Current Affairs of 16 October 2015 For MPSC Exams
![चालू घडामोडी (16 ऑक्टोंबर 2015) चालू घडामोडी (16 ऑक्टोंबर 2015)](https://www.mpscworld.com/wordpress/wp-content/uploads/2015/10/16-Oct.jpg)
चालू घडामोडी (16 ऑक्टोंबर 2015)
आणखी सहा लेखकांनी केले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत :
- देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ आणखी सहा लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत.
- प्रसिद्ध इंग्रजी कवी केकी दारूवाला व राजस्थानी लेखक नंद भारद्वाज यांचा यात समावेश आहे.
- दादरी हत्याकांड तसेच गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या निषेधार्थ लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्यास सुरवात केली आहे.
- त्यांची संख्या आतापावेतो 26 वर पोचली आहे.
- शशी देशपांडे व सच्चिदानंदन यांच्यासारख्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले.
- यात आज दारूवाला व भारद्वाज यांच्यासह वीरभद्रप्पा, के. नीला, आर. के. हुडूग्गी व काशिनाथ अंबालगी या कन्नड साहित्यिकांचीही भर पडली.
Must Read (नक्की वाचा):
प्रति”कॉल ड्रॉप” एक रुपया दंड :
- दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) चा प्रति“कॉल ड्रॉप”पोटी एक रुपया दंड मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना द्यावा, असा एक प्रस्ताव आहे.
- तसेच हा दंड देशातील सर्व कंपन्यांना द्यावा लागू शकतो.
- या संदर्भात सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यामुळे असा दंड लावला जाऊ शकतो, असे समजते.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे रामेश्वरममध्ये भव्य स्मारक उभारण्याची घोषणा :
- देशाचे क्षेपणास्त्रपुरुष आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे रामेश्वरममध्ये भव्य स्मारक उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- तसेच ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून रामेश्वरमचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
- उदयोन्मुख संशोधकांना प्रेरणा मिळावी म्हणून रामेश्वरममध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येईल.
- या स्मारकाच्या उभारणीसाठी सरकारने भूसंपादन केले असून, यासंबंधी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयीन समितीही स्थापन करण्यात आली आहे.
- केंद्र सरकार “अमृत” योजनेच्या माध्यमातून रामेश्वरमचा कायाकल्प घडवून आणणार असल्याचे नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी जाहीर केले.
मॅगीच्या 13 नमुन्यांची तपासणी करण्याचा आदेश :
- मॅगीमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट या घातक रसायनाचे प्रमाण सापडल्यावरून केंद्र सरकारने नेस्ले इंडियाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण
आयोगाने मॅगीच्या 13 नमुन्यांची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.
- सरकारच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.
- हे सर्व नमुने म्हैसूरमधील केंद्रीय अन्न तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये पाठविण्याची सूचना आयोगाने दिली आहे.
- सरकारने गोळा केलेल्या 17 पैकी 13 नमुन्यांमध्ये घातक घटक नव्हते, असा कंपनीचा दावा आहे. लखनौमधून मॅगीच्या गोदामातून शंभर नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठवण्यासही आयोगाने सांगितले आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही :
- विविध सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार नाही, त्याचा वापर ऐच्छिक असेल, असा स्पष्ट उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र लवकरच सादर करण्यात
येईल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली.
- सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. एम. वाय. इक्बाल, न्या. सी. नागप्पन, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. अमिताव घोष यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
आठ वांशिक बंडखोर गटांविरुद्ध राष्ट्रीय शांतता करार :
- म्यानमारमधील सरकारने देशातील यादवीमध्ये सहभागी असलेल्या आठ वांशिक बंडखोर गटांविरुद्ध राष्ट्रीय शांतता करार करण्यात यश मिळविले आहे.
- म्यानमारमध्ये सुमारे सहा दशकांपासून सुरु असलेली रक्तरंजित यादवी थांबवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नासंदर्भात येथील सरकारचे हे पहिले यशस्वी पाऊल मानले जात आहे.
- अर्थात, अन्य काही बंडखोर गटांनी दोन वर्षांच्या चर्चेनंतरही अशा स्वरुपाचा शांतता करार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
- म्यानमारची राजधानी असलेल्या नयपिदाव्ह येथे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
- हा शांतता करार हा या सरकारचे एक मुख्य उद्दिष्ट मानले जात होते.
- मात्र म्यानमारमधील काचीन आणि वा यांसारख्या मोठ्या बंडखोर गटांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने या मोहिमेस अपेक्षित यश मिळले नसल्याचे मानण्यात येत आहे.
गोलंदाज झहीर खानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
- झहीर खान आज याबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार आहे.
