Current Affairs (चालू घडामोडी) of 15 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी |
2. | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘कलम 370’ ची भूमिका ठाम |
3. | पीएसआय परीक्षेत अर्शद मकानदार पहिला |
4. | रस्त्यावरील मंडप बांधणीस बंधी |
संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
- भय्याजी जोशी हे पुढील तीन वर्ष स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाचा धुरा सांभाळतील.
- जोशी यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली असून ते तिसर्यांदा हे पद भूषवणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘कलम 370’ ची भूमिका ठाम :
- जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ‘कलम 370’ रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका कायम.
- याकरिता संघाने चार वर्षाची कलामर्यादा ठरवली आहे.
- संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी ही माहिती दिली आहे.
- जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या ‘कलम 370’ मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत असल्याचे संघाने म्हटले यामुळे हे कलम रद्द करण्यात यावे असे संघाने म्हटले.
पीएसआय परीक्षेत अर्शद मकानदार पहिला :
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2013 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदासाठीच्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा अर्शद मकानदार हा राज्यात प्रथम आला आहे.
- तर महिलांमध्ये औरंगाबाद येथील नीता केरबाजी कदम हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.
रस्त्यावरील मंडप बांधणीस बंधी :
- सण, समारंभ या या काळात रस्त्यावर मंडप उभारण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.
- राज्य सरकारने दोन महिन्यात धोरण आखावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.