Current Affairs of 11 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2017)

विराज डबरे या युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार :

  • बदलापूरमधील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कबड्डीपटूच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या एका सेवाभावी संस्थेने घेतली आहे.
  • युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या संस्थेने राष्ट्रीय कबड्डीपटूचा किताब दिला आहे.
  • बदलापूरजवळील जांभळे गावात राहणार्‍या विराज डबरे याला लहानपणापासून कबड्डीची आवड होती. ही आवड पूर्ण करत असताना त्याने गावातील संघातूनच सरावाला सुरुवात केली. जांभळे हे गाव कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याला चांगले मार्गदर्शन मिळाले.
  • तसेच त्याची चमकदार कामगिरी पाहून 19 वर्षांखालील युवकांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली. पुढे त्याने या संघाचे कर्णधारपदही भूषवले.
  • विराजच्या खेळाची दखल घेत त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली. त्यानंतर, लागलीच 21 वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड निश्चित झाली.
  • नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत (रूरल ऑलिम्पिक) 21 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत असताना विराजच्या संघाने नेपाळचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2017)

आता अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी :

  • पंढरपूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत केली. येत्या तीन महिन्यांत हा कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
  • कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरातील सोन्याचे अलंकार, देवीचे चांदीचे दागिने, कोट्यवधींची रोकड, तसेच भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या किमती ऐवजावर पुजाऱ्यांनीच डल्ला मारला आहे.
  • विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी आक्रमक होत पुजाऱ्यांच्या बेसुमार लुटीच्या कथा ऐकवत या लुटीची ‘एसआयटी’ चौकशी करण्याची मागणी करताना अंबाबाईला पुजाऱ्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी केली.
  • शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, तसेच कॉंग्रेसचे सत्यजित पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
  • अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. तसेच, विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन येत्या तीन महिन्यांत याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार.

परिवहन विभागातर्फे ‘आरटीओ महाराष्ट्र’ अ‍ॅप :

  • राज्यातील वाहन चालकांना तक्रार करणे सोयीचे व्हावे, यासाठी परिवहन विभागाने ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे नवीन अ‍ॅप चालकांच्या सेवेत दाखल केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती देण्यासाठी अ‍ॅपमध्ये विशेष (एसओएस) बटणाची व्यवस्था आहे.
  • विविध कामांसाठी नागरिक आरटीओमध्ये गर्दी करतात. त्यामुळे कार्यालयांबाहेर मोठ्या रांगा लागतात. परिणामी, रांगेपासून सुटका मिळवण्यासाठी ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.
  • अ‍ॅपमध्ये राज्यातील रिक्षा-टॅक्सी व अन्य वाहनांविरुद्ध तक्रार करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना आपत्कालीन परिस्थितीत नातेवाइकांना माहिती देण्यासाठी अथवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ‘एसओएस’ क्लिक ही सेवादेखील पुरवण्यात आली आहे.
  • तसेच अ‍ॅपमुळे रिक्षा-टॅक्सी आणि खासगी वाहतूकदारांकडून होणार्‍या प्रवासी लुबाडणुकीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या ‘मदर तेरेसा’ डॉ.रुथ फाऊ यांचे निधन :

  • पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्‍टर रुथ फाऊ (वय 85 वर्षे) यांचे निधन झाले. पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.
  • डॉ. फाऊ या 1960 मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.
  • नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी 1962 मध्ये कराचीमध्ये मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर स्थापन केले आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत.
  • डॉ. फाऊ यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने 1996 मध्ये जाहीर केले.
  • डॉ. फाऊ यांनी सोसायटी ऑफ डॉटर्स ऑफ हार्ट ऑफ मेरी या संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतात काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, व्हिसासंबंधी अडचण आल्याने त्या काही काळासाठी मध्येच कराचीत उतरल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांशी बोलताना त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्या कायमस्वरूपी येथेच थांबल्या.
  • तसेच त्यांना पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज 1979 मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार 1989 मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना 2015 मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.