Current Affairs of 14 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 मार्च 2016)

चालू घडामोडी (14 मार्च 2016)

निमलष्करी दलात आता महिला लढाऊ :

  • निमलष्करी दलाच्या पोलिस दलामध्ये महिलांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर आता पाचही केंद्रीय सशस्त्र दलांत (सीएपीएफ) मध्ये लढाऊ अधिकारी म्हणून महिलांचा समावेश होणार.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात नुकतेच नवीन नियम जाहीर केले असून, आयटीबीपीमध्ये महिलांना थेट लढाऊ अधिकारी म्हणून अर्ज करू शकतात.
  • आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी तैनात असतात, अशा कठीण जबाबदारीमुळे महिलांना या दलात परवानगी दिली जात नाही.
  • मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलामध्ये महिला उमेदवार थेट अधिकारी म्हणून यूपीएससीमार्फत प्रवेश करत आहेत.
  • तसेच याशिवाय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा दलातही (एसएसबी) महिलांची भरती अनुक्रमे 2013 आणि 2014 पासून सुरू झाली.
  • आयटीबीपीमध्ये भरती होण्यासाठी परवानगी दिल्याने महिलांसंदर्भातील लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत.
  • सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे आता पाचही ठिकाणी लढाऊ अधिकारी किंवा जवान म्हणून महिलांचा समावेश होणार आहे.
  • एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच महिलांना 33 टक्के कॉन्स्टेबल दर्जाच्या जागा सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये आणि बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीमध्ये 15 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच त्यानुसार ‘सीएपीएफ’च्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदावर महिला नेमण्यात आली असून, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारत आणि चीनच्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमेवर आयटीबीपीचे जवान तैनात असून, सरकारने अलीकडेच या दलात 500 महिलांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सध्या आयटीबीपीमध्ये 80 हजार जवान कार्यरत असून, महिलांची संख्या दीड हजार म्हणजे एकूण संख्येच्या पावणेदोन टक्केच आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मार्च 2016)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी आता फूलपॅन्टमध्ये :

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या 91 वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला गणवेश आता काळानुरूप बदलणार आहे.
  • खाकी हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची (ब्राऊन) फुलपॅन्ट या बदलत्या गणवेशात स्वयंसेवक संघ शाखांवर लवकरच दिसू लागतील.
  • अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या त्रिदिवसीय वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांनी दिली.
  • प्रतिनिधी सभा हे रा. स्व. संघाचे सर्वोच्च धोरणात्मक मंडळ आहे.
  • काळाच्या ओघात ताठर न राहता आम्हीही हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची फुलपॅन्ट वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
  • 1925 मध्ये स्थापना झाल्यापासून ढगळ खाकी हाफपॅन्ट हा संघ स्वयंसेवकांचा ‘ट्रेडमार्क’ बनला होता.
  • कालौघात सदऱ्यामध्ये जुजबी बदल होत गेला; मात्र खाकी हाफपॅन्ट कायम राहिली होती.
  • मात्र संघ स्वयंसेवकांच्या ओळखीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही.

महिला शरीरसौष्ठव सरितादेवी ‘मिस इंडिया’ :

  • मणिपूरच्या सरितादेवीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अपेक्षित बाजी मारताना, पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस इंडिया’ किताब पटकावला.
  • तसेच त्याच वेळी तिला कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्राच्या सिबालिका सहाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • प्रथमच रायगड जिल्ह्यात (रोहे) झालेल्या या दिमाखदार स्पर्धेद्वारे, भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्राची ताकद दिसून आली.
  • एकूण 15 महिला खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत यंदाही मणिपूरचे वर्चस्व दिसले.
  • अंतिम फेरीमध्ये सरिताने सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत स्पर्धेचा निकाल स्पष्ट केला.
  • मात्र, प्रत्यक्षात सरिताने अप्रतिम प्रदर्शन करताना, सर्वांची मने जिंकत विजेतेपदावर एकहाती कब्जा केला.
  • तसेच त्यामुळे सिबालिका आणि पश्चिम बंगालच्या एलुरोपा भौमिक यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी समाधान मानावे लागले, त्याच वेळी मणिपूरच्याच रेबीतादेवीने चौथे स्थान मिळवले, तर महाराष्ट्राच्या लीलाची पाचव्या स्थानी घसरण झाली.

