Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 14 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2016)

देवेंद्रने विश्वविक्रमासह दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकाविले :

 • रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.
 • देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला.
 • तसेच पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
 • ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पॅरालिंपिकमध्ये मात्र दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.
 • रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले आहे.
 • डाव्या हाताने अपंग असलेल्या 36 वर्षीय देवेंद्रला केंद्र सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे.
 • रिओ पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ46 प्रकारात देवेंद्रने विश्वविक्रम नोंदविला.
 • तसेच यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.
 • जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे. देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे.

युनायटेड विश्व कुस्तीच्या क्रमवारीत साक्षी मलिक चौथ्या स्थानी :

 • रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे कांस्य जिंकणारी महिला मल्ल साक्षी मलिक युनायटेड विश्व कुस्तीच्या नव्या क्रमवारीत 58 किलो वजन गटात करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर दाखल झाली आहे.
 • ऑलिम्पिक पदकविजेती पहिली भारतीय मल्ल साक्षीला याआधी कुठलीही रँकिंग नव्हते.
 • पुरुष फ्रीस्टाईलमध्ये संदीप तोमर आणि बजरंग पुनिया हे मल्लदेखील आघाडीच्या 20 जणांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.
 • ऑलिम्पिकच्या पहिल्या लढतीत पराभूत झालेला संदीप 57 किलो वजन गटात 15 व्या आणि बजरंग 61 किलो गटात 18 व्या स्थानावर आहे.

सर्वांत उंच पूल वाहतुकीसाठी खुला होणार :

 • चीनमधील ग्वेझोऊ प्रांतात नदीवरील जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम सुरू असून तो लवकरच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
 • नदीपासून तब्बल 565 मीटर (1,854 फूट) उंचीवर हा पूल आहे.
 • ‘बेइपानजियांग’ असे या पुलाचे नाव आहे. या पुलाची लांबी 1,341 मीटर इतकी असून, त्याची दोन्ही टोके जोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
 • तसेच या वर्षअखेरीपर्यंत पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा चीन सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 • या पुलामुळे लिउनपान्शुई आणि शुआनवेई या दोन शहरांमधील अंतर पाच तासांऐवजी दीड तासांवर येणार आहे.
 • चीनने मागील महिन्यात जगातील सर्वांत मोठ्या लांबीचा काचेचा पूल नागरिकांसाठी खुला केला होता.
 • मात्र, मागील आठवड्यात दुरुस्तीसाठी तो बंद करण्यात आला आहे.

केंद्राची उच्चशिक्षणासाठी ‘हेफा’ योजनेला मंजुरी :

 • देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता व त्यांच्या विकासासाठी केंद्रीय उच्चशिक्षण वित्तसंस्थेची (हेफा) स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.12) रोजी मंजुरी दिली, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
 • तसेच त्याप्रमाणे तंत्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 3600 कोटी रुपयांचा निधीही केंद्राने मंजूर केला आहे. 
 • मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर जावडेकर यांनी ही माहिती दिली.
 • उच्चशिक्षणाची गंगा गावोगावी पोचविण्यासाठी ‘हेफा’ची स्थापना केंद्राने केली आहे.
 • या अंतर्गत एखाद्या विद्यापीठाच्या अखत्यारीतील; पण ग्रामीण व दुर्गम भागांतील शिक्षण संस्थेत उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
 • ‘हेफा’च्या स्थापनेसाठी दोन हजार कोटींचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यात सरकारची भागीदारी एक हजार कोटींची असेल.
 • उर्वरित निधी एखाद्या प्रायोजक वा उद्योजकांच्या मदतीने उभा करण्यात येईल.
 • ‘हेफा’शी संलग्न होणाऱ्या संबंधित शिक्षण संस्थांमधील उच्चशिक्षण सुविधा व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्जरूपाने निधी उपलब्ध करण्याचीही तरतूद केली जाणार आहे.
 • तसेच याशिवाय ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ ‘एनआयटी’ शिक्षण संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 20 हजार कोटींचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे.

दिनविशेष :

 • भारतीय हिंदी दिवस
 • 1901 : यमुनाबाई हिर्लेकर, शिक्षणतज्ञ, विचारवंत जन्मदिन.
 • 1932 : डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते जन्मदिन.
 • 1960 : ओपेकची स्थापना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World