Current Affairs of 15 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 ऑक्टोंबर 2015)
महामार्ग निर्मिती प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय :
- ‘यूपीए’ सरकारच्या काळातील रखडलेल्या महामार्ग निर्मिती प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
- यानुसार पन्नास टक्के काम झालेल्या अशा प्रकल्पांना आर्थिक मदत देऊन ते पूर्ण केले जातील.
- भ्रष्टाचार, आर्थिक चणचण यांसारख्या कारणांमुळे रखडलेल्या प्रकल्पांना एकाच वेळी आर्थिक मदत देऊन ते पूर्ण केले जाणार आहेत.
- यासाठी नोव्हेंबर 2014 पर्यंत 50 टक्के काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांनाच ही मदत मिळेल.
- त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, अर्थसाहाय्य देणारी वित्तीय संस्था आणि संबंधित यंत्रणा यांच्यात त्रिपक्षीय करार केला जाईल.
Must Read (नक्की वाचा):
अरूण जेटली यांना “फायनान्स मिनिस्टर ऑफ द ईअर, एशिया” हा पुरस्कार जाहीर :
- केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना लंडनच्या प्रतिष्ठित “इमर्जिंग मार्केट्स”ने या नियतकालिकाने “फायनान्स मिनिस्टर ऑफ द ईअर, एशिया” हा पुरस्कार जाहीर केला आहे.
- त्यामुळे जेटली हे आशियातील सर्वाधिक यशस्वी अर्थमंत्री ठरले आहेत.
- गेल्या 18 महिन्यात अरूण जेटली यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत, त्यामुळे जेटली पुरस्कारसाठी खरोखरच पात्र आहेत, असे “इमर्जिंग मार्केट्स” कडून सांगण्यात आले.
- भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि रिझर्व्ह बॅंक ऑप इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन देण्यात आले आहे.
- आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना गेल्यावर्षी “इमर्जिंग मार्केट्स”ने “सेंट्रल बॅंक गव्हर्नर ऑफ द ईअर” पुरस्कार दिला होता.
- तर 2010 मध्ये सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताचे अर्थमंत्री असताना “फायनान्स मिनिस्टर ऑफ द ईअर” पुरस्कार देण्यात आला होता.
महाधिवक्तापदी श्रीहरी गणेश अणे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय :
- विदर्भातील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आणि कट्टर विदर्भवादी नेते श्रीहरी गणेश अणे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- राज्य मंत्रिमंडळाने तशी शिफारस राज्यपालांकडे केली.
- 13 एप्रिल 1950 रोजी पुणे येथे जन्मलेले अॅड. अणे यांचे शालेय शिक्षण जमशेदपूर येथे झाले, तर पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली.
- 1974 पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली.
- नागपूर विद्यापीठाचा जनसंवाद विभाग तसेच कामगार संबंध आणि व्यवस्थापन विभागात अध्यापनही केले.
- 1994 ते 97 या काळात ते नागपूरच्या हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता :
- खेड्यांना जोडणारे नवीन रस्ते करणे आणि रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी 14 हजार कोटी रुपये येत्या चार वर्षांत खर्च करण्याची तरतूद असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्य
मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
- ही योजना ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे.
- या योजनेत रस्त्यांची निवड ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या निकषांनुसार करण्यात येणार आहे.
- गुणवत्ता तपासणीसाठी त्रिस्तरीय तपासणी यंत्रणेची उभारणी, सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण आणि पाच वर्षांचा दोषदायित्व कालावधी ही या योजनेची कार्यप्रणाली राहणार आहे.
- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांची लांबी किंवा राज्यातील जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची लांबी आणि जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक यांना प्रत्येकी 50 टक्के गुण दिले जाणार आहेत.
- प्रत्येक तालुक्यास साधारण 85 किमीची लांबी मिळणार आहे.
मॅन बुकर पुरस्कार मार्लन जेम्स त्यांना जाहीर :
- साहित्यातील अत्यंत मानाचा व महत्त्वाचा समजला जाणारा मॅन बुकर पुरस्कार मिळवून जमैकन लेखक मार्लन जेम्स यांनी नवा इतिहास रचला आहे.
- ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग्ज’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मॅन बुकरच्या 47 वर्षांच्या इतिहासात पुरस्कार मिळविणारे ते पहिले जमैकन लेखक ठरले आहेत.
- जमैकाचा इतिहास आणि तेथील राजकीय अस्थिरतेवर विविध कथनांतून भाष्य करणारी ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग्ज’ ही कादंबरी 2014 साली प्रसिद्ध झाली होती.
- याच कादंबरीस ‘ओसीएम बोकास प्राईज ऑफ कॅरेबियन लिटरेचर’ हा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
- मार्लन यांची 2009 साली प्रसिद्ध झालेली ‘द बुक ऑफ नाईट वूमेन’ या 19 व्या शतकातील जमैकन मळ्यांमधील गुलाम स्त्रीच्या बंडावरील कादंबरीही विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी 2010 साली ‘जॉन क्रोज डेव्हिल’ ही कादंबरी लिहिली.
- त्यांना यापूर्वी नॅशनल बुक ऑफ क्रिटिक सर्कल अवॉर्ड, डेटन लिटररी प्राईज, मिनिसोटा बुक अवॉर्ड, सिल्व्हर मुसग्रेव्ह मेडल, अॅनिस्फिल्ड वूल्फ बुक अवॉर्ड हे पुरस्कार मिळालेले आहेत.
बोस यांच्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्यास त्यांच्या जयंतीदिनापासून सुरू :
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित सर्व गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया केंद्र सरकार पुढील वर्षी 23 जानेवारी या त्यांच्या जयंतीदिनापासून सुरू करणार असल्याची
घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे केली.
- नेताजींशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याचा हा मुद्दा गेल्या सात दशकांपासून प्रलंबित आहे.
- मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबातील 35 सदस्यांची आपल्या निवासस्थानी भेट घेतेवेळी फाईल्स सार्वजनिक करण्याबाबतची घोषणा केली.
- दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये नेताजींचा पुतळा संग्रहालय स्थापन करण्यात येईल, असेही मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांना सांगितले.
- नेताजींशी संबंधित किमान 160 फाईल्स केंद्र सरकारकडे आहेत.
- त्या सार्वजनिक झाल्यास 1945 मध्ये नेताजींच्या रहस्यमयरीत्या बेपत्ता होण्यामागचे कारण उघड होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष :
- जागतिक अंध दिन
- विश्व खाद्य दिन
- 1542 : मुघल सम्राज्याचा इतिहास प्रसिद्ध सम्राट बादशहा अकबर यांचा जन्म.
- 1888 : ‘सुधारक’ या गोपाळ गणेश आगरकर वृत्त पत्राचा प्रारंभ
- 1998 : भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमत्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार.