Current Affairs (चालू घडामोडी) of 14 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | आकाशगंगेभोवती नऊ नवीन आकाशगंगांचा शोध |
2. | व्हिवियन रिचर्डस ठरला सर्वोकृष्ट खेळाडू |
3. | गूगलने हटवली मजकुरावरची बंधी |
4. | दिनविशेष |
आकाशगंगेभोवती नऊ नवीन आकाशगंगांचा शोध :
- आकाशगंगेभोवती परिभ्रमण करणार्या तब्बल नऊ लघु आकाशगंगांचा शोध लागला आहे.
- ‘ऍस्ट्रोफिजिकल जर्नल’ मध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
- नऊ आकाशगंगांपैकी सर्वात जवळची आकाशगंगा ही ‘मिल्की वे‘ पेक्षा एक लाख प्रकाशवर्ष दूर तर सर्वात दूरची आकाशगंगा 10 लाख प्रकाशवर्षापेक्षा दूर आहे.
Must Read (नक्की वाचा):
व्हिवियन रिचर्डस ठरला सर्वोकृष्ट खेळाडू :
- वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिवियन रिचर्डस याची सर्वकालीन सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटटु म्हणून निवड करण्यात आली आहे.
- ‘क्रिकेट मंथली’ मासिकाच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारात रिचर्ड यांनी भारताच्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
गूगलने हटवली मजकुरावरची बंधी :
- गूगलने आपल्या ब्लॉगिंग सेवेतील अश्लील मजकुरावर 23 मार्चपासून लागू होणारी बंधी हटवली आहे.
- पण अश्लील साहित्याबाबदचे त्यांचे धोरण कायम राहणार असल्याचे गूगलने स्पष्ट केले आहे.
दिनविशेष :
- 1879 – सापेक्षता सिद्धांताचे जनक अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म.
- 1931 – ‘आलमआर‘ हा पहिला भारतीय बोलपट चित्रपटगृहात सादर.