Current Affairs of 16 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2016)

राज्यात सहा लाख कोटींचे करार :

  • ‘मेक इन इंडिया’ या सप्ताहात राज्यात सुमारे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.15) केली.
  • तसेच या गुंतवणुकीमुळे राज्यात 28 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत.
  • मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानात ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ‘महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत’ ते बोलत होते.
  • विविध क्षेत्रांत राज्यातील विविध भागात सुमारे सहा लाख 11 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, तब्बल अडीच हजार सामंजस्य करार पूर्णत्वास येतील.  
  • तसेच या परिषदेत घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरात सहा हजार कोटींची गुंतवणूक जेएसडब्ल्यू ही कंपनी करणार आहे.
  • या परिषदेत गोदरेज अँड बॉइस, सुदर्शन केमिकल्स, उत्तम गलवा, के. रहेजा कन्स्ट्रक्‍शन यांनीही मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्या.
  • याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने पाच नव्या उद्योगविषयक धोरणाची घोषणा करण्यात आली, या धोरणांत किरकोळ क्षेत्र, अनुसूचित जाती-जमाती, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, एक खिडकी योजना, तसेच बंदरविषयक धोरणाचा समावेश आहे.
  • काही (दि.15) प्रमुख करार
  • एलसीडी उत्पादन प्रकल्पासाठी – वेदांता समूह – 20 हजार कोटी
  • रेमंड समूह – 1400 कोटी
  • महिंद्रा समूह – पुणे प्रकल्पासाठी 1500 कोटी आणि नाशिक प्रकल्पासाठी 6500 कोटी
  • जयगड बंदराच्या विकासासाठी जिंदालकडून 6000 कोटी
  • पॉस्को आणि उत्तम गाल्वा या स्टील उत्पादक कंपन्यांकडूनही सामंजस्य करार
  • उत्तम गाल्वाकडून वर्ध्यातील प्रकल्पासाठी 3750 कोटींची गुंतवणूक
  • पॉस्कोकडून उत्तम गाल्वाच्या वर्धा आणि सिंधुदूर्ग प्रकल्पात गुंतवणूक
  • राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझरकडून रायगडमधील थळ प्रकल्पासाठी 6204 कोटी
  • ऍसेंडस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीकडून नवी मुंबईत 4571 कोटींची गुंतवणूक
  • पंचशील कंपनीकडून पुण्यात बांधकाम आणि आयटी क्षेत्रात 5000 कोटींची गुंतवणूक
  • के. रहेजा या बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून आयटी पार्कच्या उभारणीसाठी 3750 कोटींची गुंतवणूक
  • गोदरेज समूहाकडून खालापूरमधील प्रकल्पातील क्षमता वाढवण्यासाठी 3000 कोटी
  • सुदर्शन केमिकल्सकडून ऍग्रोकेमिकल्स क्षेत्रात 1100 कोटींची गुंतवणूक

भारत-रशियामध्ये सामंजस्य करार :

  • जागतिक उद्योगांत भारताचे विश्वसनीय स्थान असून ते अधिक भक्कम करण्यासाठी ‘मेक इन इंडिया अभियान’ सहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी (दि.15) केले.
  • मुंबईतील मेक इन इंडिया सेंटरमध्ये मेक इन इंडिया सप्ताहानिमित्त ‘कॅपिटल गुड्‌स अँड इंजिनियरिंग : रिअलाझिंग द मेक इन इंडिया व्हीजन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
  • तसेच या वेळी भारत आणि रशियामध्ये अवजड उद्योग क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
  • रांची येथील हेवी इलेक्‍ट्रिकल कार्पोरेशन आणि रशियन कंपनी चिंतानाच(सीएनआयआयटीएमएएसएच) यांच्यामध्ये सामायिक अभियांत्रिकी सुविधा कक्ष उभारण्याचा करार झाला.
  • पोलाद उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानासंदर्भातील हा करार आहे.
  • दुसरा महत्त्वाचा करार हेव्ही इलेक्‍ट्रीकल कार्पोरेशन आणि पॉल वृथ कंपनी यांच्यादरम्यान न्यू कोक ओव्हन बॅटरी आणि को-ओव्हन मशीनचे नूतनीकरणासंदर्भात झाला.

रेल्वे अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल :

  • रेल्वेचा महत्वाच्या बदलण्याच्या दृष्टीने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल झालेले आहेत.
  • जग स्मार्ट होत असताना रेल्वेलाही स्मार्ट करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबतचा प्रस्ताव येत्या अर्थसंकल्पात मांडण्यात येणार आहे.
  • यासोबतच तिकीट धोरणातही बदल केला जाणार असून, तिकीट तत्काळ रद्द केल्यास पन्नास टक्के परतावा मिळणे, तसेच प्रवाशांसाठी अमर्याद बुकिंगसंदर्भातील प्रस्तावही मांडले जाणार आहेत.
  • दरम्यान रेल्वे अर्थसंकल्प 2016-17 साठी ‘मेक रेल्वेज्‌ बेट’ नावाचा सर्व्हे घेण्यात आला होता.
  • तसेच या वेळी तिकीट तपासनिसांची लाचखोरी, राखीव कोट्याचा दुरुपयोग याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
  • जवळपास 63 टक्के लोकांनी तिकीट तपासनीस विनातिकीट प्रवास किंवा सीट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत असल्याचे सांगितले.
  • तत्काळ व व्हीआयपी जागांसंदर्भात पारदर्शकता असावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी सर्वेक्षणात केली आहे.
  • नागरिकांच्या अपेक्षांपूर्तीच्या दृष्टीने रेल्वे अर्थसंकल्पाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असणाऱ्या महिलांना खालच्या व मध्यम सीट प्राधान्याने देण्यात याव्यात, असेही सर्वेक्षणात सुचविलेले होते.
  • लांब पल्ल्याच्या गाडीसाठी स्मार्ट सुविधा
  • आरामदायी जागांसोबत जीपीएस गजर
  • आरक्षित डब्यांमध्ये एलईडी, तसेच आरक्षण तक्ता
  • डब्यांना स्वयंचलित दरवाजे व मायक्रोप्रोसेसर एसी
  • शौचालयांमध्ये सेन्सर व फ्लशिंगच्या अत्याधुनिक सुविधा

मेगा फूड पार्क वर्षभरात कार्यान्वित :

  • सातारा आणि औरंगाबाद येथील मेगा फूड पार्क उभारणीचे काम निम्म्याने पूर्ण झाले असून, वर्षभरात हे पार्क कार्यान्वित होणार आहेत.
  • मेगा फूड पार्कमधून किमान 30 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
  • अन्न प्रक्रियेबरोबरच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार असल्याने अन्नधान्याची होणारी गळती थांबणार असून, बळीराजाला फायदा होईल, असा विश्‍वास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाचे विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी व्यक्‍त केला.
  • चालू वर्षात केंद्राने सात मेगा फूड पार्क मंजूर केले आहेत, त्यातील दोन फूड पार्क राज्यातील सातारा आणि औरंगाबादमध्ये उभारण्यात येत आहेत.
  • पायाभूत सुविधांअभावी देशात दर वर्षी सरासरी 44 हजार कोटींची अन्नधान्यांची नासाडी होते, ही नासाडी रोखण्यासाठी शेताजवळ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करणे आवश्‍यक आहे.
  • केंद्राबरोबर राज्य सरकारकडूनही छोटे प्रक्रिया उद्योग सुरू केले जात आहेत.
  • अन्न प्रक्रिया उद्योगात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

नवे मुख्य न्यायाधीश न्या. धीरेंद्र वाघेला :

  • न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी (दि.15) मुंबई उच्च न्यायालयाचे 40 वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली.
    राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • न्या. मोहित शहा 8 सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून राज्याच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त होते व न्या. विजया कापसे ताहिलरामाणी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होत्या.
  • सुरुवातीस गुजरात उच्च न्यायालयात नियुक्ती झालेले न्या. वाघेला गेली 17 वर्षे न्यायाधीश आहेत.
  • मुंबईत येण्यापूर्वी न्या. वाघेला सात महिने ओडिशा उच्च न्यायालयाचे व त्याआधी दोन वर्षे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

डी.एड.मध्ये 60% प्रात्यक्षिके :

  • देशाच्या ‘डिजिटल इंडिया’कडे सुरू असलेल्या वाटचालीत नवी पिढी घडविणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित होणार आहे.
  • तब्बल 10 वर्षांनंतर बदलण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड.) अभ्यासक्रमात प्रामुख्याने 60 टक्के प्रात्यक्षिकावर भर दिला जाणार आहे.
  • तंत्रस्रेही शिक्षक घडविण्यात येतील, छात्र शिक्षकांचे मूल्यमापनही सरल प्रणालीप्रमाणे ऑनलाइनच होणार आहे, अशी माहिती या राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळाच्या उपसचिव प्रभावती कोळेकर यांनी दिली.

विश्वाच्या प्राथमिक स्थितीची प्रतिकृती :

  • विश्वाच्या प्राथमिक स्थितीची छोटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून, यासाठी शास्त्रज्ञांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली कण वेगवर्धकात प्रमुख अणूंची अत्याधिक ऊर्जेतून टक्कर घडविली.
  • सर्न या जगातील सर्वाधिक मोठ्या प्रयोगशाळेतील लार्ज हैड्रन कोलायडरमध्ये ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
  • महाविस्फोटानंतर अत्यंत उष्ण आणि घन अवस्थेत विश्व अस्तित्वात आले.
  • तसेच यात प्रामुख्याने क्वार्क आणि ग्लुओनसह मूलभूत द्रव्यकण होते, या स्थितीला क्वार्क ग्लुओन प्लाझ्मा संबोधण्यात आले.

सरफराजचे युवा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक :

  • 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या उदयोन्मुख फलंदाज सरफराज खान याने, स्पर्धेत तब्बल 7 अर्धशतके झळकावताना जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
  • अंतिम सामन्यात इतर फलंदाज एकामागून एक गारद होत असताना, धडाकेबाज सरफराजने एकाकी झुंज देत 51 धावांची खेळी केली.
  • विशेष म्हणजे, याजोरावर सरफराजने युवा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला.
  • स्पर्धा इतिहासात त्याने एकूण 12 सामने खेळताना, 12 डावांमध्ये सात अर्धशतक ठोकले, यातील 5 अर्धशतके त्याने यंदाच्या स्पर्धेत झळकावली असून, 2 अर्धशतके 2014 साली झळकावली.
  • अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकताना सरफराजने वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा रेकॉर्ड मोडला.
  • ब्रेथवेटने 2012 साली झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत सहा अर्धशतके साजरी केली होती.
  • तसेच 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सरफराज तिसऱ्या स्थानी असून, त्याने 12 सामन्यांत 566 धावा काढल्या आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.