Current Affairs of 14 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 ऑक्टोंबर 2015)

चालू घडामोडी (14 ऑक्टोंबर 2015)

बंगाली कवी मंदाक्रांता सेन यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत :

  • दादरी येथील हत्याकांड आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रसिद्ध बंगाली कवी मंदाक्रांता सेन यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे.
  • देशात वाढत असलेल्या हिंसक घटनांना विरोध करत देशभरातील अनेक लेखक व कवींनी आतापर्यंत साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेले आहेत.
  • आता या यादीत सेन यांचेही नाव समाविष्ट झाले आहे.
  • सेन यांना 2004 मध्ये स्वर्णजयंती विशेष साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
  • सेन यांची 22 कवीतांची पुस्तके आहेत, तर सात कादंबऱ्या आहेत.

विष्णुदास भावे गौरव पदक विक्रम गोखले यांना जाहीर :

  • मराठी रंगभूमीवरील नाट्यकर्मींना देण्यात येणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा चतुरस्र अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाले आहे.
  • 1959 पासून सुरू झालेल्या या पुरस्काराचे हे 50वे वर्ष आहे.
  • येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी प्रथेप्रमाणे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा अभिनेत्री फय्याज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
  • गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि 11 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • यंदाचे मानकरी गोखले यांचे वडील अभिनेते चंद्रकांत गोखले यांना भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित :

  • चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर 1.5 अब्ज डॉलर खर्च करून उभारलेला जलविद्युत प्रकल्प आजपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे.
  • या प्रकल्पामुळे भारताच्या चिंता वाढल्या असून, बह्मपुत्रेचा संपूर्ण प्रवाहच चिनी ड्रॅगनकडून गिळंकृत केला जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे.
  • या प्रकल्पातील सर्व सहा युनिट्‌स पूर्ण क्षमतेने काम करू लागले असून, त्यातून विजेची निर्मितीही होऊ लागली आहे.
  • वुहान शहरातील “चायना गेझोबा” समूहाने हा प्रकल्प उभारला आहे.
  • तिबेटमधील गायका काउंटीतील हा प्रकल्प “झांग्मू हायड्रोपॉवर स्टेशन” या नावानेही ओळखल्या जातो. तिबेटमधील हा प्रकल्प सर्वांत उंचीवरील प्रकल्प म्हणून ओळखला जातो.
  • या प्रकल्पातील पहिले युनिट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कार्यान्वित झाले होते.
  • ड्रॅगन प्रोजेक्‍टची वैशिष्ट्ये :
  • 2.5 अब्ज किलोवॉट दरवर्षी निर्माण होणारी वीज
  • 140 किलोमीटर प्रकल्पाची ल्हासापासूनची लांबी
  • 9.6 अब्ज युआन प्रकल्पातील गुंतवणूक

इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात ऐतिहासिक करारास मंजुरी :

  • इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या ऐतिहासिक करारास येथील संसदेने मंजुरी दिली.Karar
  • इराणच्या संसदेमधील सदस्यांच्या चर्चेनंतर यासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यात आला.
  • इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भातील संयुक्त योजनेचा समावेश असलेल्या या प्रस्तावाच्या बाजुने 161 तर विरोधात 59 सदस्यांनी मतदान केले.
  • इतर 13 सदस्यांनी या प्रस्तावासाठी मतदान केले नाही.
  • हा करार यशस्वीरित्या करण्यात आल्याची घोषणा गेल्या 14 जुलै रोजी करण्यात आली होती.

नासाचा क्यूबसॅट हा नॅनोउपग्रह कार्यान्वित झाला :

  • नासाचा क्यूबसॅट हा नॅनोउपग्रह कार्यान्वित झाला आहे.NASA
  • अ‍ॅटलास पाच या अग्निबाणाच्या मदतीने तो कॅलिफोíनयातील व्हनडेनबर्ग हवाई दल तळावरून तो ऑक्टोबरला सोडण्यात आला होता.
  • हा नॅनो उपग्रह उत्तम काम करीत आहे, असे नासाने म्हटले आहे.
  • द ऑप्टिकल कम्युनिकेशन अँड सेन्सर डेमनस्ट्रेशन (ओसीएसडी) क्यूबसॅट उपग्रह हा कक्षेत फिरत असून त्याने काम सुरू केल्याचे नासा व द एरोस्पेस कार्पोरेशनचे एल सेगुंडो यांनी कॅलिफोíनयात सांगितले.
  • शैक्षणिक संशोधनाकरिता क्यूबसॅटचा वापर केला जाणार असून अवकाशीय खगोलांचा वेध व इतर तांत्रिक बाबींसाठी एक किफायतशीर यंत्रणा असावी, हा उद्देश त्यामागे आहे.
  • तसेच त्यातून पृथ्वी निरीक्षणही साध्य होणार आहे.
  • अवकाशयानांची संदेशवहन क्षमता वाढवून त्यांना माहिती मि़ळवण्यात आणखी सक्षम केले जाऊ शकते व ओसीएसडी हा त्यासाठी चांगला पर्याय आहे.
  • क्यूबसॅटमुळे विद्यार्थ्यांना उपग्रह विकास, संचालन व वापर याची प्रत्यक्ष माहिती मिळू शकते व प्रत्यक्ष माहितीच्या आधारे संशोधन करता येते.
  • नासा तंत्रज्ञान मोहिमेत सहा उपग्रह सोडणार असून ते ओसीएसडी मालिकेतील हा पहिलाच उपग्रह आहे.
  • हे नॅनो उपग्रह प्रत्येक बाजूने चार इंचाचे असतात, त्यांच्या मदतीने तंत्रज्ञानाचा परीक्षण करणे सोपे जाते.
  • ओसीएसडी हे लेसर संदेशवहन पद्धतीपेक्षा वेगळे आहेत कारण लेसर यंत्रणा उपग्रहावर बसवावी लागते व क्यूबसॅट हा लेसर किरणांची दिशा नियंत्रित करतो.
  • त्यामुळे लेसर यंत्रणा अधिक आटोपशीर असते व त्यामुळे आधी अवकाशात सोडलेल्या कुठल्याही उपग्रहांपेक्षा ते सुटसुटीत आहेत.
  • क्यूबसॅट : हे उपग्रह आकाराने लहान म्हणजे सर्व बाजूंनी चार इंचाचे असतात व त्यातून सेकंदाला 20 मेगाबाइट इतक्या माहितीची देवाणघेवाण लेसर मार्फत होते.
  • क्यूबसॅट संदेशवहन प्रणालीची क्षमताही जास्त असते.
  • यातील ओसीएसडी मालिकेतील दुसरा नॅनो उपग्रह फेब्रुवारी 2016 मध्ये कार्यान्वित होणार आहे.

ट्विटर कर्मचारी कपात करणार :

  • सोशल मिडीयातमध्ये सर्वाधिक नावारुपाला आलेले ट्विटर कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त आहे.Twitter
  • येत्या काही दिवसात ट्विटर आपल्या जवळजवळ 136 कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखविणार आहे.
  • ट्विटर कंपनीत सध्या 4100 कर्मचारी कार्यरत असून यामधून आठ टक्के म्हणचेच 336 कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ जॅक डॉरसे यांनी केली आहे.
  • काही प्रमाणात कर्मचा-यांची कपात केल्याने कंपनीला फायदा होणार असून कंपनीच्या आगामी वाटचालीसाठी हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे जॅक डॉरसे यांनी म्हटले आहे.
  • दरम्यान याप्रकरणी कंपनीच्या सर्व कर्मचा-यांना ई-मेलच्या माध्यमातून जॅक डॉरसे यांनी कळविले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.