Current Affairs of 12 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2017)
व्यंकय्या नायडू भारताचे नवे उपराष्ट्रपती :
- देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
- व्यंकय्या नायडू हे आता मावळते उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांची जागा घेतील. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व केंद्र सरकारमधील मंत्री आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
- नायडू यांनी हिंदीमध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात येण्यापूर्वी त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधी तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.
- तसेच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडू यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता.
Must Read (नक्की वाचा):
लढाऊ जॅग्वार भारतीय वायुदलाची ताकद :
- हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएल या कंपनीने जॅग्वार या लढाऊ विमानाची निर्मिती करत त्यात आधुनिक रडार तंत्रज्ञान वापरले आहे.
- जॅग्वार या विमानात पहिल्यांदाच अत्याधुनिका एईएसए रडार असणार आहे. या रडारमुळे शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळण्यास मदत होते आणि ते उद्ध्वस्त करायलाही मदत होणार आहे.
- ‘जॅग्वार ड्रेन थ्री’ची निर्मिती एचएल कंपनीने भारतीय वायूदलासाठी करण्यात आली आहे. एकाच वेळी अनेक ठिकाण शोधण्यासाठी नव्या रडार तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.
- ‘इंटरलिव्ड मोड ऑफ ऑपरेशन’, ‘हाय अॅक्युरसी अँड रेझ्युलेशन’ अशा अनेक प्रणाली या विमानात विकसित करण्यात आल्या आहेत.
- एचएल आणि इस्त्रायलमधल्या एका फर्मच्या मदतीने रडार तयार करून ते या विमानात बसवण्यात आले आहेत. या रडारमुळे हे लढाऊ विमान एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.
- तसेच आतापर्यंत देशातील एकाही लढाऊ विमानात रडार नव्हते, राफेल आणि बोईंगच्या नव्या लढाऊ विमानांमध्ये यांचा वापर होतो आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे.
भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य :
- भारतीय लोकशाही 15 ऑगस्ट 2017 रोजी 70 वर्षे पूर्ण करेल. तिसऱ्या जगातील 125 हून अधिक देशांमध्ये हे यश मिळवणारा भारत हा एकमेव देश आहे.
- आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत लोकशाहीची धूळधाण झालेली दिसते.
- आपल्या आजूबाजूला पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इराक, इराण आदी देशांत हुकूमशाहीचे भूत अधूनमधून डोके वर काढत असते.
- भारतातील लोकशाहीचे श्रेय कोणा एका व्यक्तीला किंवा संस्थेला देता येणार नाही, हे सामुदायिक यश आहे. उत्तम राज्यघटना, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारे सर्वोच्च न्यायालय, सुबुद्ध नागरिक, नव्या युगातील सरकारवर वचक ठेवणारी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसारखी माध्यमे आणि निष्पक्षपाती निवडणूक आयोग यांमुळे हे सिद्ध होते.
- आपल्या व्यवस्थेचे ‘नियंत्रण व समतोल’ (चेक अँड बॅलन्स) हे वैशिष्ट्य फार महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच कोणतीही सत्ता अनिर्बंध होण्याचा धोका बराच कमी होतो.
- घटनेने निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना संरक्षण दिले आहे. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी ‘महाभियोग’ चालवावा लागतो.
दिनविशेष :
- 12 ऑगस्ट 1919 मध्ये ‘विक्रम अंबालाल साराभाई’ यांचे जन्म झाले. हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
- आय.बी.एम. कंपनीने पहिला वैयक्तिक संगणक 12 ऑगस्ट 1981 मध्ये बाजारात आणला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा