवर्ण पदक पटकाविणारे राजेश मुदम हे 1977 पासून स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळत आहेत. 1982 पासून ते महापालिकेच्या सेवेत आहेत.
दिनविशेष :
- 14 ऑगस्ट 1911 रोजी भारतीय तत्त्वज्ञानी ‘वेदतिरी महारिषी’ यांचा जन्म झाला.
- मराठी लेखक, नाटककार ‘जयवंत दळवी’ यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 मध्ये झाला.
- 14 ऑगस्ट 1984 हा दिवस भारतीय कुस्तीगीर ‘खाशाबा जाधव’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा