Current Affairs of 13 February 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2016)
‘मेक इन इंडिया सप्ताह’ मुंबईत :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे सुरुवात केली.
- उत्पादनाला चालना देताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असून, यातून कोट्यवधी रोजगार उपलब्ध होणार आहेत.
- उद्योगांना जागतिक संधी निर्माण करणारा देशातील पहिलावहिला ‘मेक इन इंडिया सप्ताह’ मुंबईत सुरू होत आहे.
- आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या आणि जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.
- गुंतवणूकदारांची पहिली पसंती असलेल्या महाराष्ट्रात हे जागतिक दर्जाचे भव्यदिव्य व्यापारी प्रदर्शन 13 ते 18 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
- तसेच यामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्वच प्रमुख क्षेत्रांची कवाडे गुंतवणूकदारांसाठी खुली केली जाणार आहेत.
- ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’, ‘स्टार्ट अप स्टॅंड अप’ उपक्रमांबरोबरच आर्थिक सुधारणांची झलक या सोहळ्यात दाखवली जाणार आहे.
- वांद्रे-कुर्ला संकुलनातील एमएमआरडीए मैदान, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी या सप्ताहातील कार्यक्रम होणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
‘आयएनएस विराट’चा शेवटचा प्रवास :
- भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट‘चा शेवटचा प्रवास सुरू झाला असून, या युद्धनौकेचे रूपांतर साहसी पर्यटन केंद्रात केले जाणार आहे.
- ओडिशातील परादीप बंदरात ‘आयएनएस विराट’ दाखल झाली.
- तसेच येथून ही युद्धनौका काकिनाडा बंदराकडे जाणार आहे, त्यानंतर ती चेन्नई बंदरात आणि त्यानंतर शेवटी मुंबई बंदरात दाखल होणार आहे.
- जगातील सर्वांधिक जुन्या युद्धनौकांपैकी एक असलेली ‘आयएनएस विराट’ थोड्याच दिवसांत निवृत्त होणार आहे.
- विशाखापट्टणम येथे मागील आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय नौदलाच्या ताफा पाहणीमध्ये ‘आयएनएस विराट’ने सहभाग घेतला होता.
- मुंबई बंदरात पोचल्यानंतर ‘आयएनएस विराट’ नौदलातून निवृत्त होणार आहे.
- 1987मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली होती.
- तीस वर्षे ब्रिटिश नौदलात सेवा दिल्यानंतर भारताने ही युद्धनौका खरेदी केली होती.
‘स्टार्ट अप’ना मिळणार पुरस्कार :
- नवउद्योजकांमधील नावीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ‘स्टार्ट अप’ योजनांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे.
- ‘क्यू प्राइज मेक इन इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना कारखाना उत्पादन आणि पुरवठ्यात नवनवीन संकल्पना आणि बिझनेस मॉडेल विकसित करणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना दोन कोटींचे पुरस्कार दिले जातील.
- वर्षभरात देशात ‘स्टार्ट अप्स’ कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, दररोज तीन ते चार ‘स्टार्ट अप’ तयार होत आहेत.
- वर्षभरात ‘स्टार्ट अप’मध्ये पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
- ‘मेक इन इंडिया सप्ताह’ हे ‘स्टार्ट अप’साठी जागतिक व्यासपीठ म्हणून देण्यात आले आहे.
12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रथम क्रमांकावर :
- 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा विजय प्राप्त केला, लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊतने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
- भारताने पदक तालिकेतील अव्वल स्थान स्थापित केले आहे.
- भारताने या स्पर्धेत 146 सुवर्ण, 79 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह एकूण 248 पदकांची कमाई केली.
- तसेच दुसऱ्या स्थानावरील श्रीलंका 157 पदकांची कमाई केली आहे, त्यात 25 सुवर्ण, 53 रौप्य आणि 79 कांस्यपदकांचा समावेश आहे.
- पाकिस्तानाने 7 सुवर्ण, 23 रौप्य व 43 कांस्यपदकांसह एकूण 73 पदकांची कमाई करीत तिसरे स्थान पटकावले आहे.
हिंदू विवाह विधेयक पाकच्या संसदीय समितीमध्ये मंजूर :
- सरकारच्या अनुत्साहामुळे अनेक दशकांपासून लांबणीवर पडलेले हिंदू विवाह विधेयक पाकिस्तानमधील संसदीय समितीने एकमताने मंजूर केले आहे.
- कायदा आणि न्याय विषयावरील स्थायी समितीने ‘हिंदू विवाह विधेयक, 2015’चा मसुदा मंजूर केला.
- तसेच या वेळी पाच हिंदू खासदारांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
- या विधेयकाला शेवटपर्यंत काहींचा विरोध असतानाही स्थायी समितीने विवाहासाठी किमान वय 18 करण्याची दुरुस्ती करत एकमताने हा मसुदा मंजूर केला.
- तसेच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तो संपूर्ण देशभरासाठी लागू असेल.
पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी :
- भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने पाचवर्षांसाठी बंदी घातली आहे.
- तसेच या शिक्षेमुळे रौफ यांना बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत पंच म्हणून काम करता येणार नाही.
- आयपीएल 2013 मधील सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात रौफ यांचा वॉंटेड आरोपी म्हणून समावेश केला आहे.
- मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा बंदीच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला.
- रौफ भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूक प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
दिनविशेष :
- 1879 – सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन.
- 1922 – गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्मदिन.
- 1984 – भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा