Current Affairs of 15 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2016)

वेस्टइंडिज विरुद्ध भारताचा मालिका विजय :

 • विंडीज संघावर भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात 237 धावांनी विजय मिळविला. हा सामना जिंकून त्यांनी चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच मालिकावर विजय प्राप्त केली.
 • विजयासाठी 346 धावांचे आव्हान असणाऱ्या विंडीजचा डाव 108 धावांत गुंडाळून भारताने हा विजय साकार केला.
 • महंमद शमीने तीन, तर रवींद्र जडेजा आणि इशांत शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
 • भारताचा गडगडलेला पहिला डाव सावरताना शतकी खेळी उभारणारा अश्‍विन सामन्याचा मानकरी ठरला.
 • भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 217 धावसंख्येवर घोषित केला. अजिंक्‍य रहाणे 78 धावांवर नाबाद राहिला.
 • विंडीज संघासमोर 87 षटकांत 346 धावा करण्याचे आव्हान भारताने ठेवले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2016)

23 सुवर्ण पदक विजेता मायकेल फेल्प्सची निवृत्तीची घोषणा :

 • ऑलिंपिकमध्ये 23 सुवर्ण पदके मिळविणाऱ्या जगविख्यात मायकेल फेल्प्स या जलतरणपटूने आपल्या सोनेरी कारकिर्द समाप्त केली.
 • 46×100 मिटर मेडल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
 • रिओ ऑलिंपिमध्ये त्याने हे पाचवे पदक प्राप्त केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने 23 सुवर्ण, तीन रौप्य दोन कांस्य मिळविले.

हंगपन दादा यांना मरणोत्तर ‘अशोकचक्र’ :

 • दोन महिन्यांपूर्वी सीमेवरून काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार पाकिस्तान प्रशिक्षित सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा करत, स्वत:च्याही प्राणांची बाजी लावून शहीद झालेले भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
 • महाराष्ट्रातील दोघांना शौर्य चक्रे, तर दोघांना सेना पदके जाहीर झाली आहेत.
 • तिन्ही सेनादलांचे सरसेनापती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा यासाठी अतुलनीय शौर्य बजावणाऱ्या सेनादलांमधील आजी-माजी अधिकारी व जवानांना विविध पुरस्कार जाहीर केले.
 • शांतता काळात दिला जाणारा ‘अशोक चक्र’ हा सर्वोच्च बहुमान हवालदार हंगपन दादा यांना जाहीर झाला.

  राष्ट्रपतींनी अशोक चक्राखेरीज अन्य 82 पुरस्कारांना मान्यता दिली आहे.

 • तसेच यात 14 शौर्यचक्रे, 63 सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायू सेना पदकांचा समावेश आहे.

ऑलिंपिकमध्ये अमेरिकेने जिंकली 1000 सुवर्ण :

 • ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक तालिकेत कायमच आपले वर्चस्व कायम असलेल्या अमेरिकेने आतापर्यंत तब्बल एक हजार सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.
 • रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जलतरणात अमेरिकेने महिलांच्या 4 बाय 100 मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक स्पर्धांमधील हजारावे सुवर्णपदक मिळविले.
 • अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक 1896 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिहेरी उडी प्रकारात जेम्स कोन्नोलीने मिळविले होते.
 • त्यानंतर अमेरिकेचा सुवर्णपदके मिळविण्याचा धडाका सुरूच आहे. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत अमेरिकेने 24 सुवर्णांसह 61 पदके मिळविलेली आहेत.
 • जलतरणात अमेरिकेने 16 सुवर्णपदाकांसह 33 पदके मिळविली आहेत. लंडन ऑलिंपिकमध्येही जलतरणात अमेरिकेने एवढीच पदके मिळविली होती.
 • रिओ ऑलिंपिकमधील मायकेल फेल्प्सने पाच सुवर्ण मिळविली आहेत.

ऑलिम्पिकमध्ये बोल्टची ‘सुवर्ण’ हॅटट्रिक :

 • संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या पुरूषांच्या 100 शंभर मीटर शर्यतीत ‘वेगाचा बादशहा’ अशी ओळख असलेला जमैकाचा स्टार खेळाडू उसेन बोल्टने यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवत ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली.
 • ऑलिम्पिक स्पर्धेतील बोल्टचे हे सातवे पदक आहे.
 • बोल्टने ही शर्यत 9.81 सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदाकवर आपले नाव कोरले बोल्टला या शर्यतीत त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन, माजी विश्‍वविजेता योहान ब्लेक यांच्यासह अमेरिकेचा ट्रायव्हन ब्रोमेल, कॅनडाचा आंद्रे दी ग्रेस, माजी विश्‍वविजेता सेंट किट्‌सचा किम कॉलीन्स या प्रमुख धावपटूंचे आव्हान होते.
 • पण, बोल्टने पुन्हा एकदा आपणच जगातील वेगवान धावपटू असल्याचे सिद्ध केले.
 • जस्टिन गॅटलीनने 9.89 सेकंदांसह रौप्य आणि आंद्रे दी ग्रेसने ब्राँझपदक मिळविले.
 • तसेच यापूर्वी 100 मीटरमध्ये अमेरिकेच्या आर्ची हान (1904 व 1908) आणि कार्ल लुईस (84 व 88) यांना सलग सुवर्णपदक मिळवता आले होते.

दिनविशेष :

 • भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया स्वातंत्र्य दिन.
 • पोलंड सेना दिन.
 • 1519 : पनामा सिटी शहराची स्थापना.
 • 1537 : ऍसन्शन शहराची स्थापना.
 • 1947 : भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.