बांगलादेश सुपर टेनमध्ये :

  • धडाकेबाज सलामीवीर तमीम इक्बाल याने झळकावलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर टेन गटात प्रवेश करताना नवख्या ओमानला 54 धावांनी नमवले.
  • विशेष म्हणजे, टी-20 मध्ये बांगलादेशकडून पहिला शतक झळकावलेल्या इक्बालची खेळी यंदाच्या विश्वचषकमधील पहिले शतक ठरले.
  • धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून ओमानने बांगलादेशला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले.
  • मात्र, इक्बालने त्यांचा हा निर्णय उलटवताना 63 चेंडूत नाबाद 103 धावा फटकावत बांगलादेशला निर्धारित षटकांत 2 बाद 180 धावांची आव्हानात्मक मजल मारून दिली.
  • तसेच या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानचा डाव 9 बाद 65 धावांत रोखला गेला.
  • ओमान फलंदाजी करत असताना दोनवेळा आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांना 12 षटकांत 120 धावांचे कठीण आव्हान मिळाले होते.

मोठ्या शहरांजवळ ‘लॉजिस्टिक हब’ योजना :

  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय महामार्गांलगतच्या मोठ्या शहरांसाठी लॉजिस्टिक हब उभरण्याची योजना आखण्यात येत आहे.
  • तसेच त्यामुळे सामान लादणे व घेऊन जाण्यासाठी जड वाहनांना (ट्रक) शहराच्या आतून जाण्याची गरज पडणार नाही, हे हब एकप्रकारे बायपासचे काम करतील.
  • ही योजना साकारण्याकरिता असे एक मॉडेल तयार करण्यात येत आहे ज्याअंतर्गत मंत्रालयाला जमीन खरेदीची गरज पडणार नाही.
  • यासंदर्भात परिवहन मंत्रालयातर्फे पुढील महिन्यात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांसोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी सदर कंपन्यांकडून सूचना आणि सहकार्य मागितले जाईल.
  • परिवहन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विविध प्रकारचे सामान वाहून नेणारे ट्रक हे मोठ्या शहरांसाठी गंभीर समस्या ठरले आहेत, हा प्रश्न लक्षात घेऊनच परिवहन मंत्रालय लॉजिस्टिक हब स्थापनेचा विचार करीत आहे.
  • नियोजित योजनेंतर्गत शहराजवळ मंत्रालय 500 ते 1000 एकर जमीन अधिग्रहित करेल, पण खरेदी करणार नाही.
  • साधारणत: ही जमीन लीजवर घेतली जाईल, ज्या शेतकऱ्यांकडून ही जमीन घेतली जाईल त्यावर त्यांचा मालकी हक्क कायम असेल.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैन्य :

  • चीनच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीरच्या प्रत्यक्ष ताबारेषेनजीकच्या भागात त्यांचे जवान पाठवून अस्तित्व वाढवले असल्याचे दिसून आले आहे.
  • तसेच यापूर्वी लडाख भागात चीनने अनेकदा घुसखोरी केली पण आता त्यांनी काश्मीरच्या पाकिस्तानकडील बाजूनेही जवळपास घुसखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान उत्तर काश्मीरमधील नौगामच्या समोरच्या भागात दिसले आहेत.
  • प्रत्यक्ष ताबारेषेनजीक काही पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी चीनचे जवान आले होते असे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीतून सूचित झाले आहे.
  • भारतीय लष्कराने चीनच्या कारवायांबाबत जाहीरपातळीवर मौन पाळले असून ते भारतीय गुप्तचरांना मात्र माहिती देत आहेत त्यानुसार चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीचे चिनी जवान प्रत्यक्ष ताबारेषेवर आल्याचे सांगण्यात आले आहे.
  • चायना गेझोबा ग्रुप ही कंपनी झेलम-नीलम हा 970 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प राबवित आहे, हा जलविद्युत प्रकल्प भारताच्या किशनगंगा वीज प्रकल्पाला तोडीस तोड म्हणून उभारला जात आहे.
  • किशनगंगा प्रकल्प उत्तर काश्मीरमध्ये बांदीपोर येथे होत आहे, त्यात किशनगंगा नदीचे पाणी वळवून झेलम नदीच्या खोऱ्यातील वीज प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे व त्याची क्षमता 330 मेगावॉट आहे, 2007 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून तो यावर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दिनविशेष :

  • 1910 : अल्बर्ट आईन्स्टाईन, जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1931 : पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’ नॉव्हेल्टी या सिनेमागृहात दाखवला गेला.
  • 1988 : जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.