Current Affairs of 15 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 मार्च 2016)

चालू घडामोडी (15 मार्च 2016)

माजी सैनिकांना ‘ओआरओपी’चा लाभ :

 • नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘वन रॅंक, वन पेन्शन’ (ओआरओपी) योजनेअंतर्गत आवश्‍यक ते आर्थिक लाभ सुमारे दोन लाख माजी सैनिकांना देण्यात आली आहे.
 • तसेच, सुमारे एक लाख 46 हजार माजी सैनिकांच्या परिवारांना सुधारित नियमांनुसार आर्थिक लाभ देण्यात आले आहेत.
 • सुमारे दोन लाख 21 हजार 224 माजी सैनिकांना ‘ओआरओपी’ अंतर्गत आर्थिक लाभ देण्यात आले आहेत.
 • निवृत्तिवेतनातील थकबाकीचा पहिला हप्ता 1 मार्च रोजी माजी सैनिकांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 • माजी सैनिकांच्या उर्वरित एक लाख 46 हजार 335 परिवारांना लवकरच ‘ओआरओपी’चे लाभ देण्यात येणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2016)

344 औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बंदी :

 • दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचे निश्चित मिश्रण असलेल्या किमान 344 औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.
 • बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये कफ सिरपच्या मिश्रणाचाही समावेश आहे.
 • मनुष्यमात्राने अशा प्रकारच्या औषधांचा वापर करण्यात ‘जोखीम’ आहे आणि या औषधांचा सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
 • तसेच या 34 औषधांवरील बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे आणि मंत्रालयाने या संदर्भात राजपत्रात एक अधिसूचनाही जारी केली आहे.
 • 344 पेक्षा जास्त औषध कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती.
 • विशेषज्ञ समितीने आपल्या शिफारशी सादर केल्यानंतर या कंपन्यांना आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती, परंतु काही कंपन्यांनी नोटिशीला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही.

टपाल कार्यालयात बँकिंग सुविधा :

 • देशभरातील 20 हजार 106 टपाल कार्यालयांत कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने बचत खातेधारकांना या कार्यालयातून व्यवहार करता येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.
 • 2014 पर्यंत फक्त 230 टपाल कार्यालये कोर बँकिंग सुविधेने जोडण्यात आली होती.
 • कोर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस) टपाल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्पाचा भाग आहे.
 • विविध आयटी सोल्यूशनच्या माध्यमातून टपाल कार्यालये आयटी सुविधांनी सज्ज करणे, हा यामागचा उद्देश आहे.
 • टपाल विभागाने सर्व विभागीय टपाल कार्यालयात सीबीएस प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, यात एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधेचाही समावेश असेल.
 • टपाल विभागाला 7 डिसेंबर 2015 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने 18 महिन्यांत पेमेंट बँक स्थापन करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती.

वीज कंपन्यांसाठी ‘उदय’ योजना :

 • विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम) सहन करावा लागणारा तोटा लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता या क्षेत्रात सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे.
 • तसेच या अंतर्गत या कंपन्यांच्या वित्तीय आणि परिचालन दक्षतेसाठी उज्ज्वल डिस्कॉम इन्श्युरन्स योजना (उदय) सुरू करण्यात आली आहे.
 • अशी माहिती ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल यांनी (दि.14) दिली.
 • या योजनेचा मुख्य उद्देश वीज वितरण कंपन्यांच्या दक्षतेत सुधारणा करणे आणि वितरण क्षेत्रात व्याजाचा बोजा, वीज उत्पादन खर्च आणि वाणिज्यिक तोटा कमी करणे हा आहे.

अग्नी-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

 • भारतात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या न्युक्लर अग्नी-1 या अण्वस्त्रवाह क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी करण्यात आली.
 • जमीनीवरुन जमीनीवर 700 कीमी पर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे.
 • भारतीय लष्कराने (दि.14) सकाळी 9:11 वाजता अब्दुल कलाम बेटावरुन (व्हीलर बेटे) यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 • 12 टन वजन व 15 मीटर लांबी असलेल्या अग्नि-1 क्षेपणास्त्रावरुन 1 टनापेक्षा जास्त वजनाची स्फोटके वाहून नेता येणे शक्‍य आहे.
 • तसेच याबरोबर स्फोटकांचे वजन (पेलोड) कमी करुन क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येणेही शक्‍य आहे.
 • भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यामधील अग्नि हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

भारतातून 700 ज्यू इस्त्राईलला स्थलांतरित होणार :

 • ज्यू नागरिकांना इस्राईलमध्ये परत आणण्यासाठीच्या निधीत येथील सरकारने दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील जवळपास 700 ज्यू नागरिक यंदा इस्त्राईलला स्थलांतरित होणार आहेत.
 • इस्त्राईलच्या निर्मितीपासून जगभरात पसरलेले ज्यू नागरिक तेथे कायमस्वरूपी जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे सरकारही त्यांना मदत करत असते.
 • भारतातील मणिपूर आणि मिझोरममध्ये राहणारे ब्नेई मेनाशे समुदाय हा ज्यूंच्या दहा प्रमुख टोळ्यांपैकी एक समजला जातो.
 • तसेच त्यांना 2005 मध्येच इस्त्राईलने परतण्यास परवानगी दिली आहे.
 • स्थलांतरितांना देशामध्ये आणून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या निधीत इस्त्राईलने मोठी वाढ केल्याने दर वर्षीपेक्षा तिप्पट संख्येने भारतातील ज्यू तिथे जाऊ शकतात.
 • इस्त्राईलमध्ये सध्या ब्नेई मेनाशे समुदायाचे सुमारे तीन हजार नागरिक राहत असून, त्यापैकी सहाशे जणांचा जन्म भारतात झाला आहे.

दिनविशेष :

 • 1831 : मराठीतील पहिले पंचांग छापले गेले.
 • आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
 • नियोजन दिन
 • जागतिक अपंगत्व दिन

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.