Current Affairs of 16 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2016)
50 पोलिस अधिकार्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक प्रदान :
- राज्य पोलिस दलातील 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले.
- नक्षलग्रस्त भागातील 10 पोलिस, उल्लेखनीय सेवेसाठी तिघे, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक मिळविणाऱ्या 37 जणांचा यात समावेश आहे.
- नक्षलग्रस्त भागातील पोलिस उपनिरीक्षक अतुल तावडे, पोलिस नाईक इंदरशाह सडमेक, पोलिस नाईक विनोद हिचामी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदकाचा मान मिळाला आहे.
- उल्लेखनीय सेवेसाठी पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांत अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतसिंग सरंगल यांचा, तर गुणवत्तापूर्ण सेवेकरिता 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव, पोलिस उपायुक्त संजय शिंदे, श्रीप्रकाश वाघमारे, राजेंद्र दाभाडे यांच्यासह 37 जणांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब उभारणार :
- वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वचक ठेवतानाच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात ‘सायबर लॅब’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
- 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी, एकाच दिवशी राज्यातील 44 ठिकाणी या सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे उद्धघाटन पार पडले.
- माहिती तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत आहे. ई-बँकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मीडिया आदींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
- आधुनिक तंत्रज्ञानाने सामान्य माणसाचे आयुष्य व्यापलेले असताना सायबर गुन्हेही वाढले आहेत.
- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
- तसेच त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ‘सायबर लॅब’ उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
- सर्व जिल्हे, पोलीस आयुक्तालयांसह मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात 44 विविध ठिकाणी ‘सायबर लॅब’ची उभारणी करण्यात आली आहे.
वेड व्हॅन निएकर्कला विश्वव्रिकमासह सुवर्ण पदक :
- पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत दक्षिण आफ्रिकेच्या वेड व्हॅन निएकर्क याने विश्वव्रिकमासह सुवर्णपदक पटकावले. त्याने 43.03 सेकंद वेळ दिली.
- तब्बल सतरा वर्षे आबाधित विक्रम त्याने मोडीत काढला.
- आठव्या लेनमधून धावताना 24 वर्षी व्हॅन निएकर्क याने शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्यात वेग वाढवून आपली आघाडी भक्कम केली. त्याची ती धाव इतकी वेगवान होती की विश्वविक्रम केल्यावरच ती थांबली.
- तसेच त्याने 1999 मध्ये नोंदवलेल्या अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनचा 43.18 सेकंदाचा विक्रम मागे टाकला.
- व्हॅन निएकर्क हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजेता ठरला. यापूर्वी 1920 मध्ये बेवील रुड याने 49.6 सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक जिंकले होते.
- ग्रेनाडाच्या गत विजेत्या किरानी जेम्स याने 43.76 सेकंद वेळ देत रौप्यपदक पटकावले.
- अमेरिकेच्या लाश्वान मेरिट या 2008 मधील विजेत्याला 43.85 सेकंदासह ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
- पहिल्या तीनही स्पर्धकांनी 44 सेकंदाच्या आत शर्यत पूर्ण केली. स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली.
एलेनी सर्वात वेगवान महिला धावपटू :
- ब्रिटनची लांब पल्ल्याचा धावपटू फराहने निराशाजनक सुरुवातीनंतर जेतेपद राखताना रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 हजार मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला.
- ऑलिम्पिकमध्ये फराहने तिसऱ्यांदा सुवर्ण पटकाविण्याची कामगिरी केली.
- जमैकाची एलेनी थॉम्पसन महिलांच्या 100 मीटर दौड स्पर्धेत नवी चॅम्पियन ठरली.
- 33 वर्षीय फराह शर्यतीदरम्यान पडल्यानंतरही पुन्हा उठला आणि अंतिम टप्प्यात रंगतदार स्थितीत पोहोचलेल्या रेसमध्ये 27 मिनिट 5.17 सेकंद वेळेसह बाजी मारली.
- फराह ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा सुवर्णपदकाचा मान मिळविणारा ब्रिटनचा पहिला धावपटू ठरला.
- फराहने लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये 5 हजार आणि 10 हजार मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
- महिलांच्या 100 मीटर दौड स्पर्धेत एलेनीने मायदेशातील सहकारी शैली एन फ्रेजर प्राईसला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदक पटकावले.
- एलेनीने 10.71 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले.
देशात शौचालय निर्मितीत महाराष्ट्र प्रथम :
- राज्यातील नागरी लोकवस्तीची वाटचाल हागणदारीमुक्तीकडे सुरू असून, ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
- तसेच महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.
- महाराष्ट्रात ही मोहीम राबवण्यात आल्यापासून आतापर्यंत शहरी भागात 1,64,871 शौचालयांची उभारणी झाली आहे.
- ‘स्वच्छ भारत शहर अभियाना’स महाराष्ट्रात 15 जून 2015 रोजी सुरवात झाली.
- देशांतर्गत पातळीवर तुलना करताना महाराष्ट्राचा क्रमांक सर्वप्रथम लागतो.
- महाराष्ट्रात आतापर्यंत 100 शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.
- राज्याच्या नगर विकास विभागातर्फे मोहीम राबवताना लोकसहभागातूनही उभारणी केली जात आहे.
- तसेच यासाठी एका लाभार्थीला जास्तीत जास्त 17 हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये केंद्र सरकार 4 हजार, राज्य सरकार 8 हजार रुपये व स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त 5 हजार रुपये इतकी मदत करते.
जगातील पहिला ‘अँटी हॅकिंग’ उपग्रह चीनमध्ये :
- चीन जगातील पहिल्या क्वांटम संचार उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहाचे वैशिष्ट्य हे, की या उपग्रहामध्ये एक असे बटण आहे, ज्यामध्ये हॅकरना रोखण्यासाठी उच्च सुरक्षा साधनांचा समावेश करण्यात आला आहे.
- तसेच त्यामुळे जगातील पहिला अँटी-हॅकिंग उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मान चीनला मिळणार आहे.
- चीनमधील झिन्हुआ वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले. या उपग्रहामुळे हॅकिंगविरहित अभेद्य संचारप्रणालीचा चीनचा मार्ग प्रशस्त होणार आहे.
- जुलै, 2015 मध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळेची शांघायमध्ये निर्मिती करण्यात आली होती, ज्याची स्थापना चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्स, तसेच इंटरनेट व्यापारातील चीनची सर्वांत मोठी कंपनी ‘अलिबाबा’ने केली होती.
- क्वांटम प्रमुख प्रौद्योगिकी अतिउच्च दर्जाच्या सुरक्षेबाबत आश्वस्त करत आहे. कारण, फोटॉनला वेगळे करता येत नाही किंवा त्याची प्रतिकृतीही बनविता येत नाही, त्यामुळे यामधून जाणाऱ्या सूचना हॅक करणे केवळ अशक्य आहे.
- तसेच यासोबत क्वॉंटममध्ये संवाद करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या किंवा त्यांचे संभाषण चोरून ऐकणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीविषयी सूचनाही देण्याची क्षमता यामध्ये आहे.
- 2030 पर्यंत 50 ते 100 क्वांटम बिट्झचे एकसारखे संगणक बनविण्यात येणार आहेत. या संगणकांची क्षमता सर्वसाधारण संगणकापेक्षा कितीतरी पटीने उच्च दर्जाची असणार आहे.
दिनविशेष :
- 1886 : श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी यांचे स्मृतीदिन.
- 1957 : रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 1960 : जोसेफ किटीन्जरने 31,330 मीटर (1,02,800 फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा