Current Affairs (चालू घडामोडी) of 16 March 2015 For MPSC Exams

अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | योजनांचा आढावा आता कॉन्फरन्स कॉलवर |
2. | 1 एप्रिल पासून सर्वकष पीक विमा योजना |
3. | ना.धो.महानोर यांना ‘महाराष्ट्रभूषण’ |
4. | जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे निधन |
5. | दिनविशेष |
योजनांचा आढावा आता कॉन्फरन्स कॉलवर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व राज्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी यापुढे दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी राज्याचे मंत्री आणि केंद्र सरकारच्या सचिवांशी ‘कॉन्फरन्स कॉल‘च्या माध्यमातून एकाच वेळी संवाद साधणार आहे.
- या कॉन्फरन्स कॉलची पहिली वेळ 25 मार्च रोजी होणार आहे.
- ‘प्रोअॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन’ या नावच्या अक्षरांवरून या योजनेची ‘प्रगती’ असे संबोधण्यात येणार आहे.
- सरकारच्या सर्व सचिवांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना एक टिपणी पाठवून या नव्या सुशोसन योजनेचे स्वरूप आणि उद्देश त्यांना कळविले आहे.
Must Read (नक्की वाचा):
1 एप्रिल पासून सर्वकष पीक विमा योजना :
- महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 1 एप्रिल पासून सर्वकष पीक विमा योजना लागू करण्यात येणार असल्याचे संगितले.
- नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकर्याची स्थिती बिकट झाल्यामुळे शेतकर्याला दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ना.धो.महानोर यांना ‘महाराष्ट्रभूषण’:
- निसर्गकवी व गीतकार ना.धो.महानोर यांना ‘महाराष्ट्र टाइम्स‘च्या ‘महाराष्ट्रभूषण’ भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे निधन :
- जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे रविवारी अंधेरी येथे निधन झाले.
- किल्ले या 74 वर्षांच्या होत्या.
- ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने’ किल्ले यांना नुकतेच गौरविण्यात आले होते.
दिनविशेष :
- 1911 – भारतातील प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाल कृष्णा गोखले यांनी मांडला.
- 1937 – महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
- 1946 – कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध गायक उल्लादियाखॉ मुंबई येथे पैगंबरवासी झाले.
- 2012 – सचिन तेंडुलकर बांगलादेश विरुद्ध शंभरावे महाशतक ठोकले.