Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 13 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2016)

पॅरालिम्पिक स्पर्धेत दीपा मलिकने जिंकले रौप्यपदक :

 • भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत (दि.12) गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदक पटकावले.
 • तसेच अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली.
 • दीपाने सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नांत 4.61 मीटर गोळा फेकला. तिची ही कामगिरी रुपेरी ठरली.
 • बहारिनच्या फातिमा नेधाम हिने 4.76 मीटर कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले.
 • ग्रीसची दिमित्रा कोरोकिडा (4.28 मीटर) ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.
 • तसेच या पदकासह पॅरालिंपिक स्पर्धेत आता भारताची तीन पदके झाली आहेत.
 • यापूर्वी मरियप्पन थांगवेलूने उंच उडीत सुवर्ण आणि याच प्रकारात वरुण भाटीने ब्रॉंझपदक पटकावले आहे.

नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र होणार :

 • मिहान प्रकल्पातील पतंजली फूड अँड हर्बल पार्क 230 एकरांत उभारण्यात येणार आहे. त्यात 1600 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
 • तसेच यातून देश-विदेशांत उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे नागपूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र म्हणून विकसित होईल, अशी माहिती योगगुरू रामदेवबाबा यांनी दिली.
 • मिहान प्रकल्पातील पतंजली फूड पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले, की हा देशातील सर्वांत मोठा फूड अँड हर्बल पार्क आहे.
 • दररोज पाच हजार टन कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाईल. पुढील सहा महिन्यांत प्रकल्प सुरू करण्यात येईल. दीड वर्षात प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
 • तसेच यातून देश-विदेशांत फूड आणि हर्बल उत्पादने पाठविण्यात येणार आहेत.
 • सरकारने प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तीन अटी घातल्या होत्या. त्या अटींची पूर्तता केली जाईल.
 • विदर्भातील अंदाजे 20 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • याशिवाय विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून शेतीमालासह वनोपज खरेदी करण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 • तसेच या प्रकल्पात प्रत्यक्ष दहा हजार आणि अप्रत्यक्ष 50 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

आयसीसी टी-20 जागतिक क्रमवारी जाहीर :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-20ची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली असून भारताच्या विराट कोहलीने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे.
 • टी-20 च्या फूल फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने (763) तिसरे स्थान मिळवले आहे.
 • आयसीसी क्रमवारीत 820 रेटींग मिळवत विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले असून 771 रेटिंगसह ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच दुसऱ्या स्थानावर आहे.
 • आयसीसीने जारी केलेल्या टॉप 10 फलंदाजांमध्ये विराटशिवाय अन्य कोणत्याही भारतीयाला स्थान मिळवता आलेले नाही.
 • तसेच टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री 743 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे.
 • भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह (735) आणि फिरकीपटू आर.अश्विन (684) अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
 • दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने 740 रॅकिंगसह दुसरे स्थान पटकावले आहे.

न्यूझीलंडविरोधी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर :

 • न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेसाठी यजमान भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्माचेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
 • संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने (दि.13) संघाची घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबरपासून ही कसोटी मालिका सुरू होणार आहे.
 • कसोटी सामन्यातील रोहितच्या निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला असून वन-डे स्पेशलिस्ट रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळायला हवी असे मत त्याने मत मांडले होते.
 • भारतीय संघ –
 • विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, आर.अश्विन, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, अमित मिश्रा, उमेश यादव.

कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी :

 • कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
 • केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी (दि. 12) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या भेटीत याबाबत प्रशंसा केली.
 • कौशल्य विकासाचे कार्यक्रम उत्तमरीत्या राबविणाऱ्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे.
 • 2015-16 या वर्षात महाराष्ट्रात दोन लाख लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.
 • राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी पाच ते सात एकर जागा निश्चित करण्याबाबत या वेळी फडणवीस आणि रुडी यांच्यात चर्चा झाली.
 • कौशल्य विकास मंत्रालय आणि भृपृष्ठ वाहतूक विभागाच्या संयुक्त सहभागाने या संस्था सुरू करण्यात येतील.
 • पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बंद पडलेल्या महापालिका शाळांचा उपयोग करून घेण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

दिनविशेष :

 • 1928 : श्रीधर पाठक, हिंदी कवी स्मृतीदिन.
 • 1929 : जतींद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारक स्मृतीदिन.
 • 1932 : डॉ. प्रभा अत्रे, किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार ‘गानप्रभा’ जन्मदिन.   
 • 2003 : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World