- झहीर खान हा 2011 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वकरंडक विजेत्या संघाचा सदस्य होता.
- झहीर खानने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये नैरोबी येथे केनियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते.
- त्याने या पहिल्या सामन्यातच 48 धावा देत तीन बळी घेतले होते.
- झहीरने भारतीय संघासाठी 200 एकदिवसीय सामने खेळले असून, 282 बळी घेतले आहेत. झहीरने 2000 मध्येच बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते.
- त्याने 92 कसोटी सामन्यांत 311 बळी घेतले आहेत.
अॅस्ट्रोसॅटने पाठवले पहिले छायाचित्र :
- भारताच्या अॅस्ट्रोसॅट या अवकाश निरीक्षण वेधशाळेने पहिले छायाचित्र पाठवले असून ते भारतीय अवकाश संस्था म्हणजे इस्रोने ट्विटरवर प्रसारित केले आहे.
- बहुतरंगलांबीच्या अॅस्ट्रोसॅट वेधशाळेने टिपलेले हे छायाचित्र अतिदीप्त नवताऱ्याच्या (सुपरनोव्हा) अवशेषांचे आहे.
- त्यात खेकडय़ाच्या आकाराचा तेजोमेघ (नेब्यूला) दिसत आहे.
- हे छायाचित्र शुक्रवारी घेण्यात आले असून तो तेजोमेघ हा प्रखर क्ष किरण सोडणारा आहे.
- इस्रोच्या ब्लॉग पोस्टवर म्हटले आहे की, हा तेजोमेघ अॅस्ट्रोसॅटला प्रथम कक्षेतून दिसला नाही, कारण ही वेधशाळा त्यावेळी दक्षिण अटलांटिक भागातून जात असावी.
- साउथ अॅटलांटिक अॅनोमली (एसएए) म्हणजे अवकाशातील बम्र्युडा ट्रँगल (जेथे वस्तू दिसत नाहीत असा भाग) असून त्यामुळे खगोलशास्त्रीय निरीक्षणात अडथळे येतात.
- इलेक्ट्रॉनिक प्रणाली व संगणक, अवकाशयानातील भाग पुरेशा क्षमतेने काम करीत नाहीत.
- अगोदर अॅस्ट्रोसॅट वेधशाळा या भागातून जात असताना सर्व उपकरणे बंद करण्यात आली होती.
- आता जीआरएस 1915+105 सिग्नस एक्स 1 व सिग्नस एक्स 3 या कृष्णविवरांच्या उगमस्थानांचा नोव्हेंबरमध्ये वेध घेतला जाणार आहे.
- इस्रोने म्हटले आहे की, सीझेटी, एलएएक्सपीसी व एसएक्सटी ही क्ष किरण उपकरणे अवकाशीय वस्तूंचा अभ्यास करण्यास सज्ज आहेत.
- भारताने 28 सप्टेंबरला अॅस्ट्रोसॅट ही वेधशाळा अवकाशात सोडली होती.
- क्रॅब नेब्यूलाहा खेकडय़ाच्या आकाराचा तेजोमेघ असून तो 10 प्रकाशवष्रे व्यासाचा आहे व सेकंदाला 1500 किलोमीटरने प्रसरण पावत आहे.
- त्याची रचना वैज्ञानिकांना कोडय़ात टाकणारी असून तो साध्या तेजोमेघासारखा नसून गुंतागुंतीची वेटोळी त्यात आहेत, ती वेटोळीही वेगाने प्रसरण पावत आहेत.
- अवकाशात साऊथ अॅटलांटिक अनोमली नावाचा जो भाग आहे तो बम्र्युडा ट्रँगलसारखा मानला जातो तो पृथ्वीपासून 1000 ते 6000 किलोमीटर उंचीवरील असा प्रारणांचा पट्टा आहे तेथे सौर प्रारणे अडकलेली आहेत.
- एखादे अवकाशयान किंवा अवकाश स्थानक या भागात गेले की, त्यावरील यंत्रे किंवा लॅपटॉप बंद पडतात असे सांगितले जाते.
- प्रखर प्रारणांमुळे या भागात दृश्यभ्रम होऊन अवकाशस्थ वस्तू दिसतही नाहीत असे म्हटले जाते.
- त्याचा शोध 1950 मध्ये लागला.
- या साऊथ अॅटलांटिक अॅनोमली (एसएए) या भागात व्हॅन अलेन प्रारण पट्टा असून तेथील भारित कण पृथ्वीच्या जवळ येतात.
दिनविशेष :
- जागतिक अन्नदिन
- 1905 : लॉर्ड यांनी बंगालची फाळणी केली.
- 1968 : हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक