Current Affairs of 15 February 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 फेब्रुवारी 2016)
‘मेक इन महाराष्ट्र’ला उद्योगांची पसंती :
- ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध देशांतील पंतप्रधान आणि मंत्री, तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळांशी चर्चा करून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
- परराष्ट्रीय शिष्टमंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ‘मेक इन महाराष्ट्रा’ची यशस्वी वाटचाल होण्यास मदत मिळत आहे.
- (दि.14) या दिवशीही स्वीडन, जर्मनी, जपान, न्यूझीलॅंड, दक्षिण कोरिया आणि बांगलादेशच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
- सकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये जर्मनीचे वित्त व ऊर्जामंत्री उवे बेकमेयर यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
- तसेच या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):
रेल्वेने रिटर्न तिकिटाचा अवधी सहा तासांवर :
- रेल्वेने रिटर्न तिकिटाचा कालावधी सहा तासांवर आणण्याचे निश्चित केले आहे.
- आर्थिक बाजू कमकुवत झाल्यामुळे डबघाईला आलेले रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्नवाढीसाठी नवनवीन उपाय शोधत आहे.
- रिटर्न तिकिटाचा अवधी सहा तासांवर आणल्यामुळे रेल्वे प्रवाशांना वेळेत आपले काम पूर्ण करून परतावे लागणार आहे.
- रिटर्न तिकिटाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय रेल्वेने लागू केल्यास त्यांच्या तिजोरीत महसूल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
- सध्या लोकलसाठी रिटर्न तिकिटाचा अवधी रात्री बारा वाजेपर्यंत, म्हणजे सुमारे 24 तास इतका आहे.
- तिकीट काढल्यानंतर प्रवाशांनी एका तासाच्या आत प्रवास करणे आवश्यक आहे.
- रेल्वे प्रशासनाच्या नव्या नियमानुसार रिटर्नचे तिकीट सहा तास ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- सहा तासांनंतर रिटर्न तिकिटाचा कालावधी संपल्यानंतर प्रवाशांना परत जाण्यासाठी नवीन तिकीट काढावे लागणार आहे.
ठाण्यामध्ये पर्यावरणपूरक व्होल्वो हायब्रिड बस :
- स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात बनविलेल्या पर्यावरणपूरक व्होल्वो हायब्रिड बसचे (दि.14) लोकार्पण करण्यात आले.
- स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आरामदायक आणि पर्यावरणपूरक राहावी यासाठी स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून या व्होल्वो हायब्रिड बसची निर्मिती करण्यात आली आहे.
- पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रात ही बस धावणार आहे.
- नवी मुंबई व ठाणे महापालिका आणि व्होल्वो बस कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला.
पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ :
- स्वीडनसाठी पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ आहे.
- ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडनचे मोठे योगदान असून, याद्वारे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, असे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन यांनी सांगितले.
- मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त भारतात आलेले पंतप्रधान लोफव्हेन यांनी (दि.13) चाकण येथील ‘एमआयडीसी’तील ‘टेट्रा पॅक’ आणि ‘एरिक्सन‘ या स्वीडिश कंपन्यांच्या प्रकल्पांना भेट दिली.
- या वेळी स्वीडनचे भारतातील राजदूत हॅरॉल्ड सँडबर्ग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागासाठीच्या स्वीडिश कॉन्सुलर जनरल फ्रेड्रिका ऑर्नब्रांट, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि ‘टेट्रा पॅक’ साउथ आशिया मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प सिंग, एरिक्सनचे भारत विभागप्रमुख पाओलो कोलेला व अध्यक्ष मॅट्स ओलसन आदी उपस्थित होते.
भारताचा मालिका विजय :
- रविचंद्रन आश्विनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना (दि.14) 4 षटकांत 8 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेतले.
- आश्विनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या व निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा 37 चेंडू व 9 गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी सरशी साधली.
- भारताने या विजयासह टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले, तर श्रीलंका संघ चौथ्या स्थानी आहे.
19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेते वेस्ट इंडीज :
- संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर 19 वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली.
- वेस्ट इंडीजने टिच्चून मारा करताना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला केवळ 145 धावांत गारद केले.
- तसेच यानंतर आवश्यक धाव 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच युवा विश्वचषकावर शिक्कामोर्तब केले.
- शेर-ए -बांगला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली.
तब्बल 40 सलग विजयांची नोंद :
- सानिया मिर्झासाठी मार्टिना हिंगीस इतकी ‘लकी’ ठरेल असा विचार खुद्द सानियानेही केला नसेल.
- तब्बल 40 सलग विजयांची नोंद करून या जोडीने टेनिस क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे.
- सेंट पीटस्र्बिर्ग येथे झालेल्या 53 लाख डॉलर्स बक्षिसाचीलेडिज चषक स्पर्धा जिंकून या जोडीने कमाल केली. सानिया-हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने रशियाच्या वेरा दुशेविना आणि चेक गणराज्यच्या बार्बारा क्रेजिकोवा या जोडीचा अवघ्या 56 मिनिटांत पराभूत केले.
- 6-3 आणि 6-1 अशा सरळ सेटमध्ये त्यांनी हा विजय मिळवला.
- सानिया-हिंगीस या जोडीने या वर्षी ब्रिस्बेन, सिडनी आणि ऑस्ट्रेलियन ओपननंतर सेंट पीटर्सबर्गचा किताब पटकाविला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओ.एन.व्ही. कुरुप यांचे निधन :
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात मल्याळम कवी, गीतकार व पर्यावरणतज्ज्ञ ओ.एन.व्ही. कुरुप यांचे (दि.13) एका खासगी इस्पितळात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
- मल्याळम साहित्यात कुरुप यांचे अमूल्य योगदान तर होतेच, शिवाय ते मल्याळम चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील आघाडीचे गीतकार होते.
- तसेच त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये 900 हून अधिक गाणी लिहिली आहेत.
- त्यांना 2007 साली ज्ञानपीठ पुरस्काराने, तर 2011 साली पद्मविभूषण उपाधीने सन्मानित करण्यात आले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा